आपण आपल्या आसपास असे लोक नेहमी पाहतो जे कालबाह्यता तारीख ओलांडलेले ( एक्सपायरी डेट) खाद्यपदार्थ सहज खातात. कारण ते टाकून देण्याची इच्छा त्यांना होत नाही. दुसरीकडे असेही काही लोक असतात की ज्यांना बिस्किट, प्रक्रिया केलेले मांस किंवा कॅनमधील खाद्यपदार्थ फेकून देताना अजिबात वाईट वाटत नाही, कारण त्या खाद्यपदार्थांनी कालबाह्यता तारीख (Best Before)तारीख संपलेली असते. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, ”सर्वच खाद्यपदार्थ कालबाह्यता तारीख ओलांडल्यानंतर खाणे आरोग्यासाठी हानीकारक असू शकते असे नाही.”
खाद्यपदार्थांवर सूचीबद्ध तारखा त्यांच्या सुरक्षिततेचा नव्हे तर गुणवत्तेचा संदर्भ देतात
युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चरने (USDA) दिलेल्या माहितीनुसार, खाद्यपदार्थांवर सूचिबद्ध केलेल्या अनेक तारखा त्यांच्या सुरक्षिततेचा नव्हे तर गुणवत्तेची माहिती देतात. याचा अर्थ असा की, काही पदार्थ तुम्ही कालबाह्यता तारखेनंतर खाल्ले तर त्यांचा त्रास होणार नाही. पण, त्याची नकारात्मक बाजू अशी आहे की, त्यांची चव नवीन पॅक केलेल्या उत्पादनासारखी असणार नाही.
कायद्याच्या आदेशानुसार, उत्पादकांनी ग्राहकांना आणि किरकोळ विक्रेत्यांना अन्न केव्हा उत्तम दर्जाचे आहे हे ठरवण्यात मदत करण्यासाठी तारखेचा उल्लेख करावा आणि infant formula वगळता तारखा उत्पादनाच्या सुरक्षिततेच्या सूचक नाहीत.
तरीही, डॉक्टर सांगतात की, ”तारखांवर लक्ष ठेवा आणि तारीख संपलेल्या वस्तू काळजीपूर्वक पाहा. कारण एक्स्पायरी डेट ओलांडलेले पदार्थांचे सेवन करणे आपल्यासाठी हानीकारक असू शकते.
कालबाह्य झालेले पदार्थ किती हानिकारक आहेत
कालबाह्य झालेले खाद्यपदार्थ हानीकारक जिवाणू, विषाणू आणि बुरशीने दूषित होऊ शकतात, ज्यामुळे आजार होऊ शकतात, नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे GI, बॅरिएट्रिक आणि रोबोटिक सर्जन, वरिष्ठ सल्लागार डॉ अरुण प्रसाद सांगतात की, “अन्नविषबाधेची लक्षणे सौम्य ते गंभीर अशी असू शकतात आणि त्यात मळमळ, उलट्या, अतिसार, पोटदुखी आणि ताप यांचा समावेश असू शकतो.”
कालबाह्य झालेले पदार्थ खाण्याच्या मुख्य धोक्यांपैकी एक म्हणजे जिवाणूजन्य दूषित होण्याचा धोका. कालबाह्य झालेल्या अन्नपदार्थांवर आढळणाऱ्या काही सामान्य प्रकारच्या जिवाणूंमध्ये एस्चेरिचिया कोलाई (ई. कोली), साल्मोनेला आणि लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स(Salmonella and Listeria monocytogenes) यांचा समावेश होतो.
“ई. कोलाई(e. coli) हा जिवाणूंचा एक प्रकार आहे, ज्यामुळे गंभीर अन्न विषबाधा होऊ शकते आणि बहुतेक वेळा कालबाह्य झालेल्या मांस आणि दुग्धजन्य पदार्थांवर आढळते.
साल्मोनेला हा आणखी एक प्रकारचा जिवाणू आहे, ज्यामुळे अन्नविषबाधा होऊ शकते आणि सामान्यतः ते कुक्कुटपालन, अंडी आणि कच्ची फळे आणि भाज्यांमध्ये आढळतात.
लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स हा एक प्रकारचा जिवाणू आहे, ज्यामुळे गर्भवती महिला, नवजात आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये त्याचे गंभीर संक्रमण होऊ शकते.
कालबाह्य झालेले खाद्यपदार्थ विषाणू आणि बुरशीने दूषित होऊ शकतात जसे की, नोरोव्हायरस आणि हिपॅटायटिस ए(Norovirus and hepatitis A) ज्यामुळे जठर व आतड्यांसंबधीत(gastrointestinal) आजार होऊ शकतात आणि ते अनेकदा दूषित पाण्यात आढळतात. एस्परगिलस आणि पेनिसिलियमसारखी(Aspergillus and Penicillium) बुरशी मायकोटॉक्सिन(Mycotoxins) नावाची विषारी संयुगे तयार करू शकतात, ज्यामुळे यकृताचे नुकसान आणि इतर आरोग्य समस्या होऊ शकतात.
हेही वाचा : चपातीला तूप लावून खावे की नाही? डॉक्टरांकडून जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
या गोष्टी लक्षात ठेवा
१.ग्लॅमिओ हेल्थचे सह-संस्थापक प्रीत पाल ठाकूर सांगतात की, “पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांची कालबाह्य होण्याची एक तारीख ठरलेली असते आणि तुम्ही ते त्या तारखेपूर्वी खावे. हे मुख्यतः त्यांच्यामधील प्रिझर्व्हेटिव्ह्जमुळे होते, जे कालबाह्यता तारखेपर्यंत अन्न टिकवून ठेवण्यास मदत करते.”
२. अन्नपदार्थ त्यांची गुणवत्ता गमावू शकतात. कालबाह्यता तारीख ओलांडलेल्या पदार्थांमध्ये खराब किंवा शिळी चव निर्माण होऊ शकते, परंतु लक्षात ठेवण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वेळोवेळी पौष्टिक सामग्रीदेखील गमावू शकतात. “पोषक मूल्य मिळविण्यासाठी तुम्ही ताजे अन्न खाण्याची शिफारस केली जाते.” असेही ठाकूर यांनी सांगितले.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.)