Dandelion Tea: कंबरदुखीपासून सुटका मिळावी यासाठी सोशल मीडियावर तुम्ही अनेक उपाय पाहिले असतील. पण, डँडेलियन चहादेखील कंबरेसाठी फायदेशीर ठरू शकतो का? डँडेलियन चहा पित्त उत्पादनास चालना देऊन पचनास फायदेशीर मानला जातो, तसेच डँडेलियन चहा हा सूज कमी करण्यावर चांगला उपचार म्हणून ओळखला जातो. सूज कमी करण्यासाठी तो कसा फायदेशीर ठरू शकतो. हे आपण जाणून घेऊ
सूज कमी करण्यासाठी डँडेलियन चहा किती फायदेशीर ठरतो?
आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षिका कनिक्का मल्होत्रा यांच्या मते, “डँडेलियन चहा हा त्याच्या लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या औषधी वैशिष्ट्यामुळे सूज कमी करण्यास मदत करू शकतो; जो पाण्याची प्रतिधारणा कमी करण्यास मदत करतो. तसेच, लघवीचे वाढलेले उत्पादन सूज येण्याशी संबंधित पूर्णत: किंवा फुगीरपणाची भावना कमी करण्यास मदत करू शकतो.”
सूज येण्याच्या उपचारावर डँडेलियन चहाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध प्रकारे पाहायला मिळतो. काही लोकांना यामुळे आराम वाटू शकतो; परंतु इतरांमध्ये फारसा चांगला बदल दिसणार नाही. सावधगिरी बाळगणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण- डँडेलियन चहा काही औषधांमध्ये व्यत्यय आणू शकतो किंवा काही लोकांमध्ये ॲलर्जीची प्रतिक्रिया निर्माण करू शकते. जर सूज कायम राहिली, तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल रोग, अन्न असहिष्णुता किंवा इतर आरोग्य समस्या यांसारखी अंतर्निहित कारणे दूर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा: १.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
रॅगवीड किंवा त्यासंबंधित वनस्पतींची अॅलर्जी असलेल्या लोकांना तसा त्रास जाणवू शकतो. त्याव्यतिरिक्त किडनी किंवा लिव्हरची वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींनी डँडेलियन चहा घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे की, डँडेलियन चहा लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. तसेच हा चहा रक्त पातळ करणारा आणि रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या औषधांसह इतर काही बाबतीत औषधाप्रमाणे वापरला जाऊ शकतो.
बडीशेपचा चहादेखील सूज येणे आणि गॅस कमी करण्यासदेखील मदत करू शकतो. त्याशिवाय आल्याचा चहा पचनास आणि सूज कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतो. कारण- उपयुक्त जीवाणू आतड्याचे आरोग्य सुधारू शकतात आणि सूज कमी करू शकतात, असे कनिक्का म्हणाल्या.