बोट धरून चालायला शिकविणारे, लहानाचे मोठे करणारे आई-बाबा लेकरांसाठी कधी ‘ओझं’ होऊन जातात हे कळतसुद्धा नाही. शिक्षण, नोकरी आणि मग संसारात गुंतलेल्या या तरुण मंडळींना आई-बाबांचा जणू काही विसर पडतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाच्या कथेत हाच विषय अधोरेखित करण्यात आला आहे. चित्रपटात ज्येष्ठ नागरिक गोविंद पाठक यांच्या एकुलत्या एक मुलाचे म्हणजेच अभयचे लग्न एका श्रीमंत तरुणीबरोबर होते. अभयचे सासरे मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी त्याची नियुक्ती करतात. पण, अभयने त्याच्या वडिलांच्या निवृत्तीचे पैसेही स्वतःच्या भविष्यासाठी गुंतविलेले असतात आणि त्यांचे व्यवहारसुद्धा तोच बघत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी बाबांना लेकाकडे फोन करून पैसे मागावे लागतात. एके दिवशी अभयच्या आईची तब्येत खूप बिघडते. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागते. बाबांनी वारंवार फोन करूनही अभय तेथे उपस्थित राहू शकला नाही आणि मदतदेखील करू शकला नाही. अखेर खूप उशीर होतो आणि आईचा मृत्यू होतो. मुलाला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी बाबा त्याला कोर्टात खेचतात, बरेच वाद-विवाद होतात. पण, शेवटी एकमेकांना समजून घेऊन, या चित्रपटाचा शेवटही गोड होतो.

आजच्या तरुण पिढीने यातून बोध घ्यावा, अशी या चित्रपटाची कथा आहे. पैसे कमवायचे, मुलेबाळे, पत्नीला वेळ द्यायचा की घरी राहून वृद्ध, आजारी आई-बाबांना सांभाळायचे अशा द्विधा मनस्थितीत अनेक तरुण मंडळी गुरफटलेली दिसून येतात. पण, गोंधळात टाकणाऱ्या या स्थितीतूनही पर्याय निघू शकतो हे अनेक जण बहुधा विसरूनच जातात. वृद्ध किंवा एखाद्या आजाराने ग्रस्त आई-बाबांच्या पाठीशी त्यांच्या लेकरांनी एक सावली म्हणून उभे राहणे नेहमीच आवश्यक असते. पण, घर चालविण्यासाठी नोकरीही तितकीच गरजेची असते. ही बाब लक्षात घेता, एका संस्थेने काही वर्षांपूर्वी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आणि पर्सनल केअरटेकर नर्सची (Personal Caretaker Nurse) सेवा सुरू केली.

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Prateik Babbar reveals he began using drugs at 13
“१३ व्या वर्षापासून ड्रग्ज घ्यायचो”, स्मिता पाटील यांच्या मुलाचा खुलासा; म्हणाला, “माझी कौटुंबिक परिस्थिती…”

सध्याच्या धावपळीच्या जीवनात रुग्णांची काळजी घेण्यासाठी पर्सनल केअरटेकर नर्सची मागणी वाढत चालली आहे. आज ‘जागतिक परिचारिका दिना’निमित्त (International Nurses Day) आज आपण केअर24 या संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या पर्सनल केअरटेकर नर्सच्या (Personal Caretaker Nurse) सेवेबद्दलची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत. ही संस्था कधी सुरु झाली, नोकरी करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांच्या आजारी, वृद्ध आई-वडिलांसाठी कोणत्या नर्सद्वारे येथे कोणत्या सुविधा पुरवल्या जातात याबाबत केअर24 सीओओ जगजीत सिंग यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बातचीत केली आहे.

हेही वाचा…मेंढी आणि शेळीच्या चीजबद्दल कधी ऐकलंय का? दररोज करू शकता सेवन; फायदे, तोटे सांगत तज्ज्ञांनी दिले उत्तर

आयआयटीचे (IIT) माजी विद्यार्थी विपिन पाठक, गरिमा त्रिपाठी आणि अभिषेक तिवारी यांनी २०१४ मध्ये ‘केअर24’ची स्थापना केली. शिक्षण वा नोकरीसाठी परदेशात राहणाऱ्या, कामानिमित्त दिवसभर बाहेर राहणाऱ्या कुटुंबियांच्या सदस्यांसाठी या संस्थेमार्फत आरोग्य सेवा घरापर्यंत पोहोचवली जाते. रुग्ण आणि वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. मुंबई, दिल्ली येथे संस्थेच्या शाखा आहेत. संस्थेने आजवर ६० हजारांहून अधिक कुटुंबांना मदत केली आहे. केअर24 ही संस्था तुमच्या प्रियजनांच्या हिताची नर्स, वॉर्डबॉय यांच्याद्वारे सतत काळजी घेत असते. त्यामुळे सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या गतीने, तुमच्या घरात उपचार घेण्याची संधी मिळते. या संस्थेच्या नर्स तुमच्या समस्येला, तुमच्या कुटुंबियांना जणू काही एक मायेचा खांदा देते, असे म्हणायला हरकत नाही.

परिचारिकांची निवड कशी होते ?

