Is Jalebi- Rabdi Good For Migraine: सतत मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर जगत असताना डोळ्यांवर ताण येणे हे साहजिक आहे. इतकंच नाही तर या स्क्रीनमधून निघणाऱ्या घातक किरणांमुळे डोकेदुखीचा त्रास सुद्धा वाढू शकतो. डोकेदुखी ही समस्या आता इतकी सामान्य झाली आहे की प्रत्येक वेळी डोकं दुखल्यावर गोळ्या- औषधे घेणे हे आरोग्य आणखी बिघडवू शकते. अशावेळी सर्वात सोपा व सुरक्षित पर्याय म्हणजे आयुर्वेदिक उपचार. डोकेदुखीवर अनेक आयुर्वेद तज्ज्ञांनी विविध उपाय सांगितले आहेत. पण आज आपण डोक्यासह जिभेचे चोचले पुरवणारा एक चविष्ट उपाय पाहणार आहोत. इंस्टाग्रामवर आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार रबडी व जिलेबी खाल्ल्याने डोकेदुखी व विशेषतः मायग्रेनवर कसा परिणाम होतो हे आपण पाहूया…
डॉ. मिहीर सांगतात की, पहाटे शरीरातील वात वाढून याच वेळी वेदना वाढण्याची शक्यता असते. जिलेबी व रबडी हे वात दोषांमध्ये संतुलन आणतात तसेच मायग्रेनच्या डोकेदुखीचा सामना करण्यास मदत करतात.
डॉ. अवंतिका कृष्णा किल्ला, निसर्गोपचार चिकित्सक आणि संस्थापक, पंचतत्त्व यांच्या माहितीनुसार, शरीरात जेव्हा कॅसिन हे एक प्रोटीन वाढू लागते तेव्हामायग्रेन डोकेदुखी बळावण्याची शक्यता असते. दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारे कॅसिन हे आजारांसाठी एक प्रमुख कारण आहे, विशेषतः ज्यांना आतड्यांशी संबंधित आजार आहेत. त्यामुळे आजार दूर करण्यासाठी तुम्हाला जीवनशैलीत प्राथमिक बदल करणेच अधिक हिताचे ठरू शकते.
आहारतज्ञ गरिमा गोयल यांच्या माहितीनुसार, तुम्हाला मायग्रेनचा त्रास असला तरी अन्य आजारांच्या चाचण्यांशिवाय केवळ दाव्याच्या आधारे कोणतेही अन्न किंवा पेय सुचवले जाऊ शकत नाही.
जिलेबी व रबडीच्या सेवनाने उद्भवणारे धोके सुद्धा जाणून घेऊया…
१) जिलेबी बनवण्यासाठी रिफाईंड गव्हाचे पीठ किंवा मैदा वापरल्यास हा निश्चितच एक घातक पर्याय ठरतो. याचे कारण असे की रिफाईंड गहू ही फक्त साधी साखर असते, ज्यामध्ये फायबर नसते. हे नियमितपणे सेवन केल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, हायपरकोलेस्टेरोलेमिया, उच्च रक्तदाब असे आजार होऊ शकतात. तसेच, फायबरच्या कमतरतेमुळे तुम्हाला बद्धकोष्ठता जाणवू शकते.
२) मधुमेह आणि प्री-डायबेटिससाठी जिलेबी अत्यंत घातक ठरू शकते. सकाळी जिलेबीचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि कोणत्याही दावा केलेल्या फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.
हे ही वाचा << किडनी बिघडताना शरीर ओरडून देतं असतं ‘हे’ संकेत; वेळीच ओळखून मूत्रपिंड निकामी होणे टाळा
जिलेबी हायड्रोजनेटेड तेलात तळलेले असतात जे ट्रान्स फॅट्सने भरलेले असते. ट्रान्स फॅट्स कर्करोगासाठी बूस्ट आहे. तसेच, जिलेबीसह दिल्या जाणाऱ्या रबडीमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि साखरही असते, त्यामुळे डोकेदुखी नियंत्रणात येईपर्यंत साधारण १ ते ३ आठवडे जिलेबी व रबडी (प्रमाणात) खाऊ शकता. जर तुम्हाला अगोदरच डायबिटीज किंवा दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असेल तर हे सेवन पूर्णपणे टाळावे.
डोकेदुखी कमी करण्यासाठी उपाय काय
- कॅफिन, कार्बोनेटेड पेये, कॅसिन, चॉकलेट्स, चीज, लिंबूवर्गीय आणि दही यांसारखे पदार्थ टाळा .
- आंबवलेले पदार्थ, मॅरीनेट केलेले पदार्थ, साखर, रेड वाईन टाळा
- झोपण्याच्या आधी ३० मिनिटे डोक्याला बर्फाच्या थंड स्पॉंजने पुसून घ्या. यामुळे डोक्याच्या रक्तवाहिन्यांचे संकोचन होते आणि सेरोटोनिन सोडले जाते जे संपूर्ण शरीराला विश्रांती मिळवून देते तसेच चांगली झोप लागते.
- भरपूर पाणी प्या. हायड्रेशनमुळे कोणत्याही प्रकारची डोकेदुखी टाळता येईल.
- नियमितपणे योगा करा. विशेषत: कपालभाती, प्राणायाम जसे की डाव्या नाकपुडीत श्वास घेणे, भ्रमरी, अनुलोम-विलोम करा.