गर्भवती स्त्रियांना अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे किंवा काही गोष्टी टाळण्याची आवश्यकता आहे. यापैकी एक म्हणजे हेअर डाय करणे, हा एक विषय ज्यावर अनेकदा वेगवेगळी मते येतात. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यास हिरवा कंदील मिळाला असला तरी, तरीही काही गुंतागुंत टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

याबद्दल बोलताना, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमिना खालिद यांनी इंस्टाग्रामवर सांगितले की, “2021 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अलीकडील अभ्यासात (सुमारे 2000 महिलांवर करण्यात आलेले संशोधन) असे दिसून आले आहे की, ज्यां महिलांनी गर्भवती असताना तिसर्‍या तिमाहीत हेअर डाय केले त्यांच्या बाळाचे वजन असल्याचे जास्त प्रमाणात आढळतात

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

त्यापुढे त्यांनी सांगितले की, की बाजारात केसांचे अनेक रंग उपलब्ध आहेत हे लक्षात घेता, अज्ञात/अब्रँड नसलेल्या पुरवठादारांकडून ते खरेदी करणे टाळावे कारण त्यांच्याकडे स्पष्टपणे सूचीबद्ध केलेले घटक नसतील. “तसेच, त्यांनी योग्य सुरक्षा आणि नियंत्रण गुणवत्ता तपासणी केली नसेल आणि त्यात हानिकारक पदार्थ असू शकतात. आणि गर्भवती महिलांसाठी हा काळ निश्चितपणे हे सर्व धोका पत्करण्याची योग्य वेळ नाही, इतर वेळी देखील हे ठीक आहे असे नाही,” असे त्यांनी सांगितले

हेही वाचा: Eye Health: उन्हाळ्यात उष्णतेमुळे तुमचे डोळे कसे होतात खराब? कशी घ्यावी काळजी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

तर गरोदरपणात हेअर डाय करताना महिलांनी काय लक्षात ठेवावे?

गर्भधारणेच्या पहिल्या 12 आठवड्यांनंतर हेअर डाय देणे अधिक चांगले आहे. हेअर डायचे प्रमाण जे आईच्या रक्तप्रवाहात जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे गर्भातील बाळापर्यंत पोहोचण्याची शक्यता असते, तेव्हा ते खूपच कमी असणे अपेक्षित असते.

काय सांगतात तज्ज्ञ डॉक्टर?

याबाबत सविस्तर माहिती देताना गुढगाव येथील क्लाउड नाईन हॉस्पिटल, स्त्रीरोगशास्त्र, वरिष्ठ सल्लागार, डॉ. रितू सेठी यांनी सांगितले की, “गर्भवती असताना हेअर डाय सुरक्षित मानले जाते. विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत, बहुतेक हेअर डायचा तुमच्या टाळूशी फारसा संपर्क नसल्यामुळे, तुमच्या रक्तप्रवाहात कोणतेही रसायन पोहोचण्याची शक्यता कमी असते आणि त्यामुळे ते तुमचे बाळपर्यंत पोहचण्याची शक्यता देखील कमी असते.” पण, तज्ज्ञाने निदर्शनास आणले की, महिलांनी पहिल्या तिमाहीत केसांना डाय करणे टाळले पाहिजे कारण हा काळ गर्भाच्या जलद वाढीचा आणि विकासाचा असतो.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, परमनेंट आणि सेमी परमनेंट हेअर डायमधील रसायने अत्यंत विषारी आणि सुरक्षित नसतात, परंतु बाळाचे अवयव सुरक्षितपणे तयार होईपर्यंत प्रतीक्षा करणे चांगले.

सेमी परमनेंट प्युअर व्हेजिटबल डायसाठी मेंहदी हा आणखी एक सुरक्षित पर्याय आहे.

केस हवेशीर खोलीत डाय केले पाहिजेत. हे श्वास घेताना कोणत्याही डायशी संबंधित वायू आत घेण्याची शक्यता कमी करण्यास मदत करते.

हेही वाचा : Asthma : रात्री अचानक येणारा दम्याचा झटका टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय?

तुम्ही तुमचे केस स्वतःडाय करत असाल तर याची खात्री करा:

  • डाय करताना हातमोजे घाला
  • कोणत्याही एलर्जीची प्रतिक्रिया तपासण्यासाठी प्रथम केसांच्या लहान भागावर डाय लावा
  • सूचना काळजीपूर्वक वाचा आणि दर्शविलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ केसांवर रसायन ठेवू नका
  • डाय केल्यानंतर केस चांगले धुवा

तसेच, डॉ. सेठी यांनी तुमच्या कोणत्याही अनपेक्षित प्रतिक्रियांचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही पूर्वी वापरलेल्या हेअर डाय पुन्हा वापरण्याची शिफारस केली आहे.

शेवटी, डॉ खालिद यांनी नमूद केले, “तुम्हाला तुमच्या टाळूवर काही ओरखडे किंवा जखम असल्यास कृपया डेअर डाय वापरू नका,” असे सांगून त्यांनी गर्भवती महिलांनी हेअर डायचा वापर वारंवार टाळला पाहिजे असे स्पष्ट केले.