Soaking Dry Fruits: आपल्यापैकी अनेकांना हे ठाऊक असेल की, बदाम, अक्रोड किंवा खजूर हे ड्रायफ्रूट्स रात्रभर भिजवून खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. आता आपल्यापैकी बहुतेक जण ते पाण्यात भिजवतात; परंतु ते दुधात भिजवणे आपल्या आरोग्यासाठी अधिक चांगले असू शकते का? याबाबत योग्य माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला.
सर्वप्रथम ड्रायफ्रुट्स पाण्यात भिजवल्याने काय होते ते जाणून घेऊ. सल्लागार, आहारतज्ज्ञ व डायबेटिस एज्युकेटर कनिक्का मल्होत्रा, यांनी सांगितले, “ड्रायफ्रुट्स पाण्यात भिजवल्याने ते मऊ होते, जे पचनास मदत करते आणि अस्वस्थता दूर करते व फायटिक अॅसिड कमी करून, ते पोषण व शोषण सुधारते.” तसेच हे उपयुक्त एन्झाईमदेखील सक्रिय करते. संभाव्यत: पोषण मूल्य वाढवते. हे विविध सुक्या फळांमधील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.”
दुसरीकडे, ड्रायफ्रुट्स दुधात भिजवण्याचे अनेक पौष्टिक आणि आतड्यांसंबंधीचे फायदे आहेत. “ड्रायफ्रुट्समधील जीवनसत्त्वे, खनिजे व फायबरसह दुधातील प्रथिने आणि कॅल्शियम एकत्र करून पोषक घटकांसह दाट पेय तयार केले जाते. ड्रायफ्रुट्स दुधात भिजवल्याने मऊ होतात आणि पोषक घटकांचे शोषण सुधारते”, असे कनिक्का म्हणाल्या. त्याशिवाय त्यात आतड्यांचे आरोग्य सुधारण्याची आणि फायदेशीर सूक्ष्म जीवाणूंचा प्रसार वाढवण्याची क्षमता आहे. ड्रायफ्रुट्स दुधात भिजवून, त्यांचे सेवन करणे हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय असला तरी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याच्या गरजा आणि संवेदनशीलता, तसेच काही सुक्या मेव्यामधील साखरेच्या प्रमाणाबद्दल सावध असले पाहिजे.
पाण्यात भिजवलेले की दुधातील? ड्रायफ्रुट्स कोणते खावे?
या दोघांचेही वेगळे फायदे आहेत. “पाण्यात भिजविल्याने प्रामुख्याने पचन सुधारते, फायटिक अॅसिड कमी होते आणि साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते; परंतु दुधात भिजवल्याने प्रथिने, कॅल्शियम आणि एक परिपूर्ण चवदेखील मिळते,” असे कनिक्का म्हणाल्या.
दोन्ही पद्धती सुक्या मेव्याचे पौष्टिक मूल्य सुधारण्याचे वेगळे आणि उपयुक्त मार्ग प्रदान करत असल्याने, प्रत्येक व्यक्तीच्या आहारविषयक गरजा आणि प्राधान्यांनुसार सर्वोत्तम पर्याय निश्चित केला जातो. मूलभूत कमी कॅलरीयुक्त पेयाच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी पाणी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. प्रथिने आणि कॅल्शियम महत्त्वाचे असल्यास दुधाला प्राधान्य दिले जाऊ शकते.