निसर्गातील वैविध्य सगळ्यांनाच भावते आणि अचंब्यात टाकते. जसे कुत्रे, मांजरी असे पाळीव प्राणी आहेत तसेच काही प्राणी हे कोणाच्याही संपर्कापासून दूर पाळणारे, लाजाळू असे आहेत. कासवाला हात लावला तर कासव आपले शरीर कवचाखाली ओढून घेते आणि जणू आपल्या कोशात जाते. सशाचे तर वर्णन आपण लहानपणापासूनच ‘भित्रा’ असे करतो. केवळ प्राणीच नाहीत तर काही वनस्पतीही स्पर्शापासून दूर जातात. आपल्यापैकी अनेकांनी लाजाळूचे झाड पहिले असेल. त्याला स्पर्श केला की त्याची पाने मिटतात आणि पुन्हा काही वेळाने उघडतात.

लाजाळू असण्याचा गुणधर्म अशा प्रकारे प्राणी आणि वनस्पती यात आढळतो. पण माणसाळलेले कुत्रे आणि मांजरी कधी कधी इतरांच्या संपर्काला भिऊ लागतात आणि अपरिचित माणसाच्या स्पर्शाला, संपर्काला घाबरतात आणि टाळतात. एखादा आलेला अनिष्ट अनुभव याला कारणीभूत होतो. गमतीत मुलांनी खोड काढली, त्रास दिला म्हणून एखादे मांजर इकडेतिकडे भटकणे बंद करते, तर एखादा कुत्रा हा स्वभावतःच भित्रा असतो.

article nobel prize winner south korean author han kang
विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
chandrakant handore
बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्याचे प्रकरण : काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला उच्च न्यायालयाकडून दिलासा
Painkillers side effects advantage disadvantage overusing painkillers harming your stomach and kidney
डोकेदुखी, पोटदुखी झाली की लगेच पेनकिलर घेताय? अतिवापरामुळे होऊ शकतो आरोग्याला धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
In sambhajinagar minor girl is caught driving scooty shocking video
“मुलांआधी पालकांना शिकवा” संभाजीनगरमध्ये चिमुकलीच्या हातात गाडी देऊन वडील निवांत; VIDEO पाहून संतापले लोक
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
Sassoon hospital
बालकांच्या आनुवंशिक आजारांचे आता वेळीच निदान! ससूनमध्ये गरीब रुग्णांसाठी स्वस्तात सुविधा सुरू
Vice Chancellor Madhuri Kanitkar said counseling by psychiatrists is necessary to reduce mental stress
आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य हेल्पलाईन!

हेही वाचा… Health Special: पावसाळ्याच्या आरंभी निरोगी राहण्यासाठी ‘हे’ अवश्य करावे!

निसर्गातले प्राणी, वनस्पती आणि माणसे यांच्यामध्ये अनेक साम्ये आढळतात. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. परंतु काही जणांना ह्या सामाजिक परस्परसंवादाचे (social interactions) वावडे असते, किंबहुना त्याची एक भीती मनात असते. अशांना आपण भिडस्त असे संबोधतो. भिडस्तपणा हा अंगभूत स्वभावाचा भाग असू शकतो, तसेच भिडस्तपणाचा मानसिक विकार असू शकतो. भिडस्तपणा हा मनोविकार? अनेकांना आश्चर्य वाटू शकते, कारण बहुतेकवेळा कोणी लाजाळू असेल, खूप मिळूनमिसळून न वागणारे असेल, समारंभांमध्ये फारसे सामील होणारे नसेल तर ‘आमची मुलगी म्हणजे लाजाळूचे झाड आहे हो!’ किंवा ‘आमच्या भावाचा स्वभाव पहिल्यापासूनच भिडस्त!’ असे ‘लेबल’ दिले जाते आणि आयुष्यभर ती व्यक्ती त्या लेबलचा मुकाट्याने स्वीकार करते.

वयाच्या पाचव्या वर्षापासूनसुद्धा असा भिडस्तपणा दिसून येऊ शकतो, पण साधारणतः पौगंडावस्थेत लोकांमध्ये मिसळण्याची लाज वाटायला सुरुवात होते. आपल्या हालचाली, बोलणे, वागणे यांचे इतर लोक परीक्षण करतील अशी भीती मनात निर्माण होते. आपल्या वागण्यावर उदा. बोलण्यावर, खाण्याच्या पद्धतीवर टीका होईल आणि मग आपल्याला लाजिरवाणे वाटेल अशी भीती समाजात वावरताना सतत मनात असते. अशा भीतीमुळे शारीरिक लक्षणेही निर्माण होतात, जसे छातीत धडधडणे, घाम फुटणे आदी या भीतीचा परिणाम शिक्षणातल्या, कामातल्या कामगिरीवर होतो, समजत वावरणे कठीण होते. स्वभाव लाजाळू किंवा भिडस्त असेल, तर आपल्या आपल्या सामाजिक वर्तुळात ती व्यक्ती सहजपणे वावरते आणि आपल्याला ज्या प्रसंगांना सामोरे जाणे कठीण आहे उदा. स्टेजवर उभे राहून नृत्य करणे अशा प्रकारचे छंद जोपासण्यापेक्षा चित्रकला शिकणे अधिक पसंत करते.

