Is 70 Hours Work Per Week Good For Health: थ्री वन फोर कॅपिटलचा पॉडकास्ट ‘द रेकॉर्ड’मध्ये इन्फोसिसचे माजी CFO मोहनदास पै यांच्याशी नारायण मूर्ती यांनी बातचीत केली होती. राष्ट्र उभारणीपासून तंत्रज्ञान, आजची तरुणाई आणि त्यांची कंपनी इन्फोसिस अशा अनेक विषयांवर त्यांनी आपली मते मांडली. हे पॉडकास्ट यूट्यूबवर रिलीज केल्यावर नारायण मूर्ती यांच्या एका विधानाची प्रचंड चर्चा रंगली आहे. नारायण मूर्ती म्हणाले की, “देशाची कार्य उत्पादकता वाढवण्यासाठी तरुणांना पुढे यावे लागेल. मला आठवड्यातून ७० तास काम करायला आवडेल. आपल्याला शिस्तबद्ध राहण्याची आणि कामाची उत्पादकता सुधारण्याची गरज आहे. प्रत्येक सरकार लोकांच्या संस्कृतीइतके चांगले असते. आणि आपली संस्कृती अत्यंत दृढनिश्चयी, अत्यंत शिस्तप्रिय आणि अत्यंत मेहनती लोकांची असायला हवी.”

मूर्ती यांच्या विधानांनंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. जर ७० तास काम करायला सुरुवात केली तर स्वतःसाठी काय वेळ उरणार आहे? आम्ही आमच्या आरोग्याची पण काळजी घ्यायची नाही का? असेही काहींनी म्हटले आहे. तीन चार लाख वार्षिक कमाईच्या नोकरीत आपल्या आठवड्यातील ७० तास घालवणे हे खरंच योग्य आहे का? असाही प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे. या एकूणच प्रकारावर नेमकं तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे, डॉक्टरांच्या मते अशा प्रकारची कार्यप्रणाली आरोग्यला घातक ठरू शकते का? हे जाणून घेऊया..

Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
success story Of IPS Shakti Awasthi In Marathi
कोण आहे ‘हा’ आयपीएस अधिकारी? ज्यांना मुलाखतीत विचारला होता ‘3 Idiots’ चित्रपटाशी संबंधित प्रश्न
Maharashtra hospitals loksatta news
दोन कोटींनी वाढली बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
What to do after waking up in the morning for health
निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर काय करावं? आरोग्यतज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स

डॉ. अविनाश सुपे यांनी लोकसत्ताला सांगितले की, “साधारणपणे भारतात ८ तास प्रत्येक दिवशी या हिशोबाने आपण आठवड्यातील ४० ते ४८ तास काम करतोय. अर्थात कंपनीच्या प्रकारानुसार सुद्धा यात फरक पडतो. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात, निवासी डॉक्टर असताना आम्ही स्वतः ११० ते १२० तास काम केलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कामाची वेळ यावर युरोप आणि अमेरिकेत २००० साली चर्चा झाली होती त्यानंतर युरोप मध्ये आठवड्यातील ५० ते ५६ तास तर अमेरिकेत आठवड्यात ८० तासापर्यंत काम करण्यास हरकत नाही असे ठरवण्यात आले होते. अजूनही काहीवेळा सर्जरी व ऑपरेशनसाठी १० ते १२ तासांसाठी काम करावे लागते पण अशावेळी काही गोष्टींची काळजी घेऊन काम करताना सतर्कता व ऊर्जा टिकवून ठेवता येते.

दिवसाला आपण १० ते १२ तास नक्कीच काम करू शकतो, पण त्यासाठी सलग काम न करता अर्धा तास- ४० मिनिटांचा एक मोठा ब्रेक व मध्ये मध्ये पाच- दहा मिनिटांचे काही ब्रेक घ्यायला हवेत. कार्यक्षमतेवर वातावरणाचा सुद्धा प्रभाव असतो, अत्यंत उष्ण किंवा दमट वातावरणात काम नीट करता येत नाही त्यामुळे तुमच्या आजूबाजूला साजेसे वातावरण आहे याची खात्री तुम्हीच करायला हवी. कामासह झोप व आहाराचा ताळमेळ बसवावा, २४ तासांपैकी निदान ७ ते ८ तास झोपेसाठी द्यायलाच हवेत तसेच आहार सुद्धा संतुलित असल्यास कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. काम करण्यासाठी तुम्ही मेंदूला कसे तयार करता हा सवयीचा भाग आहे.

हे ही वाचा<< २४ वर्षीय तरुणाचा शॉवर्मा खाल्ल्याने मृत्यू! शॉवर्मा विषारी कशामुळे होतो व तुम्ही कोणती काळजी घ्यावी? 

त्यामुळे ७० तास किंवा प्रसंगी त्याहून पाच- सात तास अधिक काम करणे हे शरीरासाठी तितकेसे घातक नाही पण अशावेळी संस्थांनी कर्मचाऱ्यांचा प्रवासासाठी लागणारा वेळ कमी करायला हवा. तसेच अतिरिक्त कामासाठी अतिरिक्त मोबदला मिळत असल्यासच कर्मचाऱ्यांना कामाचा उत्साह वाटू शकतो हे ही समीकरण लक्षात घ्यायला हवे.

Story img Loader