बोट धरून चालायला शिकविणारे, लहानाचे मोठे करणारे आई-बाबा लेकरांसाठी कधी ‘ओझं’ होऊन जातात हे कळतसुद्धा नाही. शिक्षण, नोकरी आणि मग संसारात गुंतलेल्या या तरुण मंडळींना आई-बाबांचा जणू काही विसर पडतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाच्या कथेत हाच विषय अधोरेखित करण्यात आला आहे. चित्रपटात ज्येष्ठ नागरिक गोविंद पाठक यांच्या एकुलत्या एक मुलाचे म्हणजेच अभयचे लग्न एका श्रीमंत तरुणीबरोबर होते. अभयचे सासरे मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी त्याची नियुक्ती करतात. पण, अभयने त्याच्या वडिलांच्या निवृत्तीचे पैसेही स्वतःच्या भविष्यासाठी गुंतविलेले असतात आणि त्यांचे व्यवहारसुद्धा तोच बघत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी बाबांना लेकाकडे फोन करून पैसे मागावे लागतात. एके दिवशी अभयच्या आईची तब्येत खूप बिघडते. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागते. बाबांनी वारंवार फोन करूनही अभय तेथे उपस्थित राहू शकला नाही आणि मदतदेखील करू शकला नाही. अखेर खूप उशीर होतो आणि आईचा मृत्यू होतो. मुलाला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी बाबा त्याला कोर्टात खेचतात, बरेच वाद-विवाद होतात. पण, शेवटी एकमेकांना समजून घेऊन, या चित्रपटाचा शेवटही गोड होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा