अमेरिकेसारख्या देशात ढेरी वाढवणारे पदार्थ म्हणजे फास्ट फूड आणि भारतासारख्या देशात रस्त्यात सहजी उपलब्ध होणारे पदार्थ म्हणजे फास्ट फूड. पाश्चात्य देशांचे हे पदार्थ आपण सहजी आपल्या नेहमीच्या आयुष्यात सहभागी करून घेतले. टाकोस, पिझ्झा, हॉटडॉग, बर्गर यासारखे पदार्थ फास्ट फूड म्हणून सर्रास खाल्ले जातात. १९२१ सालापासून कॅन्सस मधील वॉल्टर अँडरसन आणि बोली इंग्राम या जोडगोळीने फास्टफूडचे लहानगे हॉटेल सुरु केले ज्यात- झटपट आणि स्वस्त या संकल्पनेनुसार त्वरित पदार्थ मिळण्याची सोय करून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या विश्वयुद्धानंतर फास्ट फूड जास्तीत जास्त देशांत प्रसिद्ध झाले १९५० पर्यंत सर्वत्र पसरलेले फास्टफूडचे पेव व्यावसायिक फास्ट फूड विक्रीपर्यंत येऊन पोहोचले. सुरुवातीला फास्ट फूड म्हणजे सँडविच हीच ओळख होती मात्र वेगवगेळ्या देशांनी या फास्ट फूड व्यवस्थेला वेगवेगळी रूपं द्यायला सुरुवात केली आणि मेक्सिकन , इटालियन , चायनीज, इंडियन अशा विविध रूपात आपल्याला फास्ट फूड उपलब्ध होऊ लागले. गेल्या काही दशकात चायनीज पदार्थांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आणि भारतात फास्टफूडमुळे होणारे दुष्परिणाम देखील दिसू लागले . विशेषतः पापड सदृश आणि बेकरी खाद्यपदार्थ भारतातील अनेक ठिकाणी उपलब्ध होऊ लागले. फ्रेंच फ्राईजने घरगुती भज्यांना मागे टाकत सगळ्याच खवयांवर गारुड केले.

आहारतज्ज्ञ म्हणून फास्टफूड म्हटलं की मला भारतीय आहारात चणे, दाणे, दाण्याचे लाडू, गूळ पोळी , चटणी-भाकर , पिठलं भाकर हे पटकन तयार होणारे पदार्थ डोळ्यासमोर येतात.

आणि नेहमी एक गोष्ट जाणवते की कुठेतरी आपलं फास्ट फूड आपण जगभरात पोहोचवायला हवं. अनेक पाश्चात्य फास्ट फूड म्हणून गणले जाणारे पदार्थ आरोग्यासाठी हानीकारक आहेत. त्यामानाने भारतीयांनी झटपट पदार्थासाठी प्रथिने, पोषणतत्वे यांचा उत्तम विचार केलेला आहे. किंबहुना आपल्याकडे अन्नघटकांमध्ये असणारी विविधता , वेगवेगळ्या प्रदेशात घेतली जाणारे पिके यामुळे आहारात केवळ चवीत देखील वैविध्य आहे.

हेही वाचा… Health Special: फटाके वाजवताना एवढा तर विचार करा… !

अलीकडच्या काळामध्ये पिझ्झा देखील फास्टफूडमध्ये गणला जातो. कारण खरंतर यासाठी लागणारा जो जिन्नस आहे हा मैदा असतो. मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने केवळ स्टार्च असते आणि पोषण मूल्यांचे प्रमाण शून्य असते. पिझ्झामध्ये अतिशय जास्त प्रमाणात बटर , स्टार्च , चीज यांचे मुबलक प्रमाण असल्यामुळे त्याचा शरीराला अपायच जास्त होतो. एक बर्गर साठी तयार केलेला जाणारा पाव हा जास्तीत जास्त सॉफ्ट कसा होईल जास्तीत जास्त मऊ करण्यासाठी त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये असे अन्नघटक वापरले जातात ज्याचा पोषण मूल्यांच्या बाबतीत शरीराला शून्य फायदा होतो.

अनेक ठिकणी फास्टफूड तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल हे आधी अनेकदा वापरले गेलेले असते आणि ते जर तुम्ही पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरत असाल तर ते एक प्रकारचे विष तयार होते आणि तुमच्या हृदयरोगांसाठी कारणीभूत ठरू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फास्टफूड तुमच्या पोटाची ढेरी वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. सध्या पाश्चात्य देशांमध्ये फास्टफूडचे प्रमाण अतिशय जास्त असल्यामुळे येणाऱ्या पिढी पिढीमध्ये बुद्धीमांद्य, स्थूलपणा, लठ्ठपणा, मधुमेह यांचे प्रमाण वाढलेले असल्याचे आढळून आलेले आहे. इन्स्टंट चव वाढविण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह म्हणजे साठवण्याचे अन्नघटक वापरले जातात त्यामुळे त्यांचा तुमच्या पचनक्रियेचा समतोल बिघडतो. शरीरातील पित्त प्रकृती वाढवणे शरीरातील जळजळ वाढवणे यासाठी कारणीभूत ठरू शकतो.

झटपट पदार्थ तयार करत फास्ट फूड म्हणून भारतीय आहारपद्धतीचा सखोल विचार होणे आवश्यक आहे. दाण्याचा एक लाडू किंवा गूळ-चणे यासारखे झटपट पदार्थ केवळ भूकच नव्हे तर योग्य पोषणमूल्ये पुरवितात आणि शारीरिक तसेचबौद्धिक विकाससाठी हातभार लावतात.
कोणताही इन्स्टंट ज्यूस पिण्यापेक्षा उसाचा रस किंवा नारळपाणी यासारखे पदार्थ आपण आहारात समाविष्ट करायला हवेत. या जागतिक फास्ट फूड दिनाच्या निमित्ताने आपण भारतीय झटपट आणि पोषक पदार्थांची कास धर्य आणि भारतीय आहाराला प्राधान्य देऊया.

बर्गर पिझ्झा खाण्यापेक्षा चणे, दाणे, मखाने यासारखे स्नॅक्स आणि उत्तम ताजे जेवण जेऊया आणि उत्साह तसंच आरोग्य वाढवूया.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian fastfood like chickpeas grains makhane to boost energy and health hldc dvr
Show comments