नागीण या आजाराबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. नागीण हा आजार कसा होतो, त्यासंदर्भात अंधश्रद्धा काय आहेत याबाबत पहिल्या लेखात आपण समजून घेतलं. या लेखात या आजारावरील उपचार, लसीकरण याबाबत जाणून घेऊया.

एखाद्याला नागीण झाल्यास त्याच्यापासून दुसऱ्या व्यक्तीला नागीण होणार नाही. परंतु नागीण व कांजिण्यांचे विषाणू एकच असल्यामुळे नागीण झालेल्या व्यक्तीपासून दुसऱ्यांना कांजिण्या होऊ शकतात. नागिणीच्या सुरुवातीला जेव्हा हे फोड पाणी भरून असतात तेव्हा त्याची लस दुसऱ्यांना लागल्यास त्यांना कांजिण्या होऊ शकतात. एकदा तिथे खपल्या धरल्या की नंतर मात्र त्या व्यक्तीपासून दुसऱ्यांना संसर्ग व त्यामुळे कांजिण्या होऊ शकत नाहीत. नागीण झालेल्या व्यक्तीने फोड असलेला भाग शक्यतो झाकून ठेवावा व तिथे मलम लावण्यासाठी हात लावल्यास हात लगेच साबणाने स्वच्छ धुवावेत व आपल्याजवळ लहान मुलांना येऊ देऊ नये. तसेच आपण जिथे झोपतो अशा ठिकाणी दुसऱ्यांना झोपण्यास देऊ नये. जेणेकरून त्यांना कांजण्या होण्याची शक्यता कमी राहील.

Radikaa Sarathkumar says men secretly record videos of actresses in the nude
“अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात,” ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा दावा; म्हणाल्या, “माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
Madhabi Puri Buch
Madhabi Puri Buch : माधवी पुरी बुच यांच्याविरोधात सेबी कर्मचारी आक्रमक; निदर्शने करत राजीनामा देण्याची केली मागणी
आहार उन्हाळ्याचा
90-foot tall bronze statue of Lord Hanuman becomes new landmark in Texas
Statue of Union: महाबली हनुमानाची सर्वात उंच मूर्ती भारतात नाही तर ‘या’ देशात; काय आहेत या मूर्तीची वैशिष्ट्य?
MPSC, MPSC examinees, MPSC latest news,
स्पर्धा परीक्षार्थींना दिलासा… राज्य शासनाकडून ते’ परिपत्रक रद्द

हेही वाचा – Health Special: नागिणीचा विळखा पूर्ण झाला की… या भीतीमध्ये खरंच किती तथ्य? – डॉ. किरण नाबर, त्वचाविकारतज्ज्ञ

नागीणवर उपचार काय?

नागीण हा विषाणूजन्य आजार आहे व त्यासाठी असायक्लोवीर, फॅमसायक्लोवीर आणि वालासायक्लोवीर अशा प्रकारच्या विषाणूविरोधी औषधांचा वापर केला जातो. पण नागीण झाल्यानंतर रुग्ण पहिल्या तीन-चार दिवसांमध्ये आल्यास या औषधांचा उपयोग चांगला होऊ शकतो. त्यामुळे नागीण झाल्यास आयुर्वेदिक औषधे, झाडपाला, गावठी औषधे यामध्ये उगाच वेळ न दवडता लवकर अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांकडे जाऊन औषधे चालू करणे योग्य. तसे न केल्यास नागीण बरी होण्यासाठी दिवसही बरेच लागतात. शिवाय, त्यानंतर Post Herpetic Neuralgia देखील बरेच दिवस चालू राहू शकतो. तसेच झाडपाल्याची औषधे ही घरी पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून मग ती लावली जातात. अशावेळी जंतूंचा संसर्ग झाल्यास नागीण पिकू शकते. त्यामुळे अशा प्रकारचे उपाय टाळणेच बरे. तसेच ठणका कमी करण्यासाठी विशिष्ट औषधे दिली जातात. Post Herpetic Neuralgia असल्यास नसांचा जो दाह आहे त्याचे शमन करण्यासाठी काही विशिष्ट औषधे असतात. त्यांचा वापर केला जातो. त्या औषधाने कधी कधी थोडी झोपही येऊ शकते. ही औषधे काही महिने चालू ठेवावी लागतात.

नागीण झाली असताना पाण्यामध्ये बर्फ टाकून त्याच्यामध्ये कपडा भिजवून तो पिळून त्याने नागीण झालेल्या जागी टिपत राहावे व नंतर डॉक्टरांनी दिलेले मलम किंवा लोशन लावावे. दहा-बारा दिवसांनी जेव्हा तिथे खपली येते तेव्हा ती कोचून काढू नये. नाहीतर त्या जागी व्रण राहू शकतात. चेहऱ्यावर नागीण असल्यास खपली निघाल्यानंतर बाहेर उन्हात जाण्याची वेळ आल्यास चेहरा कपड्याने झाकून ठेवावा किंवा सन स्क्रीन वापरावे जेणेकरून तिथे काळे डाग पडणार नाहीत.

हेही वाचा – मासिक पाळीदरम्यान खरंच महिलांना विश्रांतीची आवश्यकता आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

नागिणीवर लस उपलब्ध आहे का ?

होय, नागीणीवर लस उपलब्ध आहे. पन्नास वर्षाच्या वरील व्यक्तींनी दोन ते सहा महिन्यांच्या फरकाने या लसीचे दोन डोस घेतल्यास नागीण होण्याची शक्यता फार कमी राहते. तसेच १९ वर्षावरील ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे व ज्यांना नागीण होण्याची शक्यता आहे अशांना देखील या लसीमुळे फायदा होऊ शकतो.

नागीण झाल्यास घाबरून जाऊ नका. नागिणीमुळे जीवाला काहीही धोका नसतो. नागीण झाल्यास आयुर्वेदिक औषधे किंवा होमिओपॅथी औषधे करण्यात वेळ न घालवता लवकरात लवकर अ‍ॅलोपॅथीची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू करावीत, जेणेकरून लवकर आराम मिळेल व Post Herpetic Neuralgia राहण्याची शक्यता कमी होईल. नागीण दोन्ही बाजूंनी मिळत नाही हेही सगळ्यांनी लक्षात ठेवावे.