केअर24 ही संस्था तुमच्या प्रियजनांची उच्च दर्जाची काळजी घेतली जावी यासाठी अनुभवी परिचारिकांची निवड करते. या परिचारिकांची न्यायालय आणि गुन्हेगारी या दृष्टिकोनातून १०० टक्के पडताळणीसुद्धा केली गेलेली असते. तसेच किमान ५ प्लस वर्षांचा हॉस्पिटल आणि रुग्णांच्या काळजीचा अनुभव त्यांना असेल हे पाहिले जाते आणि रुग्णांना भावनिक आधार कसा द्यायचा याचे प्रशिक्षणही त्यांना दिलेले असते. रुग्णांच्या आजारांवर आधारित या परिचारिकांची निवड केली जाते. यामध्ये विविध प्रकार आहेत पहिला सहायक नर्सिंग आणि मिडवाइफरी (ANM) , जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) आणि बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग (BSc) इत्यादी. तसेच रुग्णांसाठी परिचारिका निडवण्यात दोन पर्याय दिलेले असतात.यामध्ये रुग्णांबरोबर २ ते ३ तास किंवा १२ ते २४ तास राहण्याची सेवा उपलब्ध असते.

वृद्ध व रुग्णांना सांभाळण्यासाठी परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाते का?

‘केअर24’चे एल्डर केअर सेवा (वृद्ध लोकांची सेवा) पुरविणारे क्लिनिकल कर्मचारी २४ तास वृद्धांची काळजी, सेवा प्रदान करण्यात निष्णात असतात. त्यांना ७० हून अधिक तास काळजी घेण्याचे, ४० हून अधिक तास प्रभावी संवादकौशल्यासाठी, तर ४२ हून अधिक तास रुग्ण आणि त्यांच्याभोवतीची एकंदर वैद्यकीय दृष्टीने परिस्थिती कशी हाताळावी तसेच वृद्धांच्या भावनिक, सामाजिक गरजा समजून घेण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

कोणत्या आजारांवर येथे उपचार केले जातात?

संधिवात, कर्करोग, स्मृतिभ्रंश, मधुमेह, पक्षाघात किंवा अर्धांगवायू, अल्झायमर्स, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे रोग, मेंदूला झालेली दुखापत, पार्किन्सन्स डिसीज या रुग्णांसाठी केअर24 संस्था कार्यरत आहे.

हेही वाचा…अपुऱ्या मिठाच्या सेवनाचा तुमच्या झोपेवर होतो थेट परिणाम? रोज आहारात किती मीठ असावं? पाहा तज्ज्ञ काय सांगतात

नर्सिंग सेवांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो?

होम केअर नर्सिंग सेवेमार्फत रुग्णांना त्यांच्या आजारांनुसार पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवा :

१. रुग्णांना वेळेवर औषधे देणे. २. आहाराची वेळ, त्यांचा डाएट प्लॅन ठरवणे. ३. जखम झालेल्या ठिकाणी मलमपट्टी करणे. ४. रुग्णांच्या महत्त्वाच्या लक्षणांचे निरीक्षण करणे. ५. नेब्युलायझेशनमार्फत रुग्णांना औषधे देणे. ६. रुग्णांसाठी कोलोस्टोमी बॅगची (कोलोस्टोमी बॅग ही पचनमार्गातून विष्ठा गोळा करण्यासाठी पोटाच्या येथे लावली जाते) व्यवस्था करणे. ७. रुग्णांची लघवी साफ करण्यासाठी वापरली जाणारी कॅथेटर बॅग्स स्वच्छ करणे. ८. इंट्राव्हेन्स औषधे व सलाईन लावणे आदी विविध सुविधा रुग्णांसाठी पुरविल्या जातात.

घरातील वृद्धांची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण- कालांतराने ते शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या कमजोर होऊन जातात. म्हणूनच ‘केअर 24’ अनुभवी केअरगिव्हर्स ऑफर करते; जे स्वत: स्वतंत्र आणि निरोगी जीवन जगण्यासाठी ज्येष्ठांना आवश्यक मदत करतात. ‘केअर 24’च्या परिचारिका योग्य संभाषण, घरगुती व्यायाम व मसाज करून देणे, अन्नाचे सेवन करताना व स्नान करताना रुग्णांना मदत करणे, फक्त रुग्णांचे वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे, दैनंदिन शारीरिक हालचालींमध्ये त्यांची मदत करणे, रुग्णांना ठेवण्यात आलेल्या खोली व बाथरूमची स्वच्छता, त्यांच्यासाठी जेवण बनविणे आदी अनेक गोष्टी करतात.

तसेच ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, वृद्ध, रुग्णांची सेवा करण्याव्यतिरिक्त कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यासाठी या सेवा परिचारिकांकडून पुरविल्या जात नाहीत. पर्सनल केअरटेकर नर्स ठेवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंगदेखील करू शकता. तसेच ‘केअर24’ तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या टॉप व्हेरिफाईड केअरगिव्हर्सचे काही पर्यायदेखील सुचवते. त्यात तुम्ही परिचारिका यांचे प्रोफाइल पाहू शकता; त्यामध्ये त्यांचे नाव, वय, अनुभव, शिक्षण, त्यांच्या कामासाठी किती स्टार रेटिंग आहे याची पडताळणी करून तुम्ही चौकशी करण्यासाठी कॉलदेखील करू शकता.

कोविड १९ (Covid-19) च्या महाभयंकर आजारा दरम्यान या परिचारिकांनी रुग्णांच्या घरी राहून दिवसभर पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज घालून त्यांची सेवा केली. ही गोष्ट एका कौतुकापेक्षा कमी नाही. तर आज ‘जागतिक परिचारिका दिना’निमित्त सेवा आणि समर्पण भावनेने प्रत्येक रुग्णाची काळजी घेणाऱ्या त्या प्रत्येक परिचारिकेच्या कामाला सलाम करून आपण त्यांना शुभेच्छा देऊ या.