जेव्हा कोणतीही महिला गर्भवती असते, तेव्हा जस जशी तिच्या ओटीपोटातील बाळाची वाढ होते, तस तसे तिच्या पोटाचा आकार वाढत जातो, ज्याला बेबी बंप असे म्हणतात. नुकतेच डिजिटल क्रिएटर निकोलने खुलासा केला की, गर्भवती असताना तिला कधीही लक्षात येण्याजोगा बेबी बंप दिसले नाही. पण, खरंच पोट न वाढताच कोणतीही महिला गर्भवती राहू शकते का? हे खरंच शक्य आहे का? ही घटना समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या इंडियन एक्स्प्रेसने आरोग्य तज्ज्ञांशी माहितीसाठी संपर्क साधला आहे.
तुम्ही बेबी बंपशिवाय गर्भवती राहू शकता का? (Can you be pregnant without showing a bump?)
“हो, बेबी बंप न दिसताही महिला गर्भवती राहू शकते. विशेषतः सुरुवातीच्या काळात किंवा उंची, बळकट पोटाचे स्नायू (strong abdominal muscles) किंवा anterior placenta सारख्या काही वैद्यकीय परिस्थितींमुळे असे होऊ शकते, असे बेंगळुरू येथील एस्टर महिला आणि बाल रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्राच्या प्रमुख डॉ. कविता कोवी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली.
त्यांनी असेही म्हटले की, “आईच्या शरीराचा प्रकार आणि वजन आणि बाळाची स्थितीदेखील गर्भधारणेत बेबी बंप किती दिसते, यावर परिणाम करते. काही महिलांना अखेरच्या टप्प्यापर्यंत बेबी बंप दिसत नाही, तर काहींना अजिबात दिसत नाही.”
गुप्त गर्भधारणा म्हणजे काय? (What is a cryptic pregnancy?)
“अशी गर्भधारणा जी लक्षात येत नाही, जिथे हार्मोनल पातळी किंवा शरीराची रचना विशिष्ट गर्भधारणेची चिन्हे लपवते तिला गुप्त गर्भधारणा (cryptic pregnancy) म्हणतात,” असे डॉ. कोवी म्हणाल्या.
“हे पोटाचे स्नायू मजबूत ( strong abdominal muscles) असणे, लठ्ठपणा किंवा retroverted uterus यांसारख्या घटकांमुळे होऊ शकते, जे बेबी बंप लपवते. पहिल्या गर्भधारणेदरम्यान किंवा बाळ पाठीवर झोपलेले (बाळ गर्भाशयाच्या मागच्या बाजूला झोपलेले) असते तेव्हा बेबी बंप न दिसणे ही अधिक सामान्य गोष्ट आहे,” असे डॉ. कोवी म्हणाल्या.
काही प्रकरणांमध्ये महिलांना त्यांच्या तिसर्या तिमाहीपर्यंत किंवा प्रसूतीदरम्यान अगदी कमी लक्षणांमुळे गर्भवती असल्याचे कळू शकत नाही. स्यूडोसायसिस (pseudocyesis किंवा खोटी गर्भधारणा (false pregnancy) नावाची एक दुर्मीळ स्थिती आहे, ज्यामध्ये महिला गर्भवती नसतानाही तिची मासिक पाळी चुकू शकते, स्तनाची कोमलता, मळमळ, वजन वाढणे आणि गर्भाशयामध्ये हालचाली होत असल्याची भावना यासारखी शारीरिक आणि भावनिक गर्भधारणेसारखी लक्षणे अनुभवू शकते,” असे त्यांनी सांगितले.
हे धोकादायक आहे का?
डॉ. कोवी यांनी इशारा दिला की, जर एखाद्या महिलेला गर्भाच्या हालचालींची माहिती होत नसेल आणि ती प्रसूतीपूर्व काळजी घेतली जात नाही, त्यामुळे लक्षात न आलेल्या गर्भधारणेमुळे (undetected pregnancies) धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे गर्भावस्थेतील मधुमेह, प्रीक्लेम्पसिया किंवा गर्भाच्या वाढीच्या समस्या यांसारख्या गुंतागूंत होऊ शकतात.
“प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे, योग्य पोषण किंवा वैद्यकीय देखरेखीशिवाय बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. पण, वेळेवर निदान झाल्यास, वैद्यकीय हस्तक्षेप गर्भधारणा सुरक्षितपणे हातळण्यास मदत करू शकतो,” असे त्या म्हणाल्या.
अशा परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही काय लक्षात ठेवले पाहिजे?
गुप्त गर्भधारणा दुर्मीळ असतात आणि नेहमीच अंदाज लावता येत नसला तरी महिला त्यांच्या मासिक पाळीचे निरीक्षण करून, मासिक पाळी उशिरा आल्यास गर्भधारणा चाचण्या करून आणि गर्भधारणेच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल माहिती देऊन शक्यता कमी करू शकतात. नियमित वैद्यकीय तपासणी, विशेषतः विश्वसनीय गर्भनिरोधक वापरत नसलेल्यांसाठी, अनपेक्षित गर्भधारणा लवकर ओळखण्यास आणि संभाव्य धोके टाळण्यास मदत करू शकते.