Karela juice benefits: कारल्याची भाजी किंवा कारल्याचा रस प्यायला अनेकांना आवडत नाही. पण, कारलं खाणं आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर आहे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एका ग्लास कारल्याचा रस प्यायल्याने चांगले आरोग्य लाभते.

फोर्टिस हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ वसंत कुंज यांनी सांगितले की, “कारले, जरी चवीने कडू असले तरी ते एक आश्चर्यकारक अन्न आहे. यात अँटीऑक्सिडेंट आणि दाहकविरोधी गुणधर्म आहेत. हे फायबर, व्हिटॅमिन ए आणि वजन कमी करण्यास मदत करते, म्हणूनच याचा उपयोग भारतात आणि इतर अनेक देशांमधील औषधी उद्देशाने केला गेला आहे. ”

हे शिजवून खाल्ले तरी किंवा रस प्यायल्याने तरी तितकेच पौष्टिक आहे, असे पोषणतज्ज्ञ डॉ. रचना अग्रवाल यांनी सांगितले आहे. त्यांनी कारल्याचे काही फायदेदेखील सूचीबद्ध केले आहेत.

व्हिटॅमिन सीने समृद्ध : कारल्याचा रस व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने प्रमाणित आहे / भरपूर प्रमाणात समृद्ध आहे.) जी रोग प्रतिकारशक्ती, मेंदूचे आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी भूमिका बजावते.

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते : कारल्याच्या रसात असे घटक असतात जे शरीरातील ग्लुकोज कमी करण्यास मदत करू शकतात. यात चांगले हायपोग्लाइसेमिक गुणधर्म आहेत, जे रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात, असे जैन म्हणाले.

व्हिटॅमिन ए आणि फायबर समृद्ध : फायबरचा समृद्ध स्त्रोत आणि कॅलरी कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हे दीर्घ कालावधीसाठी भूक लागू देत नाही. तसेच हे व्हिटॅमिन ए ने समृद्ध असून हे डोळे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट बनवते. हे रक्तातील विष कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि आतड्याच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

रक्त शुद्ध करते : “आयुर्वेदानुसार, यकृत डिटोक्सिफाई करण्याशिवाय हा रस स्वादुपिंडाचा कर्करोग रोखू शकतो. हे मधुमेहासाठीदेखील एक वरदान आहे,” असे अग्रवाल यांनी सांगितले.

कारल्याचा रस पिण्याची योग्य वेळ कोणती?

“हा रस कधीही जेवणाच्या आधीच प्यायला हवा. हा सकाळच्या न्याहारीपूर्वी दिवसातून एकदा रिकाम्या पोटी प्यावा,” जैन यांनी हा रस ३० मिलीपेक्षा जास्त न पिण्याची सूचना केली आहे.

डॉ. अग्रवाल यांनी सहमती दर्शविली आणि त्या पुढे म्हणाल्या, “प्रती व्यक्तीसाठी एक कारलं मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून त्याचा रस तयार करा आणि नंतर रस गाळून घ्या.”

परंतु, जैन यांनी सांगितले की, “गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी हा रस पिऊ नये. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या औषधांसह रस घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण त्यात हायपोग्लाइसेमिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्यांच्या साखरेची पातळी कमी होऊ शकते.”

कारल्याचा रस चवदार कसा बनवायचा?

कडू चव कमी करण्यासाठी कारल्याचा रस गुळासह एकत्र करू शकता. शिवाय हे तुम्ही “सफरचंदाचा रस आणि लिंबाच्या रसातही मिसळू शकता, असे जैन यांनी सांगितले.

Story img Loader