Almond Milk Benefits: मागील काही वर्षांपासून Vegan हा शब्द वारंवार कानांवर पडत आहे. आहारामध्ये फक्त वनस्पतींद्वारे तयार केल्या जाणाऱ्या गोष्टींचे सेवन करणारे शाकाहारी लोक वेगन असतात, असे म्हटले जाते. ते प्राण्यांच्या दुधाचे सेवन करणे प्रामुख्याने टाळत असतात. अशा वेळी दुधाला पर्याय म्हणून ते Almond Milk, Soy Milk अशा गोष्टी स्वीकारतात. प्राण्यांच्या दुधाऐवजी बदामाच्या दुधाचा वापर लोक करीत असतात. आहारातून गाय, बकरी अशा प्राण्यांद्वारे मिळणाऱ्या दुधाचे आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांचा सेवन करणे थांबवण्याआधी या कृतीचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेणे आवश्यक असते.

आहारतज्ज्ञ अंशू दुआ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी दुग्धविरहित आहाराकडे वळण्याचे फायदे सांगितले आहेत. त्याशिवाय असे केल्याने शरीरावर कोणत्या प्रकारचे परिणाम होण्याची शक्यता असते याबाबतची माहितीही त्यांनी दिली आहे. याशिवाय अंशू दुआ यांच्या व्हिडीओमध्ये बदामापासून दूध तयार करायची कृती आणि त्याच्या सेवनाने होणारे फायदेदेखील नमूद करण्यात आले आहेत.

march held demanding permanent Rs 7 subsidy and a price of Rs 40 per liter for cows milk
कोल्हापुरात दूध उत्पादकांचा दरवाढीसाठी गायींसह मोर्चा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Loksatta explained Why and how much did milk collection increase
विश्लेषण :राज्यात दुधाचा महापूर?
cow milk health benefits
गायीच्या दुधाला पृथ्वीवरील अमृत का म्हटलं जातं?
milk adulterants, Maharashtra , milk samples, milk,
राज्यभरातून एका दिवसांत ११०० दुधाचे नमुने जप्त, अन्न आणि औषध प्रशासन दूध भेसळखोरांविरोधात आक्रमक
Gut health expert claims taking 16 spoons of ghee daily keeps
“मी दिवसातून १६ चमचे तूप खातो”, आतड्याच्या आरोग्यतज्ज्ञांनी केला दावा; पण, हे खरंच योग्य आहे का? वाचा, पोषणतज्ज्ञांचे मत…
Nutritionist shares 5 tips to follow for good gut health know Experts opinion
“रोज आवळा खा अन् ताक प्या अन् आतड्यांचे आरोग्य सुधारा; आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ खरंच उपयुक्त आहेत का?
Should you eat Bottle guard with peel or without the peel health benefits helps for weight management
वजन नियंत्रणात ठेवेल दुधीची साल! पण ती कशाप्रकारे खावी? तज्ज्ञांनी सांगितले…

अंशू दुआ यांनी सांगितले की, आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना दूध पचायला जड जाते. अशा व्यक्तीने दुधाचे सेवन करणे सोडून दिल्यास त्याला फायदा होऊ शकतो. याशिवाय काही जण हे Lactose intolerant असतात. त्यांच्या आतड्यामध्ये लॅक्टेज एन्झाइम गरजेपेक्षा कमी प्रमाणात तयार होत असल्याने त्यांना दूध पचवायला त्रास होतो. असे लोक ही Almond Milk चा पर्याय ट्राय करू शकतात.

गाय, म्हैस यांच्या दुधाच्या जागी आहारामध्ये Almond Milk चा समावेश केल्याने होणारे फायदे

निरोगी त्वचा (Healthy skin)

तज्ज्ञांच्या मते, गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये असे काही हार्मोन्स असतात, जे आपल्या शरीरातील ठराविक हार्मोन्सवर प्रभाव टाकतात. या हार्मोनल प्रक्रियेमुळे सीबन उत्पादनात वाढ होते. यामुळे त्वचेतील सूक्ष्म छिद्रे बंद होतात. परिणामी मुरमासारख्या समस्या संभवतात. असे घडू नये यासाठी दुधाचे सेवन करणे टाळावे. बदामामध्ये व्हिटामिन ‘ई’ असते. या घटकामुळे त्वचा निरोगी राहायला मदत होते.

आतड्यांची स्थिती सुधारते. (Gut health)

दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न केल्याने पचनाशी संबंधित समस्यांचे प्रमाण कमी होते. याशिवाय गॅसचा त्रासदेखील नाहीसा होण्याची शक्यता असते. प्राण्यांपासून मिळणारे दुधातील काही घटक पचायला वेळ लागतो. शिवाय ते पचनासाठी जडदेखील असतात.

आणखी वाचा – घरच्या घरी Vegan Almond Milk तयार करायचे आहे? तर मग फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

मूड स्विंग्स कमी होतात. (Fewer mood swings)

गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाच्या एका ग्लासमध्ये ६० हार्मोन्स असतात. दुधाच्या सेवनामुळे शरीरात आधीपासून अस्तित्वात असलेले नैसर्गिक हार्मोन्स वाढू शकतात. यामुळे मूड स्विंग्स होतात. Almond Milk च्या वापरामुळे मूड स्विंग्सचे प्रमाण कमी होऊ शकते.

वजन कमी होणे. (Weight loss)

दूध आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न केल्याने वजन कमी होण्याची शक्यता असते. त्याशिवाय बदामापासून तयार केलेल्या दुधामध्ये प्राण्यांच्या दुधाच्या तुलनेत निम्म्या प्रमाणात कॅलरीज असतात.

(ही माहिती आहारतज्ज्ञ अंशू दुआ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनवरून घेण्यात आली आहे.)

Story img Loader