हेही वाचा… Health Special: ‘Algophobia’, वेदनेचा बागुलबोवा म्हणजे काय?

सामाजिक व्यवहारात भिडस्तपणा आणि भीती (social anxiety disorder) एक मनोविकार म्हणून मनोविकारतज्ज्ञापुढे उभा राहतो, तेव्हा त्या भिडस्तपणाचा पेशंटच्या जीवनाच्या गुणवत्तेवर होणारा अनिष्ट परिणाम प्रामुख्याने जाणवतो. केवळ लोकांमध्ये मिसळणे आवडत नाही असा प्रश्न नसतो, तर लोक आपले वागणे बोलणे पाहून आपल्यावर टीकाटिप्पणी करतील आणि तेच आपल्याला लाजिरवाणे असेल, अपमानित करणारे असेल अशी भीती जीवनाच्या सगळ्या पैलूंवर विपरीत परिणाम करते. किंबहुना जेव्हा शिक्षणाची एखादी संधी हुकते किंवा नोकरीतील आव्हाने पेलणे कठीण होते तेव्हाच पेशंट उपचार करण्यासाठी येतो.

समीरसारखा एखादा येऊन भेटतो कारण त्याला आवडणाऱ्या मुलीशी त्याला बोलताच येत नाही, पुढे होऊन तिला मनातल्या भावना सांगणे काही केल्या जमत नाही आणि ती दुसऱ्या कोणाबरोबर गेली तर ही भीती सतत मनाला सतवत राहते. मग अभ्यासात लक्ष लागत नाही, झोप लागत नाही, काहीच करावेसे वाटत नाही. शलाका अतिशय कर्तृत्ववान म्हणून कंपनीत बढती मिळते. पण आता कामाचे स्वरूप बदलते. केवळ स्वतःचे काम करताना आत्मविश्वासाने वागणारी शलाका आता सतत ताणाखाली असते, कारण आता हाताखाली काम करणाऱ्यांशी संवाद साधणे अपेक्षित असते, वरिष्ठांसमोर सादरीकरण करणे अपेक्षित असते.

हेही वाचा… Health Special: सविराम उपास म्हणजे काय?

आपण बॉस आहोत, म्हणजे आपले कपडे, चेहरा, वागायची पद्धत या सगळ्याकडे इतरांचे सूक्ष्म लक्ष असणार, त्यांना आवडले नाही तर ते नाके मुरडणार आणि मग आपण अपमानित होणार ही सतत भीती मनात निर्माण होते आणि कामाला जाणेच शलाका टाळू लागते. सामजिक भिडस्तपणा असलेल्यांपैकी अनेकांच्या घराण्यात अतिचिंतेचा विकार, विशेषतः Panic disorder हा विकार दिसून येतो. घरातले वातावरण अतिकडक, कठोर, पालक सतत वर्चस्व दाखवणारे असले तर भिडस्तपणा निर्माण होऊ शकतो. जसे एखाद्या मांजराला आलेल्या अनिष्ट अनुभवामुळे भीती निर्माण होते, तसेच अनिष्ट अनुभवांच्यामुळे भिडस्तपणा येऊ शकतो.

औषधांचा चांगला उपयोग होतोच. त्याबरोबरच वागणे आणि विचार या मध्ये परिवर्तन यावे यासाठी मानसोपचाराच्या सहाय्याने बरेच आणि सातत्याने प्रयत्न करावे लागतात. एखादी गोष्ट टाळणे सहज जमू शकते, उदा. समारंभांना न जाणे, पण समारंभांना जाऊन तिथे चार लोकांशी ठरवून बोलणे, आपल्या बोलण्या-वागण्यावर टीका होईलच असे नाही, हे समजून घेऊन लाजिरवाणे वाटण्याची गरज नाही ह्याचा अनुभव घेणे, त्यातून आत्मविश्वास वाढणे अशा टप्प्यांमधून होत जाणारी प्रगती पेशंटला खरे समाधान देते, आयुष्यातल्या विविध प्रसंगांमध्ये अडचण ठरणाऱ्या भिडस्तपणावर मात करायला शिकवते.