वजन कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. पण उपवास केल्यावर वजन झटपट कमी होतं का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. शरीर पिळदार होण्यासाठी वजन कमी करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी उपवास करणे फायदेशीर ठरतं, असं काही तज्ज्ञाचं मत आहे. उपवास केल्याने शरीरात असणाऱ्या कॅलरिज तात्पुरत्या स्वरुपात नष्ट होतात. तुम्ही किती कॅलरीचं सेवन करता आणि किती कॅलरी बर्न करता, यावर वजन कमी करण्याचं गणित अवलंबून असतं. अशातच उपवास केल्यावर कॅलरीचं प्रमाण कमी होतं आणि वजन कमी हेण्यास मदत होते. उपवास केल्यावर तुमचं वजन खरंच कमी होतं का? याबाबत मुंबईच्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयातील चिफ डाएटिशियन भक्ती सामंत यांनी मार्गदर्शन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपवास करणं बंद केल्यावर अनेक लोकांचं वजन झपाट्यानं वाढलं असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. यामागचं कारण असं आहे की, उपवास बंद केल्यामुळं शरीरातील कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण कमी होतं. उपवास केल्यानं तुम्हाला वजन कमी करण्यास काही प्रमाणात फायदा होतो, असं काही लोकांचं म्हणणं आहे. कारण व्यायाम करत असताना तुमच्या शरीराला एनर्जी मिळण्यासाठी प्रथिनयुक्त पदार्थांचं सेवन करणंही तितकच महत्वाचं असतं. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला संतुलित आहार, व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ आणि पुरेशी झोप आवश्यक असते.

नक्की वाचा – Health Special: डोळ्यावर वेल वाढणे म्हणजे काय?

अचानक उपवास सुरु केल्यावर चयापच प्रक्रियेवर परिणाम होतो, काही लोक अशाप्रकारच्या चुका करतात आणि आरोग्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे शरीरातील रक्तस्त्राव आणि श्वास घेण्यासही अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण शरिरीक प्रक्रिया योग्य प्रकारे सुरु राहण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या असतात. शरीरात आवश्यक्यतेनुसार अन्नाचं ग्रहण झाल्यास व्यायाम करून कॅलरी बर्न करणे सोपे जाते. परंत, जी माणसं उपवास करतात, त्यांच्यापैकी काही लोक उपवासादरम्यान योग्य पदार्थांची निवड करत नाहीत. काही लोक कोणत्याही पदार्थांचं सेवन न करता उपवास करतात. मात्र, उपवास करत असताना हाय कॅलरी फूडचं सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवास करत असताना योग्यप्रकारे कॅलरी बर्न होतील, याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं असतं.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is fasting really the best remedies for quickly weight loss know from the health experts fasting benefits to human body nss