Prepone Periods : मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. दर महिन्याला स्त्रियांना मासिक पाळीचा न चुकता सामना करावा लागतो. एका ठराविक कालावधीनंतर स्त्रियांना मासिक पाळी येते. मासिक पाळीदरम्यानचा त्रास हा असहनीय असतो. अनेकदा लहान मोठे प्लॅन करताना, कार्यक्रम किंवा लॉन्ग टूरला जाताना मासिक पाळी येऊ नये असे प्रत्येक स्त्रीला वाटते, पण जेव्हा ऐन वेळवर मासिक पाळी येते आणि प्लॅन रद्द करावे लागतात; अशा वेळी महिलांना वाटते की मासिक पाळी उशिरा किंवा प्रीपोन करू शकले असते तर बरे झाले असते. मासिक पाळी उशिरा यावी यासाठी काही पर्याय आहेत, पण हे पर्याय कितपत सुरक्षित आहे हे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे.

याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दिव्या वोरा सांगतात, “जर तुम्ही काही महिन्यांपूर्वी मित्र-मैत्रिणींबरोबर समुद्रकिनाऱ्यांवर जाण्याचा प्लॅन केला आणि त्याच तारखांवर तुमची मासिक पाळी येऊ शकते; अशावेळी मासिक पाळीला काही दिवसांसाठी थांबविणे कितपत योग्य आहे?”

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
menstrual leave mva provision
मासिक पाळीच्या रजेचा विषय पुन्हा चर्चेत; भारतात काय आहेत नियम? कोणकोणत्या राज्यांत रजेची तरतूद?
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
sanjay bangar son gender transformation
आर्यन झाला अनाया: क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने केलेली ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ची प्रक्रिया कशी होते? त्याचे दुष्परिणाम काय?
MVA demand menstrual leave
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान दोन दिवसांची सुट्टी देण्याचे मविआचे आश्वासन; संसद ते स्मृती इराणींपर्यंत या विषयाशी निगडित कोणते वाद झाले?

डॉ. वोरा पुढे सांगतात, “मासिक पाळी काही दिवसांसाठी थांबविणे म्हणजे ओव्हूलेशन थांबविणे होय. ओव्हूलेशन म्हणजे अंडाशयातून अंडी बाहेर पडणे. याशिवाय आहार, व्यायाम, झोप आणि हार्मोन्समधील संतुलन बिघडू शकते; या गोष्टी समजून घेणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी मासिक पाळीला पुढे ढकलणे खूप चुकीचे आहे.”

हेही वाचा : Yoga for Children : ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांनी करावे ‘हे’ तीन योगा; पालकांनो, फायदे जाणून घ्या

त्या पुढे सांगतात की, तुम्ही मासिक पाळी काही दिवसांसाठी थांबवू शकता, पण अशावेळी तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.
जर तुम्हाला तुमची मासिक पाळी काही दिवसांसाठी थांबवायची असेल, तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन किंवा फक्त प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्यासुद्धा फायदेशीर आहे.

जसलोक हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या डॉ. डॅनी लालीवाल सांगतात, “आवश्यकतेनुसार मासिक पाळी पुढे ढकलली जाऊ शकते, पण या औषधी कधी सुरू करतात आणि त्यांच्याकडे किती वेळ शिल्लक आहे, यावरसुद्धा अवलंबून असते.

हैद्राबाद येथील कामिनेनी हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ प्रसन्नलथा सांगतात, “मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी काही पद्धतींचा वापर केला जातो.

१. हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या (Hormonal contraception) – हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या मासिक पाळीला काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यास मदत करतात. प्लेसिबो किंवा “शुगर पील”च्या मदतीने तुम्ही मासिक पाळी पुढे ढकलू शकता.

२. प्रोजेस्टिन औषध (Progestin Medication) प्रोजेस्टिन औषध ही गोळ्या किंवा इंजेक्शनद्वारे मासिक पाळी पुढे ढकलण्याठी चांगला पर्याय आहे.

३. नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs): काही नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स मासिक पाळीत होणारा रक्तस्राव कमी करण्यास मदत करतात. याशिवाय मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी हे अधिक फायदेशीर आहे.

हेही वाचा : Early Dinner & Better Sleep : रात्रीचं जेवण लवकर केल्यामुळे खरंच चांगली झोप येते का? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या…

पुढे प्रसन्नलथा सांगतात की, या पद्धतींचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक आहे. हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्यांमुळे मळमळ, डोकेदुखी किंवा सतत मूड बदलणे इत्यादी परिणाम दिसू शकतात.
प्रोजेस्टिन औषधांमुळे शरीर फुगणे किंवा मासिक पाळीच्या रक्तस्त्रावामध्ये बदल दिसून येतो, तर नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स या नियमित वापरल्या जात नाही, त्यामुळे याचे सहसा कमी दुष्परिणाम दिसून येतात.

डॉ. प्रसन्नलथा पुढे सांगतात, “मासिक पाळी वारंवार पुढे ढकलणे चांगले नाही. यामुळे हार्मोनल संतुलन बिघडण्याची भीती जास्त असते. मासिक पाळी काही दिवसांसाठी थांबवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे, तितकेच महत्त्वाचे आहे.”