Deadlifting: हल्ली अनेकांना कोणतेही काम करताना इअरफोनवर गाणी ऐकण्याची सवय लागली आहे. महिला, तरुण मंडळी, वयोवृद्ध यांसारख्या प्रत्येक वयोगटातील लोकांना सातत्याने इअर फोनवर गाणी ऐकण्याची किंवा रील्स बघण्याची सवय लागली आहे. अनेक जण जिममध्ये जिम करतानादेखील इअरफोन लावून गाणी ऐकताना दिसतात. जिममध्ये तुम्ही नियमितपणे डेड लिफ्ट करताना इअरफोनचा वापर करीत असाल, तर ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तुमची पाठ आणि मणके प्रभावित होऊ शकतात. फिटनेस तज्ज्ञांनी, ‘दी इंडियन एक्स्प्रेस.कॉम’ला याबाबतची माहिती दिली आहे.

डॉ. अमोल पाटील, सहायक प्राध्यापक, एमबीए-स्पोर्ट्स मॅनेजमेंट, के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांनी, “डेड लिफ्टिंगसारखा जड व्यायाम करताना सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि इअरफोन घातल्याने तुमच्या सुरक्षिततेशी कशी तडजोड होऊ शकते,” हे सांगितले आहे.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ

दुसरे आवाज ऐकू येण्यात अडथळा

इअरफोनमुळे इतर आवाज आपल्या कानांवर पडत नाहीत. जसे की, जिममधील स्पॉटरच्या सूचना किंवा बारबेल हलविण्याचा किंवा खाली पडण्याचा आवाज. या संभाव्य धोक्यांना जलद आणि सुरक्षितपणे प्रतिक्रिया देण्यासाठी हे आवाज ऐकू येणे खूप गरजेचे आहे.

कमी जागरूकता

इअरफोन लावून गाणी ऐकत असल्यामुळे आपले अर्धे लक्ष गाण्यावर असते. त्यामुळे कमी जागरूकता पाहायला मिळू शकते.

दुखापतीचा धोका

इअरफोनमुळे तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सूचना वा संकेत ऐकू येत नसतील, तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने व्यायाम करू शकता किंवा एखाद्या धोकादायक परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्यात अयशस्वी होऊ शकता; ज्यामुळे तुम्हाला दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो.

कल्ट फिट, मुंबई आणि पुणे येथील स्ट्रेंथ अॅण्ड कंडिशनिंगचे क्लस्टर फॉरमॅट हेड अरुण ब्लम म्हणाले, “डेडलिफ्ट्स हा कम्पाऊंड मूव्हमेंट व्यायाम आहे; ज्यासाठी लक्ष केंद्रित करणे, लक्ष देणे आणि मन व शरीराने एकरूप होणे गरजेचे आहे. डेडलिफ्टिंगदरम्यान इअरफोनमुळे दुखापतीकडे दुर्लक्ष होऊन, ती सहन करणे खूप सोपे होते. त्यामुळे इअरफोन न वापरण्याची शिफारस केली जाते. कारण- त्यामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ शकते.”

डेडलिफ्ट करताना मदतीसाठी स्पॉटर सोबत ठेवा

डॉ. पाटील यांनी ताण कमी करण्यासाठी डेडलिफ्टिंगपूर्वी तुमच्या स्नायूंना योग्य रीतीने उबदार करण्याचा सल्ला दिला आणि तुम्हाला दुखापत टाळण्यासाठी व व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी योग्य फॉर्म असल्याची खात्री करण्यास सांगितले आहे.

“तुम्ही आरामात उचलू शकाल अशा वजनापासून सुरुवात करा आणि तुमची ताकद सुधारत असताना ते हळूहळू वाढवा आणि तुम्हाला मदत करण्यासाठी स्पॉटर ठेवा,” असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: सततच्या वेदनांमुळे थकवा का येतो? अभ्यासातून समोर आली माहिती

डेडलिफ्ट आरोग्यासाठी किती फायदेशीर?

डॉ. पाटील यांनी सांगितले की, डेडलिफ्टमध्ये स्नायूंच्या गटांची विस्तृत श्रेणी असते. हा व्यायाम पाठ, पाय व खांद्यासह स्नायूंना सक्रिय करतो आणि ही बाब एकूण सामर्थ्यवाढीसाठी योगदान देते.

“डेडलिफ्ट्स हा एक उच्च तीव्रतेचा व्यायाम आहे, जो लक्षणीय प्रमाणात कॅलरी बर्न करू शकतो. त्यामुळे वजन व्यवस्थापन आणि चरबी कमी करण्यास मदत मिळते. परिणामत: तुमचा एकूण चयापचय दरदेखील वाढू शकतो आणि तुम्हाला विश्रांतीच्या वेळीही अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते,” असे डॉ. पाटील म्हणाले.

त्यांच्या मते, डेडलिफ्टिंगमुळे स्नायू मजबूत होतात. पाठीचा भाग यात इरेक्टर स्पाईनदेखील सहभागी आहे. जो चांगला पवित्रा राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मग एकदा तुमची पाठ मजबूत झाली की, त्यामुळे तुम्हाला पाठदुखी कमी करण्यास आणि भविष्यातील दुखापती टाळण्यास मदत होऊ शकते.

डॉक्टरांनी असेही सांगितले की, हा एक वजन उचलण्याचा व्यायाम आहे; ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि हाडांची घनता वाढते, ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. अर्थातच, डेडलिफ्टद्वारे ताकद व स्नायू द्रव्यमान मिळवणे शक्य होते. त्यामुळे तुमचा आत्मसन्मान व आत्मविश्वास वाढू शकतो आणि तणाव कमी होऊ शकतो.