परफ्यूम, अत्तर लावून घराबाहेर पडण्याची सवय अगदी अनेकांना अंगवळणी पडलेली असते. प्रत्येकालाच प्रेझेंटेबल राहायला आवडतं. यात परफ्यूम वापरणाऱ्या माणसांचं ठीक आहे, परंतु श्वान पाळणारे पालक त्यांच्या स्वच्छतेची अगदी काटेकोरपणे काळजी घेतात आणि आता असंही ऐकू आलंय की एका लक्झरी ब्रँडने अलीकडेच पाळीव प्राण्यांसाठी खास परफ्यूम लाँच केले आहे.
या लाँचनंतर पाळीव प्राण्यांचं संगोपन करत असलेल्या पालकांमध्ये त्याविषयीच्या सुरक्षिततेबद्दल आणि या परफ्यूमचा परिणाम त्यांच्या पाळीव प्राण्यांवर होण्याची चिंता निर्माण झाली आहे. या परफ्यूममुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो का? आपल्या पाळीव प्राण्यावर हे परफ्यूम वापरण्याअगोदर कोणती खबरदारी घ्यावी? हेच आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.
Indianexpress.com ने या उत्पादनातील बारकावे समजून घेण्यासाठी एका पाळीव प्राणी तज्ज्ञाशी संपर्क साधला.
“तथापि, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की पाळीव प्राणी, विशेषत: श्वानांना मानवांपेक्षा जास्त तीव्र वास येतो. मजबूत सुगंध त्यांच्यासाठी जबरदस्त आणि संभाव्य त्रासदायक असू शकतात, म्हणूनच पाळीव प्राण्यांसाठी विशिष्ट परफ्यूम निवडणे महत्त्वाचे आहे, जे सौम्य आणि त्रासदायक नसतील असे तयार केले जातात,” असे ते म्हणाले.
हेही वाचा… आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘हे’ पॉवर ड्रिंक ठरेल वरदान! आहारतज्ज्ञांनी सांगितले फायदे
“पाळीव प्राण्यांचे परफ्यूम सामान्यत: विशेष काळजी घेऊन डिझाइन केलेले असतात आणि ते योग्यरितीने वापरल्यास त्याचा पाळीव प्राण्यांच्या वासाच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम होत नाही असे म्हटले जाऊ शकते, असं ग्रोवेल पेट न्यूट्रिशनचे व्यवसायप्रमुख जे. एस. रामा कृष्णा म्हणाले.
“तथापि, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की पाळीव प्राणी, विशेषत: श्वानांकडे मानवांपेक्षा जास्त तीव्र वास घेण्याची क्षमता असते. स्ट्राँग सुगंध श्वानांसाठी त्रासदायक असू शकतात.
पाळीव प्राण्यांना परफ्यूम लावताना लक्षात ठेवण्याची खबरदारी
पाळीव प्राणी-विशिष्ट उत्पादने निवडा: विशेषतः पाळीव प्राण्यांसाठी डिझाइन केलेले परफ्यूम वापरा, कारण मानवी परफ्यूममध्ये प्राण्यांसाठी हानिकारक रसायने असतात.
पाणी मिसळून वापरा: विक्रेत्यांनी दिलेल्या सुचनेनुसार परफ्युममध्ये पाणी मिसळा.
नैसर्गिक घटक: नैसर्गिक, नॉन-टॉक्सिक घटक असलेली उत्पादने निवडा. अल्कोहोल, इसेंशियल ऑईल किंवा कृत्रिम सुगंध असलेले परफ्यूम टाळा, ज्यामुळे चिडचिड किंवा अॅलर्जी होऊ शकते.
पॅच टेस्ट: रिअॅक्शन चेक करण्यासाठी पूर्ण परफ्यूम वापरण्याआधी आपल्या पाळीव प्राण्याच्या त्वचेच्या लहान भागावर परफ्यूमची चाचणी करा.
संवेदनशील भाग टाळा: तुमच्या पाळीव प्राण्याच्या चेहऱ्याजवळ, विशेषत: डोळे, नाक आणि तोंडाभोवती परफ्यूम वापरू नका. परफ्यूम पाठीमागे किंवा मानेला लावा जिथे श्वान स्वत:ला चाटण्याची शक्यता कमी असते.
नियंत्रण: परफ्यूम जपून वापरा; अगदी कमी प्रमाण पुरेसे आहे, कारण अतिवापरामुळे अस्वस्थता किंवा आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
कृष्णा यांनी विशेषतः श्वानांसाठी खालील घटक टाळण्याचा सल्ला दिला:
तेल: निलगिरी आणि लॅव्हेंडरसारखी तेले टाळा, जे विषारी असू शकतात.
इथेनॉल (अल्कोहोल): यामुळे अॅलर्जी आणि चिडचिड होऊ शकते.
पॅराबेन्स: या संरक्षकांमुळे हार्मोनल असंतुलन आणि त्वचेची जळजळ होऊ शकते.
थॅलेट्स (Phthalates): सुगंध वाढवण्यासाठी वापरली जाणारी रसायने, संभाव्यतः अंतःस्रावी कार्यात व्यत्यय आणतात.
…आणि परफ्यूम वापरण्यासाठी जेव्हा मांजरींचा प्रश्न येतो तेव्हा
तेल: टी-ट्री ऑईल, निलगिरी आणि लिंबूवर्गीय तेल टाळा, जे अत्यंत विषारी आहेत.
फिनॉलयुक्त संयुगे: ही संयुगे कृत्रिम सुगंध आणि स्वच्छता करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलमध्ये आढळतात, जे हानिकारक असू शकतात.
इथेनॉल (अल्कोहोल): सेवन केल्यास हे विषारी ठरते आणि त्वचेवर जळजळ होऊ शकते.
या परफ्यूमशी संबंधित संभाव्य आरोग्य धोके काय आहेत?
कष्णा यांनी पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी त्वचेची जळजळ ही प्रमुख चिंता असल्याचे नमूद केले. काही पाळीव प्राणी परफ्यूममधील रसायनांवर नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकतात, परिणामी पुरळ किंवा खाज सुटू शकते. परफ्यूममधील घटकांमुळे शिंका येणे, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या अॅलर्जीक प्रतिक्रियादेखील होऊ शकतात. जर पाळीव प्राण्यांनी त्यांच्या केसातील परफ्यूम चाटला, तर यामुळे उलट्या किंवा अतिसारसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात.