कडक उन्हाळ्यात दही ही तुमची आवडती गोष्ट आहे का? जेव्हा तापमान वाढते तेव्हा आपल्यापैकी बरेच जण थंडगार दह्याचा आनंद लुटतात. पण, तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, दही खरोखरच थंड आहे की ते शरीरामध्ये उष्णता वाढवते?
कंटेन्ट क्रिएटर डॉ. निशांत गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यात नमूद केले आहे, “उन्हाळ्यात दही तुमचे शरीर थंड ठेवत नाही. कारण- दह्याचा गुणधर्म उष्ण आहे.” त्याबाबत असहमती दर्शवीत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना कार्यात्मक औषध तज्ज्ञ (functional medicine expert) शिवानी बाजवा यांनी सांगितले, “उन्हाळ्यात दही खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण- दही आपल्याला ताजेतवाने ठेवतेच; पण ते पचनासाठीही फायदेशीर आहे. दही शरीराला थंड ठेवण्यास मदत करते आणि कॅल्शियम व प्रो-बायोटिक्ससारखे आवश्यक पोषक घटकदेखील पुरवते; जे आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.”
हेही वाचा – ईशान किशनला प्रवास केल्यानंतर थकवा का जाणवतो; Travel Fatigue ची लक्षणे आणि त्यावरील उपाय काय हे जाणून घ्या
मिराकोलो हॉस्पिटॅलिटीचे संस्थापक व सीईओ शौभम गर्ग म्हणाले, “हा व्हिडीओ चुकीचा नसला तरी एखाद्याचा दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी तो अंशतः बदललेला दिसत आहे. होय, उन्हाळ्यात दही खाणे शरीरासाठी चांगले असते. दह्याचे शीत गुणधर्म आणि अनेक आरोग्यदायी फायद्यांमुळे विशेषतः उष्ण हवामानात याची शिफारस केली जाते.”
दही खाल्ल्याने उष्णतेशी संबंधित समस्या टाळता येतात आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. पण, दही खराब होऊ नये आणि ताजे राहावे म्हणून ते व्यवस्थित साठवले आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. एकूणच दही तुमच्या उन्हाळ्याच्या आहारात समाविष्ट केल्याने तुम्हाला थंड आणि निरोगी राहण्यास मदत होईल, असे बाजवा यांनी सांगितले.
हेही वाचा – रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ६ पर्यंत जेवण केल्यास तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
दह्याचे सेवन केल्यास शरीरावर कसा प्रभाव पडतो?
हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्स बंजारा हिल्स क्लिनिकल डाएटिशियन सुषमा म्हणाल्या, “दह्याचा शरीरावर थंड प्रभाव पडतो. हे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते आणि उन्हाळ्याच्या उष्णतेपासून आराम देते.”
मुंबईतील सल्लागार आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षक पूजा शाह भावे यांनी नमूद केले, “दही थंड दिसते; पण आयुर्वेदानुसार ते उष्ण अन्न आहे. पचनानंतर शरीरावर त्याचा उष्ण प्रभाव पडतो.”
उष्ण हवामानात दह्याचे सेवन केल्यास पचनावर कसा परिणाम होतो?
मांबा रेस्टो बारच्या मालक श्रिया नायक म्हणाल्या, “दह्यामध्ये प्रो-बायोटिक घटक असतात; ज्यामुळे उष्ण हवामानात पचन होण्यास मदत होते; जे आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते आणि पचनासंबधित समस्या टाळते.”
उष्ण हवामानात दही शरीराला फायदेशीर प्रो-बायोटिक्स पुरवून पचन सुधारते; जे आतडे निरोगी ठेवते. दह्यातील चांगले जीवाणू अन्न अधिक कार्यक्षमतेने पचवण्यास मदत करतात आणि आतड्यांचे आरोग्य संतुलित ठेवते. दही पोटाला शांत करते आणि पोट फुगणे, बद्धकोष्ठता व अपचन यांसारख्या सामान्य पाचन समस्या टाळते, असे बाजवा म्हणाले.
हेही वाचा – मासिक पाळीदरम्यान महिलांनी उपवास करावा का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
उन्हाळ्यात दही खाण्याशी संबंधित धोके
दही हे सर्वसाधारणपणे सुरक्षित व फायदेशीर असले तरी सुषमा यांनी सांगितलेल्या काही बाबी खालीलप्रमाणे :
- लॅक्टोज इन्टॉलरन्स : ज्यांना दूध पचत नाही किंवा लॅक्टोज इन्टॉलरन्स आहे, त्यांना दह्याच्या सेवनामुळे पचनाशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो.
- आम्लता : काही व्यक्तींना दह्यामुळे आम्लपित्त किंवा छातीत जळजळ होणे यांसारखा त्रास शकतो.
- खराब दही : दही खराब होऊ नये किंवा ताजे राहण्यासाठी ते योग्यरीत्या साठवले आहे ना याची खात्री करा; विशेषतः उष्ण हवामानात. हे हानिकारक जीवाणूंना वाढण्यापासून आणि तुम्हाला आजारी पडण्यापासून रोखण्यास मदत करते.
काही आरोग्यविषयक समस्या असलेल्या लोकांनी उन्हाळ्यात दही टाळावे का?
दही किंवा आंबट अन्न किंवा लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्यास ज्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास (sensitive cold and cough reactions) असलेल्या लोकांनी दही टाळावे. संधिवात, ऑस्टियोआर्थराइटिस किंवा गाउट (gout) या आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी दही मर्यादित प्रमाणात खावे आणि ताक पिण्यास प्राधान्य द्यावे. दही ‘वात’ वाढविणारे अन्न म्हणून ओळखले जात असल्याने या स्थितीत सामान्यतः जळजळ वाढू शकते, असे भावे यांनी स्पष्ट केले.
ॲलर्जीक दमा किंवा ब्राँकायटिस किंवा दीर्घकाळापासून यकृताचा आजार असलेल्यांनी कोणत्याही ऋतूमध्ये दही मर्यादित प्रमाणातच खावे. काही अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, दही घेतल्याने यकृताचा दीर्घकाळापासून आजार असलेल्या रुग्णांमध्ये बिलिरुबिनची पातळी (bilirubin levels) बिघडू शकते, असेही भावे यांनी स्पष्ट केले.
उन्हाळ्याच्या आहारात दह्याचा समावेश कसा करता येईल?
उन्हाळ्याच्या आहारात दही अनेक प्रकारे सहज समाविष्ट करता येते. साधे मीठ किंवा साखर टाकून दह्याचा आनंद घ्या. स्वादिष्ट स्नॅकसाठी आंबा किंवा बेरीसारखी ताजी फळे त्यामध्ये टाका. स्मूदी किंवा लस्सी करूनही तुम्ही पिऊ शकता, असे बाजवा म्हणाले.
फक्त खोलीच्या तपमानावर ताजे तयार दही घ्या. तसेच उन्हाळ्यात ताक जास्त सुखदायक असते. मुगाच्या पाण्याबरोबर दही कढी म्हणून घेता येते. दही आंबट आहे म्हणून त्यात साखर टाकू नये. दही आंबट झाले, तर कढी बनवा किंवा ओट्समध्ये घाला किंवा त्याऐवजी बाजरीचे पॅनकेक्स, डोसा किंवा इडली घाला, असे भावे यांनी सुचवले.
दही हे थंड गुणधर्म, पाचक फायदे आणि अष्टपैलुत्व यांमुळे ते एखाद्याच्या उन्हाळ्याच्या आहारात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत फायदेशीर असे अन्न आहे. गर्ग म्हणाले की, “आरोग्यास होणारे कोणतेही धोके टाळण्यासाठी लोकांनी ताज्या दह्याचे सेवन करणे योग्य आहे.”