Green Almonds: पावसाळ्यात आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी अतिरिक्त काळजी आणि पोषण घेणे आवश्यक आहे. या ऋतूमध्ये आपल्याला आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करायला हवे. पावसाळ्याशी संबंधित आजारांविरुद्ध तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला हिरव्या बदामासारख्या हंगामी पदार्थांचे सेवन करायला हवे.

त्यामुळेच आम्ही हिरव्या बदामांबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दिव्या गोपाल, सल्लागार आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, बनशंकरी, बेंगळुरू यांनी सांगितले, “हिरवे बदाम किंवा गोड हिरव्या शेंगा हे एक सुपरफूड आहे, जे तुम्ही आरोग्य उत्तम राखण्यासाठी सेवन केले पाहिजे.”

mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा
Eating Guava in winters can improve heart health, reduce blood sugar 8 Health Benefits of Guava Fruit
Guava Fruit Benefits: हिवाळ्यात रोज पेरू खाल्ल्यास काय होते? आश्चर्यकारक फायदे वाचून तुम्हीही रोज पेरू खाल
Salad Benefits In Marathi
Salad Benefits: रात्रीच्या वेळी सॅलड खावे का? सॅलड खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणुन घ्या फायदे…
Amla Water Benefits
सकाळीच नाही रात्रीदेखील आवळा खाण्याचे अनेक फायदे; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

पावसाळ्यात हिरव्या बदामाचे सेवन का करावे? (Green Almonds)

केस मजबूत करण्यासाठी

हिरवे बदाम हे व्हिटॅमिन-ई आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक चांगला स्रोत आहे. “हे केस मजबूत करण्यासाठी आणि केस गळणे कमी करण्यासाठी एकत्र काम करतात. याच्या नियमित सेवनाने, पावसाळ्यातील दमट वातावरणात तुमच्या केसांची चमक आणि ताकद वाढेल,” असे दिव्या यांनी सांगितले.

त्वचा सुधारते आणि पोषण देते

हिरव्या बदामामध्ये व्हिटॅमिन-ईचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा त्वचेलाही फायदा होतो. व्हिटॅमिन-ई हे एक खूप प्रभावी अँटिऑक्सिडेंट आहे, जे मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करते, ज्यामुळे त्वचेचे नुकसान आणि वृद्धत्वाची प्रक्रिया टाळता येते. “हिरवे बदाम त्वचेला आतून मऊ आणि चमकदार करण्यासाठी पोषण देतात. हे मुरुम आणि इतर त्वचेच्या समस्या कमी करण्यासदेखील मदत करू शकते,” असे दिव्या यांनी सांगितले.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, हिरव्या बदामांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वे असतात, जी रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात आणि तुमच्या शरीराला सामान्य आजार आणि पावसाळ्यातील संसर्गाशी लढण्यास मदत करतात. “याच्या नियमित सेवनाने, हे संपूर्ण पावसाळ्यात तुम्हाला निरोगी आणि उत्साही ठेवण्यात मदत करेल,” असे दिव्या यांनी सांगितले.

हाडं आणि दात मजबूत करतात

हिरव्या बदामांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, हे हाडं आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली मुख्य खनिजे आहेत. त्यांचे नियमित सेवन केल्याने तुमची हाडे आणि दात मजबूत होतील, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांच्या इतर आजारांचा धोका कमी होईल,” असे दिव्या म्हणाल्या.

पचनासाठी उत्तम

“हिरव्या बदामामुळे अन्न पचन होण्यास मदत होते आणि आतडे निरोगी राहण्यास मदत होते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतासारख्या पचनाच्या समस्या, पावसाळ्यातील आहार आणि खाण्या-पिण्याचा वेळ बदलल्यावरही दूर राहतील,” असे दिव्या यांनी सांगितले.

हेही वाचा: केळी खाऊ घातल्याने बाळाला खरंच शांत झोप लागते? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

हिरवे बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती?

हिरवे बदाम तुम्ही नाश्त्याच्या वेळी घ्या, सॅलेडमध्ये किंवा स्मूदीमधून घ्या, हिरवे बदाम बहुमुखी आणि स्वादिष्ट असतात. “मजबूत केसांसाठी, चमकदार त्वचेसाठी हिरव्या बदामाचा आहारात समावेश करा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हे फायदेशीर आहे”, असे दिव्या यांनी सांगितले.

Story img Loader