Monotropic Diet: रोज एकाच प्रकारचे अन्न पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते का? मोनोट्रॉपिक आहार ज्याला सिंगल फूड डाएट या नावानेदेखील ओळखले जाते. सध्या ही आहार पद्धत खूप प्रचलित झाली असून अनेक जण आपल्या खाण्यात एकाच प्रकारचे फळ जसे की, केळी किंवा एकाच प्रकारचे खाद्यपदार्थ खातात.
मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही फक्त एकच अन्न खाता, जरी ते अन्न उच्च-कॅलरी असले तरीही तुमच्या एकूण कॅलरीजचे प्रमाण कमी होईल. परंतु, हे तात्पुरते आहे आणि वजन सहजपणे परत वाढते. याशिवाय, असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.
मोनोट्रॉपिक आहार म्हणजे काय?
मोनोट्रॉपिक आहारामध्ये ठराविक कालावधीसाठी फक्त एकाच प्रकारचे अन्नपदार्थ खाल्ले जातात. यामध्ये केळी, सफरचंद यांसारख्या फळांपासून ते बटाटे, रताळे यांसारखी कोणतीही फळं, कंदमुळं आणि पदार्थ असू शकतात. या आहारामागील कल्पना खाणे सोपे करणे आणि कॅलरीजचे सेवन मर्यादित करून वजन कमी करण्यास प्रोत्साहन देणे, अशी आहे.
मोनोट्रॉपिक आहाराची उदाहरणे
१. बटाटा
यामध्ये काही काळासाठी फक्त बटाटा खाल्ला जातो. कारण ते जटिल कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि काही आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे चांगले स्रोत आहेत.
२. केळी
ठराविक कालावधीसाठी फक्त केळी खाणे आवश्यक आहे; कारण ते पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी आणि बी६ आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत.
३. अंडी
अंड्यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन-डी आणि बी-१२ आणि जस्त आणि लोह यांसारख्या खनिजांचा चांगला असतो. त्यामुळे काही कालावधीसाठी फक्त अंडी खाल्ली जातात.
मोनोट्रॉपिक आहाराचे फायदे काय?
काही जणांचे या आहाराच्या प्रतिबंधात्मक स्वरूपामुळे सुरुवातीला वजन कमी होऊ शकते. एकच अन्न खाल्ल्याने कॅलरीजचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. तसेच अन्न संवेदनशीलता किंवा असहिष्णुता ओळखण्यात मदत होते.
हेही वाचा: तुमच्या परफ्युममुळे तुमची मान काळी पडतेय? वाचा तज्ज्ञ काय सांगतात..
मोनोट्रॉपिक आहाराचे तोटे काय?
फक्त एकाच प्रकारचे अन्न पदार्थ खाल्ल्याने शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. कारण कोणत्याही एकाच प्रकारचे अन्न सर्व आवश्यक पोषक पुरवत नाही. यामुळे थकवा, अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
एकच अन्न पदार्थ वारंवार खाल्ल्याने कंटाळा येऊ शकतो. त्याचप्रमाणे, विशिष्ट अन्न गट टाळल्याने लालसा वाढू शकते आणि जास्त खाणे किंवा जास्त प्रमाणात खाणे होऊ शकते. प्रतिबंधात्मक आहारामुळे आतड्यांतील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे पचन समस्या आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
केवळ संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार, ज्यामध्ये संपूर्ण अन्नपदार्थ, नियमित व्यायाम आणि झोपेची वेळ यांचा समावेश आहे, यामुळेच उत्तम आरोग्य आणि शाश्वत वजन कमी होऊ शकते.
© IE Online Media Services (P) Ltd