आधुनिक आहारतज्ज्ञ सकाळी उठल्या-उठल्या नाश्ता (न्याहरी) करण्याचा सल्ला देतात, तो योग्य असतो काय?याचा जरा विचार करू. ब्रेकफास्ट म्हणजे रात्रभर पोट रिकामे असते, म्हणून सकाळी उठल्यावर भरपूर नाश्ता करावा व फास्ट (उपवास) ब्रेक करावा असे यांचे मत. ‘परंतु आपले शरीर सकाळ सकाळी उठल्या -उठल्या आहारग्रहणासाठी तयार असते काय?’या प्रश्नाचे उत्तर (अर्धशिशीचे रुग्ण, क्षयाचा उपचार घेणारे रुग्ण, ज्यांचा अग्नी प्रखर असतो अशा पित्तप्रकृती व्यक्ती,व्यायामपटू,खेळाडू असे अपवाद वगळता)’नाही’ असेच द्यावे लागेल.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा शरीराचे तापमान तुलनेने कमी असते,शरीराचा मेटाबोलिक रेटही मंदावलेला असतो,यालाच आयुर्वेद ‘अग्नी मंद असतो’ असे म्हणते.

आणखी वाचा: Health Special: गुणकारी ताकाची गोष्ट

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
weather department, Cold weather
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
North Maharashtra gets colder Know why cold and how long
उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जाणून घ्या, थंडी का आणि किती दिवस?
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की आरोग्या बाबतचा कोणताही मुद्दा किंवा जीवनशैलीबाबतचा एखादा सल्ला हा सरसकट सर्वांनाचा कसा काय लागू होऊ शकतो? मनुष्याची प्रकृती,त्याचे वय,त्याचा अग्नी (भूक,अन्नसेवन,पचनशक्ती व चयापचय), त्याचे बल, त्याच्या शरीराला होणारा व्यायाम, कामाचे-व्यवसायाचे स्वरुप… एकंदरच जीवनशैली आणि त्या वेळचा ऋतू, सभोवतालचे वातावरण आदि घटकांचा विचार न करता एकच एक सल्ला आंधळेपणे सर्वांनाच लागू करणे अयोग्य आणि अवैज्ञानिक आहे, हे आयुर्वेदाला मान्य नाही.

त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर आदल्या रात्री सेवन केलेले अन्न पचले आहे का? हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे असते. आजच्या वेगवान जीवनामध्ये तुम्ही जेव्हा रात्री उशिरा जेवता व जेवणानंतर अर्ध्या-एक तासात झोपता, तेव्हा सकाळी उठल्यानंतर ते रात्रीचे जेवण पचलेले असण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच असे रात्री सेवन केलेले अन्नच जेव्हा पचलेले नसते,तेव्हा केवळ ’आधुनिक आहारशास्त्र’ सांगते, म्हणून सकाळी उठल्यानंतर ‘ब्रेकफ़ास्ट’ करणे योग्य नाही. कारण भूक नसताना केले जाणारे हे अन्नसेवन एक नव्हे विविध रोगांना आमंत्रण देणारे होऊ शकते.

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात रक्तदाब वाढू शकतो!

अग्निमांद्य या मुद्याचा पावसाळ्याच्या अनुषंगाने विचार केल्यास तर सकाळी उठल्याउठल्या न्याहारी करणे योग्य नाहीच. पावसाळ्यातील त्रिदोषांचा प्रकोप आणि महत्त्वाचे म्हणजे अग्नीमांद्य (भूक व पचनशक्ती मंदावलेली)असताना केवळ आहारतज्ज्ञ सांगतात, म्हणून सकाळी उठल्यावर नाश्ता करणे योग्य नाहीच , उलट रोगांना आमंत्रक होईल. हिवाळ्यातल्या थंडीमध्ये अग्नी प्रखर असताना जेव्हा सकाळी उठल्या-उठल्या भूक लागते, तेव्हा सकाळी सकाळी इतर सोपस्कार सोडून सर्वप्रथम अन्नग्रहण करणे योग्य राहील, तसा सल्लाही आयुर्वेदाने हिवाळ्याच्या ऋतूचर्येमध्ये दिलेल आहे, मात्र पावसाळ्यामध्ये उठल्या-उठल्या अन्नसेवन करणे कदापि योग्य नाही.

पावसाळ्यात अग्नी मंद असतो, म्हणजे भूक व पचनशक्ती उत्तम नसते, त्यामुळे अशा अवस्थेत शरीराने ग्रहण केलेले अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे शरीराला पोषण देण्याऐवजी रोगकारक होण्याची शक्यताच जास्त. तसाही या दिवसांत अपचनाचा आणि अजीर्णजन्य विविध विकृती बळावल्याचा अनुभव येतो, तो भूक नसताना वेळीअवेळी अन्नसेवन केल्यामुळेच. याच कारणामुळे पावसाळ्याच्या या दिवसांत निदान पावसाळ्याच्या आरंभीच्या काही आठवड्यात तरी अन्नसेवन मर्यादेत करायला हवे, तसा सल्लाच आयुर्वेदाने दिलेला आहे की पावसाळ्यात अल्पाहारी व्हा. त्या सल्ल्याचे अनुसरण करण्यासाठीच तर या पावसाळ्यात इतके उपवास सांगितले आहेत. असे असतानाही सकाळी उठल्यावर अन्नसेवन करणे योग्य कसे ?

मतितार्थ हाच की पावसाळ्यात आपल्या भुकेचा अंदाज घेऊनच सकाळी कधी ‘ब्रेकफ़ास्ट’ करायचा,ते ठरवा.