Toothbrush Sanitisation: दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ ब्रश करणे, दात स्वच्छ करणेच पुरेसे नाही. त्यासाठी तुम्ही टूथब्रशची काळजी कशी घेता याकडे लक्ष देणेही खूप गरजेचे आहे. आपला टूथब्रश निर्जंतुकीकरण करायचा की नाही या प्रश्नाने ऑनलाइन चर्चेला उधाण आले आहे. कंटेंट क्रिएटर डॉ. जॉयस कांग यांच्या म्हणण्यानुसार, “टूथब्रश स्वच्छ करण्याचे अनेक मार्ग आहेत. बरेच लोक त्यांचे टूथब्रश कधीही स्वच्छ करत नाहीत आणि आपल्या शौचालयाजवळ उघड्यावर ठेवतात.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शल्यचिकित्सक व मॅक्सिलोफेशियल डॉ. रामकृष्ण तंगुतुरी बीडीएस, एमडीएस म्हणतात, “होय, तुमचा टूथब्रश नियमितपणे स्वच्छ न केल्याने धोका निर्माण होऊ शकतो. कालांतराने, टूथब्रशमध्ये जीवाणू , बुरशी व विषाणूदेखील उद्भवू शकतात. विशेषतः जर ते ओलसर वातावरणात ठेवल्यास असे होऊ शकते. त्यातील अनेक सूक्ष्म जीव निरुपद्रवी असले तरी स्ट्रेप्टोकोकस म्युटान्स, पोकळीसाठी जबाबदार किंवा बाथरूमच्या संपर्कामुळे येणारे अशा जीवाणूंची संख्या अनेक पटींनी वाढू शकते.”
दूषित टूथब्रशचा वारंवार वापर केल्याने हे जंतू तोंडात प्रवेश करण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे हिरड्यांना आलेली सूज, पीरियडॉन्टायटीस किंवा संसर्ग होऊ शकतो.
टूथब्रशमधील जीवाणू तोंडाच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?
डॉ. तंगुतुरी सांगतात, “टूथब्रशवरील हानिकारक सूक्ष्म जंतू तोंडात पुन्हा प्रवेश करू शकतात, ज्यामुळे प्लेक तयार होणे, दात किडणे व हिरड्यांचे आजार होऊ शकतात. काही अभ्यासांतून असे सुचवण्यात आले आहे की, टूथब्रशवरील रोगजनक श्वासाची दुर्गंधी यांसारख्या परिस्थितीत वाढवू शकते किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या हिरड्यांच्या समस्या वाढवू शकते.”
हे धोके कमी करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत
डॉ. तंगुतुरी यांनी सांगितल्यानुसार, अन्नाचे कण आणि टूथपेस्टचे अवशेष काढून टाकण्यासाठी प्रत्येक वापरानंतर टूथब्रश पूर्णपणे स्वच्छ धुवा.
तो सरळ ठेवा आणि हवेत कोरडा होऊ द्या. जीवाणू ओलसर वातावरणात वाढतात. म्हणून टूथब्रश कोरडा ठेवणे महत्त्वाचे आहे.
टूथब्रशला हवाबंद टोपीने झाकणे टाळा. कारण- त्यामुळे ओलावा वाढतो आणि सूक्ष्म जीवांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
ब्रिस्टल्स प्रभावी आहेत याची खात्री करण्यासाठी आणि जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी दर तीन-चार महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदला.
टूथब्रश स्वच्छतेसाठी उपाय
यूव्ही लाइट सॅनिटायझर्स
ही उपकरणे अतिनील किरण उत्सर्जित करतात, जे त्यांच्या डीएनएमध्ये व्यत्यय आणून जीवाणू आणि विषाणू मारतात. अभ्यास दर्शवितो की, यूव्ही सॅनिटायझर्स टूथब्रशवरील जीवाणूंचा भार ९९% पर्यंत कमी करू शकतात.
जीवाणूविरोधी माउथवॉशमध्ये भिजवणे
ही पद्धत टूथब्रशच्या ब्रिस्टल्सवर असलेले जीवाणू नष्ट करण्यासाठी प्रभावी आहे. उपलब्ध असलेले हे साधन वापरण्यास सोपे, सहज आणि प्रभावी आहे.
गरम पाणी
टूथब्रशचे ब्रिस्टल्स काही मिनिटे गरम पाण्यात ठेवल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात; परंतु तसे वारंवार केल्यास ब्रिस्टल्सचे नुकसान होऊ शकते.
डिशवॉशर पद्धत
काही लोक त्यांचे टूथब्रश डिशवॉशरमध्ये स्वच्छ करण्यासाठी ठेवतात. उष्णता आणि डिटर्जंटमुळे जंतू नष्ट होऊ शकतात; परंतु त्यामुळे टूथब्रशचे आयुष्यही कमी होऊ शकते.