“अंडी हे जगभरात लोकप्रिय अन्न आहे. ते अनेक प्रकारे शिजवायला सोपे आहेत आणि तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. “भारतात, अंड्यापासून कोणताही पदार्थ तयार करताना त्याला देशी पद्धतीने बनवले जातात, जसे की मसालेदार ऑम्लेट आणि अंड्याची भुर्जी, जे नाश्त्यात आणि जेवणात आवडीने खाल्ले जाते.
अलीकडेच जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अन्न आणि प्रवास मार्गदर्शक असलेल्या टेस्टॲटलासने भारतातील मसाला ऑम्लेटला जगातील सर्वोत्तम अंड्यांच्या पदार्थांमध्ये २२ व्या क्रमांकावर स्थान देऊन सन्मानित केले. यामध्ये जपानच्या तामागो सँडो आणि फ्रान्सच्या क्विचे लोरेनसह काही सर्वात प्रतिष्ठित अंड्यांच्या पदार्थांसह या पाककृतीला स्थान देण्यात आले.
“जपानचा अजितसुके तामागो (Ajitsuke Tamago), एक समृद्ध, चवदार मऊ-उकडलेले अंडे, यादीत वरच्या क्रमांकावर आहे. त्यानंतर फिलीपिन्सचा तोर्टांग तालोंग (Tortang Talong), एक चविष्ट एग्प्लान्ट ऑम्लेट आहे. तिसरे स्थान ग्रीसच्या स्टाका मे आयगा (Staka me Ayga) या पदार्थाला देण्यात आले आहे, जे खास बटर वापरून बनवलेले क्रिमी अंडे आहे.”
“मसाला ऑम्लेट हे अंडी, भाज्या आणि मसाल्यांचे एक चविष्ट मिश्रण आहे. ते भारतातील एक लोकप्रिय नाश्ता आहे, पण ते आरोग्यदायी आहे का? याबाबत पोषणतज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊ या…
मसाला ऑमलेटचे पौष्टिक फायदे (Nutritional benefits of masala omelette)
त्याच्या चवीव्यतिरिक्त, मसाला ऑम्लेट पौष्टिकतेच्या बाबतीतही एक उत्तम गुण आहे. सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षिका कनिक्का मल्होत्रा म्हणाल्या की, “त्यात उच्च प्रथिनेयुक्त घटक असल्याने, स्नायू तयार होण्यास, तृप्त होण्यास आणि रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत होते. तिने त्याचे फायदे सांगितले:
प्रथिनेयुक्त पदार्थ : मसाला ऑम्लेटमध्ये साधारणपणे १३-२४ ग्रॅम प्रथिने असतात, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि स्नायूंच्या वाढीला चालना द्यायची इच्छा असलेल्यांसाठी ते एक उत्तम पर्याय बनते.
लोह आणि पोटॅशियम समृद्ध : हे खनिजे निरोगी लाल रक्तपेशी राखण्यासाठी आणि शरीरातील द्रवपदार्थ संतुलित करण्यासाठी आवश्यक आहेत.
रक्तातील साखर नियंत्रणासाठी उत्तम : कमी कार्ब, उच्च प्रथिनेयुक्त रचना असल्यामुळे मसाला ऑम्लेट ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते.
तुम्ही दररोज मसाला ऑम्लेट खाऊ शकता का? (Can you eat masala omelette every day?)
याबाबत षोषणतज्ज्ञ मल्होत्रा म्हणतात : ‘संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा आनंद घ्या, परंतु ते दररोज खाऊ नका. वैविध्यपूर्ण आहारासाठी इतर निरोगी पदार्थांबरोबर त्याचे सेवन करा.'”
मसाला ऑम्लेट निर्विवादपणे पौष्टिक असले तरी दररोज ते खाल्ल्याने फायदे आणि संभाव्य तोटे दोन्ही आहेत, असा इशारा मल्होत्रा यांनी दिला.
फायदे :
१. प्रथिनांचा दैनिक डोस: मसाला ऑम्लेट हे स्नायूंच्या आरोग्यास आणि उर्जेला आधार देतो.
२. आवश्यक पोषक तत्वे: मसाला ऑम्लेट हे एकूण आरोग्यासाठी लोह आणि पोटॅशियम समृद्ध देते
३. रिफाइंड कार्ब्सचे प्रमाण कमी: मसाला ऑम्लेट हे मधुमेही आणि त्यांचे वजन नियंत्रित करणाऱ्यांसाठी योग्य आहार आहे.
तोटे :
मसाला ऑम्लेट कोणत्या पद्धतीनुसार बनवले आहे, त्यानुसार त्यात फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असू शकते. जास्त तेल किंवा बटर घातल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते.
अंड्यांमधून जास्त कोलेस्ट्रॉल हे आधीच हृदयरोग असलेल्यांसाठी आदर्श नसू शकते.
दररोज एकच पदार्थ खाल्ल्याने पौष्टिकतेत असंतुलन होऊ शकते, त्यामुळे विविधता महत्त्वाची आहे!
चांगल्या आरोग्यासाठी, तज्ज्ञ गरजेनुसार सेवन करण्याची शिफारस करतात. दररोजच्या सेवनाऐवजी, प्रथिने स्त्रोतांचे मिश्रण (जसे की मसूर, कॉटेज चीज आणि काजू) समाविष्ट केल्याने तुमचा आहार संतुलित राहू शकतो.