“पल्लवी हे समा के चावल इज मॅजिक! मला इतकं हलकं वाटतच नाही आणि काल दिवसभर अजिबात खा खा झालं नाहीये मला. नेहमी उपासाच्या दिवशी एवढं सगळं खावंसं वाटत राहतं. पण मानवलाय आपला समा का उपमा”, अंजली उत्साहाने सांगत होती. आता ठरल्याप्रमाणे नारळ पाणी पिणार आहे. आता संध्याकाळी मी एखादं फळ खाईन“

उपासाच्या दिवसाचा तिचा उत्साह कमाल होता. नेहमी उपास असला की फलाहार आणि दूध असं डाएट करणारी अंजली वरी तांदुळाच्या शोधामुळे खूश होती आणि तिचा आहार संतुलित झालाय या विचाराने मला समाधान वाटत होतं.

Anant Chaturdashi | a rare Sanyog brings good fortune to four lucky zodiac signs
Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी निर्माण होणार दुर्मिळ संयोग; ‘या’ चार राशींचे नशीब चमकणार, बाप्पाच्या आशीर्वादाने येईल चांगले दिवस
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
ganeshotsav flowers marathi news
निसर्गलिपी: हिरवा निसर्ग हा भवतीने…
Durva garland
लाडक्या बाप्पासाठी बनवा दूर्वांचा हार! ‘हा’ जुगाड एकदा वापरून बघा, पाहा Viral Video
Ganesh chaturthi 2024 khajur ladoo recipe in marathi
Ganesh chaturthi 2024: नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू
Ganeshostav 2024 Divyang Man Working On Ganpati Bappa Idol Leaves Netizens In Saluting Him
“बाप्पाचीच कृपा” अपंग तरुण एका पायावर उभं राहून घडवतोय मूर्ती, VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
Gold-Silver Rate today | gold price gold rate
Gold Silver Price : गणेशोत्सवापूर्वी सोने महागले! चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर

नवरात्रीच्या उपासासाठी सगळ्यात प्रसिद्ध असणारा पदार्थ म्हणजे ‘समा के चावल’ अर्थात वरील वरी किंवा वरई !

वरी तांदळांबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत.

१. वरी अतिशय उष्ण असतो स्त्रियांनी खाऊ नये.

२. डायबिटीस असताना वरी तांदूळ खाऊ नये.

३. थायरॉईड असणाऱ्यांनी वरी वर्ज्य करावे.

४. वजन वाढण्यासाठी वरी तांदूळ वापरावेत यासारख्या गोष्टी आपण दरवेळी ऐकतो.

वरी तांदूळ नक्की काय आहे आणि त्याचा नक्की पोषण तज्ञांच्या मानाने काय शरीराला उपयोग होतो हे जाणून घेण्यासाठी आजचा लेख प्रपंच. मुळात वरई म्हणजे समा तिच्यावर हे खरंतर तृणधान्य आहे. साधारण पांढुरके दिसणारं हे तृणधान्य उपासाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातात. कोणी त्याचं थालीपीठ करतं, कोण त्याचा उपमा करतं. कोणी त्याचा भात करतात तर कोणी त्याची खिचडी बनवतात.

हेही वाचा… Health Special: जॉय ऑफ मिसिंग आऊटचा आनंद

वरीचे अप्पे , वरीची खिचडी , वरीचे डोसे ,वरी -कंसाचे पराठे उत्तम होतात. माफक ऊर्जा देणारे. किमान ५ ते ६ ग्राम इतके प्रोटीन आणि उत्तम कॅल्शिअम असणारे वरी तांदूळ अत्यंत पोषक आहेत.

स्त्रियांनी आहारात वरीचा समावेश जरूर करावा. १०० ग्रॅम वरीमधून साधारण ६ ते ८ ग्राम इतके प्रथिने मिळतात. उपासाच्या दिवशी जेव्हा आपण सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भूक शमवणारे सकस पदार्थ म्हणून वरी अत्यंत उपयुक्त आहे.

डायबिटीस असणाऱ्यांसाठी रक्तातील साखरेवर कमीत कमी भार टाकून योग्य पोषण पुरविण्यासाठी वरी उपयुक्त आहे. थायरॉईड असणाऱ्यांसाठी वजन आटोक्यात ठेवणे आणि थायरॉईड ग्रंथीचे आरोग्य वाढविणे या दोन्हीसाठी वरी उपयुक्त आहे.

शरीरातील भुकेसाठी कारणीभूत असणाऱ्या संप्रेरकांचे योग्य संतुलन राखून भुकेची तीव्रता नेमकी करण्याचे काम वरी करते. त्यामुळे वरीचा उपमा किंवा थालीपीठ किंवा वरीचा भात-दही असे पदार्थ खाल्ल्यामुळे भूक शमते आणि शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहिल्याने सारखी भूक लागत नाही भुकेच्या संप्रेरकांचे योग्य नियमन झाल्यामुळे सारखी भूक लागणे देखील बंद होते.

हेही वाचा… Health Special: नवरात्रात व्रतासाठी काय खावं?

ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी दूध किंवा साय वरी तांदळासोबत खावी. शिवाय दाण्याच्या आमटीचे किंवा दाण्याचे कढीचे प्रमाण वाढवावे.

उपासाच्या दिवशी शक्यतो वरीचे तळीव पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे शरीरात अनावश्यक स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढते आणि हे स्निग्ध पदार्थ एक फॅट्स ट्रान्स फॅट्स च्या स्वरूपात शरीरात समाविष्ट केल्याने कोलेस्ट्रॉलवर विरुद्ध परिणाम होतो. वरी तांदूळ आहारात समाविष्ट करताना बरोबर दही , तेलबिया, काकडी , दाण्याची चटणी, नारळ पाणी यांचा समावेश करावा.

वरीचे डोसे किंवा पराठे करताना त्यात शिंगाड्याचे पीठ आवर्जून एकत्र करावे.

व्यायाम करणाऱ्यांनी आणि धावपटूंनी केवळ उपासाचे दिवशीच नव्हे तर नियमितपणे वरी आहारात समाविष्ट करावी.

ज्यांना व्यायाम करताना लवकर थकवा येतो किंवा भूक लागत नाही त्यांच्यासाठी वरी तांदूळ अत्यंत गुणकारी आहेत मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींना उपयुक्त असणाराने वरी तांदूळ सकस आहारासाठी योग्य आहे.

लहान मुलांच्या आहारात नेहमीच्या पदार्थांसोबत वरी एकत्र केल्यास पोषणमूल्यांचं प्रमाण उत्तम राहते.

काय मग तुमच्या नवरात्री फास्टिंग मध्ये वरी आहे ना?