Hemoglobin Boosting Drink: निरोगी आरोग्यासाठी अनेकजण पोषक आहार घेण्याचा प्रयत्न करतात. असे असूनही काही लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता असते. त्याच वेळी, लोहाची पातळी कमी झाल्यामुळे, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत लोहयुक्त काही पेयांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील रक्ताची कमतरता सहज पूर्ण करू शकता.

शरीरात रक्ताची कमतरता अनेक गंभीर आजारांना जन्म देऊ शकते. अशा परिस्थितीत अशक्तपणा, रक्त कमी होणे, गॅस, कमी ऊर्जा पातळी आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे यासारख्या समस्या दिसतात. त्यामुळे टाईम्स ऑफ इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, आम्ही तुम्हाला काही लोहयुक्त पदार्थांची नावे सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही तुमच्या आहारात तयार पेयांचा समावेश करून तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊ शकता.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Banke Bihari Mandir video AC water as charnamrit
चरणामृत समजून भाविक पितायत एसीचे पाणी; बांके बिहारी मंदिरातील धक्कादायक VIDEO
Is thirst a good predictor of dehydration
तहान लागते म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…

हलीम ड्रिंक

हलीम ड्रिंक चविष्ट तसेच लोहाने समृद्ध आहे. यासोबतच फोलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फायबर, कॅल्शियम आणि प्रोटीनही हलीम ड्रिंकमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. हे तयार करण्यासाठी अर्धा कप पाण्यात १ चमचा हलीम आणि २ चमचे लिंबाचा रस मिसळा. आता हे पेय २ तासांनंतर सेवन करा.

बीटरूट ज्यूस

बीटरूटलाही लोहाचा उत्तम स्रोत मानला जातो. याशिवाय पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज देखील बीटरूटमध्ये असते. या प्रकरणात, बीटरूटचा रस बनवण्यासाठी, २ मध्यम आकाराचे बीटरूट कापून घ्या. आता त्यात १ काकडी, १ इंच आले आणि लिंबाचा रस टाकून ज्युसरमध्ये बारीक करा. हे प्यायल्याने शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात. यासोबतच ऑक्सिजनचा पुरवठाही चांगला होऊ लागतो.

( हे ही वाचा: आतड्यांमधील जमलेली घाण झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ५ ज्यूस? सेवनाची ‘ही’ पद्धत जाणून घ्या)

पालक आणि पुदिन्याचा रस

शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही पालक आणि पुदिन्याचा रस पिऊ शकता. हे करण्यासाठी ४ कप चिरलेल्या पालकमध्ये १ कप पुदिन्याची पाने आणि पाणी घालून बारीक करा, आता हे मिश्रण गाळून घ्या. नंतर त्यात १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा जिरेपूड घालून बर्फाच्या तुकड्यांसोबत सर्व्ह करा. हे वजन कमी करण्यास देखील मदत करेल.

भाज्यांचा रस

जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने समृद्ध भाज्यांच्या रसाचे सेवन शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यासही मदत करते. अशावेळी २ कप चिरलेल्या पालकमध्ये १ कप चिरलेला पडवळ, १/४ कप आवळा, १ चमचे मध आणि २ कप थंड पाणी मिसळा आणि मिश्रण करा. तुमचा भाजीचा रस तयार आहे.