आपण गेल्या लेखात रीटाची गोष्ट वाचली. तिला तिचा गोरा रंग परत मिळाला हे वाचून तुम्हाला देखील आनंद झाला असेल, नाही का? काय उपचार केले बरं मी? तर सर्वप्रथम तिच्या त्वचेचा दोन मिलीमीटर चा तुकडा (बायॉप्सी )काढून त्याची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करून घेतली. त्यामुळे  पिगमेंटेशनचे नक्की कारण  समजले. ते होते लायकेन प्लेनस पिगमेंटोसस.  मग काय! आम्हाला रस्ता सापडला. ह्या रोगाची ठराविक उपाययोजना करून आणि त्याला विविध कॉस्मेटोलॉजी उपचार पद्धतींची जोड देऊन रीटाचा चेहरा उजळला आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू परतले.

आता आपण पाहूया पिगमेंटेशनवरील उपचार पद्धती
सर्वसाधारण उपचार :  हे पिगमेंटेशनच्या सर्वच व्याधींवर काम करतात.
चेहऱ्यावर निरनिराळ्या प्रसाधनांचा वापर टाळणे.
सर्व प्रकारची फेअरनेस क्रीम्स ताबडतोब बंद करणे.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?

शक्य असल्यास हेअर डायचा वापर टाळणे. अगदीच आवश्यकता असेल तर स्टॅंडर्ड कंपनीचे हेअर डाय वापरावे, कारण त्यात भेसळीची शक्यता कमी असते. जर ॲलर्जी आली, तर ती पीपीडी  ह्या डायमुळेच आली आहे हे समजते. काळी मेंदी ही नुसती मेंदी नसून त्यामध्ये पी पी डी डायचा उपयोग केला जातो. त्यामुळे ती वापरू नये. कधी कधी काळ्या मेंदीत निळीचा वापर होतो. निळ देखील पिगमेंटेशन तयार करू शकते.

सूर्यप्रकाश व उष्णतेपासून बचाव. याकरिता एस पी एफ ५० असलेले फिजिकल सनस्क्रीन वारंवार वापरणे महत्त्वाचे आहे. हे सनस्क्रीन अतिनील किरणे शोषून घेतात. त्याचबरोबर ते त्वचेला हानिकारक देखील नसते. सनस्क्रीनच्या बरोबरीने मोठी हॅट, छत्री आणि स्कार्फ यांचा उपयोग लाभदायक ठरतो. दुपारी अकरा ते तीन या वेळात शक्य असेल तर उन्हात बाहेर पडणे टाळावे.

पिगमेंटेशनची त्वचा कोरडी असू शकते. तिला सूक्ष्म भेगा पडतात. त्यामधून हवेतील धुली कण व सूर्यकिरण अधिक प्रमाणात शोषले जातात. याकरिता वारंवार चेहरा धुणे टाळावे. आणि न्यूट्रल पीएच असलेला साबण अथवा क्लेन्सर वापरावा. दिवसातून दोन वेळा सुगंधित नसलेले मॉइश्चरायझर वापरावे. ज्या योगे या सूक्ष्म भेगा भरून यायला मदत होते.

परफ्युम आणि डिओडरंट  इत्यादी सुगंध द्रव्ये टाळावीत. कारण त्यांच्यापासून ॲलर्जी होण्याचा संभव असतो.

आणखी वाचा: Health Special: पिगमेंटेशन म्हणजे काय?

पोटात घ्यावयाची औषधे
१. सर्वसाधारण औषधे : यामध्ये विविध जीवनसत्वांचा समावेश होतो त्यांना ॲन्टीऑक्सीडेंट असे म्हणतात. सूर्यकिरणांमुळे तसेच हवेतील सूक्ष्म  धूर  व धुलीकणांमुळे त्वचेच्या खालच्या थरात फ्री रॅडिकल्स म्हणून  अणु तयार होतात. हे अणूपेशींना इजा पोहोचवतात. त्यामुळे त्वचेची स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता कमी होते. जीवनसत्व अ, ड, इ, बीटा कॅरोटीन, जीवनसत्व क आणि  ग्लूटाथायोन  ही रसायने  फ्री रॅडिकल्स नष्ट करतात. म्हणून यांचा उपयोग केला जातो.
२. विशिष्ट उपचार : क्लोरोक्वीन, मिथोट्रिक्सेट, सायक्लोस्पोरिन  इत्यादी गोळ्यांचा आवश्यकतेनुसार उपयोग केला जातो.
३. विशिष्ट क्रीम्स : थोड्या कालावधीकरता गरज असल्यास  माईंड स्टिरॉइड क्रीम आणि टॅक्रोलिमस हे क्रीम वापरले जाते. वरील सर्व औषधे त्वचारोगतज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या देखरेखी खालीच वापरली जातात. अन्यथा त्यांचे होणारे दुष्परिणाम आपण आधीच्या लेखामध्ये पाहिले आहेत.

आणखी वाचा: Health Special: मुरुमांवरील उपचार

क्लिनिक मध्ये करावयाच्या उपचार पद्धती
प्रथमतः मूळ कारण शोधून त्यावर उपचार केल्यानंतर शिल्लक राहिलेले पिगमेंटेशन ह्या उपचारांनी कमी केले जाते.
केमिकल पिल्स: ह्या उपचार पद्धतीत  विविध फळांपासून आणि दुधापासून तयार केलेल्या आम्लांचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचेचा वरील थर, ज्यामध्ये पिगमेंट भरलेल्या पेशी असतात  तो थर निघून जातो आणि खालील नवीन पेशींचा थर वरती येतो. तसंच पेशींच्या निर्मितीला चालना मिळते.
लेझर:  क्यू स्विच एन डी याग लेझरच्या उपयोगाने त्वचेच्या पेशींमध्ये  मेलॅनिन  ह्या रंगद्रव्याचे कण फोडून सूक्ष्म केले जातात, ज्यायोगे ते रक्तात मिसळून शरीराबाहेर  टाकले जाते.
“ नसेतून इंजेक्शन घेऊन पटकन गोरे होता येते ना?,”  हा आम्हाला खूपदा विचारण्यात येणारा प्रश्न. बऱ्याच कॉस्मॅटॉलॉजी सेंटर्समध्ये आणि ब्युटी स्पामध्ये हे झटपट आयुध वापरले जाते. त्याचा  फायदा काहींना मिळतो देखील. परंतु या उपचार पद्धतीला अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिलेली नाही. क्वचित कधी त्याचे भयंकर दुष्परिणाम दिसू शकतात. शिवाय ही उपचार पद्धत कायमस्वरूपी फायदेशीर नसल्याने पुन्हा पुन्हा ही इंजेक्शन घेत राहावी लागतात. त्यामुळे त्यांच्यापासून चार हात लांब राहिलेलेच बरे.

या सर्व उपचार पद्धतीमुळे पिगमेंटेशन च्या उपचारात अमुलाग्र बदल घडून आला आहे हे तर खरेच. पण एक इशारा जाता जाता…. औषधोपचार आणि सूर्यकिरणांपासून संरक्षण यांच्या मदतीशिवाय फक्त लेझर आणि केमिकल पील आपल्याला अभिप्रेत रंग बदल देऊ शकत नाही.’  पी हळद हो गोरी’ असा झटपट फॉर्म्युला देखील अस्तित्वात नाही. तेव्हा पिगमेंटेशन बरे करण्यापेक्षा होऊ न देणे अधिक चांगले नाही का? 

Story img Loader