आज वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने प्रगती होत आहे. अमेरिकन डॉक्टरांनी आता या क्षेत्रात एक वेगळा दर्जा प्राप्त केला आहे. जे जगात कधीच घडले नाही ते अमेरिकेच्या डॉक्टरांनी केले आहे. अमेरिकेतील डॉक्टरांच्या टीमने चक्क आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्याचा यशस्वी चमत्कार घडवून आणला आहे. विशेष म्हणजे हे बाळ जन्मालाही आलेली नाही तरी पोटात असताना त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा नवा इतिहासचं डॉक्टरांनी घडवला आहे.
अमेरिकेत एका आईच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाच्या नसांमध्ये एक दुर्मिळ आजार झाला होता. पण अमेरिकन डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया करुन बाळाला जन्माआधीचं मृत्यूपासून वाचवले. जगातील हे पहिले आणि चमत्कारिक ऑपरेशन आहे. जर हे ऑपरेशन झाले नसले तर जन्मानंतर लगेच बाळाचे ह्रदय बंद पडले असते किंवा त्याचा पक्षाघाताने मृत्यू होण्याचा धोका होता. एका अहवालानुसार, ऑपरेशननंतर न जन्मलेले बाळ आणि त्याची आई दोघेही सुरक्षित आहेत.
एका अहवालानुसार, अमेरिकेतील बोस्टनमधील लुईझियाना येथे राहणारी केन्याट्टा गरोदर होती. यावेळी तिच्या पोटातील बाळाच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. ज्यात तिच्या न जन्मलेला बाळाला गॅलेन मॅफॉर्मेशन (VOGM) सारखा दुर्मिळ आजार असल्याचे कळते. हा मेंदूतील रक्तवाहिन्यांसंबंधीत एक घातक आजार आहे. अशा स्थितीत बाळ जन्मल्यानंतर जगण्याची शक्यता फारच कमी होती. यावेळी तिने त्याच्या उपचाराबाबत डॉक्टरांशी चर्चा केली.
बाळाच्या मेंदूवर गर्भाशयातच झाली शस्त्रक्रिया
यावेळी अमेरिकन डॉक्टरांच्या टीमने बाळाच्या आजारावर उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी बोस्टनच्या डॉक्टरांच्या एका टीमने बाळाच्या मेंदूचा पूर्ण अभ्यास करून त्यावर गर्भातच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ३४ आठवड्यांच्या गर्भाची आणि त्याच्या धमनीची स्थिती पाहून डॉक्टरांनी ऑपरेशन सुरु केले, हे ऑपरेशन काही तासांत यशस्वी झाले. ऑपरेशननंतर दोनच दिवसांनी मुलाचा जन्म झाला.
बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलचे डॉ डॅरेन ऑरबॅच यांनी सांगितले की, गेल्या सहा आठवड्यांपासून बाळाची प्रकृती चांगली आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. त्याला कोणतेही औषध दिले जात नाही. बाळाचे वजन वाढत आहे. त्याच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत. यूकेमध्ये दरवर्षी १० ते १२ बालके या आजाराने जन्माला येतात. यानंतर काही दिवसांनी त्याचा मृत्यू होतो.