Rajamudi Rice Benefits: जगभरातील लोकांच्या दैनंदिन आहारात तांदूळ हा अविभाज्य घटक आहे. तांदळाचे त्याच्या किमतींनुसार असंख्य प्रकार आहेत. प्रत्येक तांदळाची स्वतःची अशी वेगळी चव, रंग आणि पोषक घटकही आहेत. त्यापैकी राजामुडी तांदूळ हा मूळचा कर्नाटकमध्ये पिकविला जाणारा लाल तांदूळ आहे, जो त्याच्या संभाव्य आरोग्यदायी फायदे आणि अद्वितीय चव यांसाठी ओळखला जातो.

राजामुडीची पांढऱ्या आणि लाल तांदळाशी तुलना

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, बंगळुरू येथील क्लिनिकल आहार तज्ज्ञ व पोषण तज्ज्ञ डॉ. ट्विन्सी ॲन सुनील यांनी सांगितले, “राजामुडी तांदळाचे विशिष्ट पौष्टिक फायदे आहेत. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत राजामुडीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि या कारणास्तव तो मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. त्याव्यतिरिक्त ते उच्च फायबर आणि प्रथिनांमध्ये वाढ करते; जे ग्लुटेन असहिष्णुता असलेल्यांसाठी फायदेशीर आहे.”

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
your sleep position can tell about your health
Sleep Position : तुम्ही कसे झोपता? तुमची झोपण्याची स्थिती तुमच्या आरोग्याविषयी काय सांगते? घ्या जाणून….
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Kahishma Kapoor
पन्नाशीतही सुंदर दिसणारी करिष्मा कपूर म्हणते, “मी माझ्या फिटनेसला फारसे महत्त्व देत नाही”; काय आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य?
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
  • फायबर

पांढऱ्या तांदळात कमीत कमी फायबर असते आणि लाल तांदळात ते मध्यम प्रमाणात असते. परंतु, राजामुडी तांदूळ या दोघांनाही मागे टाकतो आणि पचनशक्ती वाढवतो.

  • प्रथिने

पांढरे तांदूळ कमीत कमी प्रथिने पुरवतो; परंतु यात प्रोटीन अधिक असते. लाल तांदूळ थोडासा सुधारतो. राजामुडी तांदूळ दोन्हींपेक्षा चांगला आहे.

  • ग्लायसेमिक इंडेक्स (GI)

पांढऱ्या तांदळात उच्च GI असतो; ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढते. तर, लाल तांदळात मध्यम स्वरूपाचा GI असतो. राजामुडीमध्ये या दोन्ही तांदळांच्या तुलनेत कमी GI आहे; जो रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे .

राजामुडी तांदूळ शिजविण्याच्या टिप्स

राजामुडी तांदूळ स्वयंपाक करण्यापूर्वी भिजविल्याने त्याचा फायदा होतो . “३० मिनिटे ते तासभर भिजवून ठेवल्याने त्याची चव आणि सुगंध वाढतो,” डॉ. ट्विन्सी म्हणतात. ही प्रक्रिया काही स्टार्च तोडण्यास मदत करते; ज्यामुळे काही लोकांची पचनशक्ती सुधारते.

तसेच राजमुडी तांदूळ शिजायला पांढऱ्या तांदळापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो; पण लाल तांदळाच्या तुलनेत कमी वेळ लागतो.

हेही वाचा: टोमॅटो सॉसमधील भेसळ कशी ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

राजामुडी तांदळापासून इतर कोणते पदार्थ बनवू शकता?

राजामुडी तांदूळ विविध पदार्थांमध्ये पांढऱ्या किंवा लाल तांदळाला तो पर्याय बनू शकतो. या तांदळाची बिर्याणी आणि पुलावही खूप छान लागतो.

डोसा आणि इडली यांसारखे पदार्थ बनविण्यासाठी राजामुडी तांदळाच्या पिठाचा वापर केला जाऊ शकतो .

हा तांदूळ भाज्यांबरोबरही खूप छान लागतो. तसेच शिजविलेला राजामुडी तांदूळ सूपबरोबरही चविष्ट लागतो.

राजामुडी तांदूळ प्रामुख्याने कर्नाटकात पिकविला जाणारा तांदूळ आहे आणि पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत त्याची किंमत जास्त आहे. तथापि, डॉ. ट्विन्सी सांगतात, “त्याचे उत्कृष्ट पोषण आणि अद्वितीय चव, गुणधर्मांमुळे किमतीत किंचित वाढीची झळ सोसावी लागली तरी तो फायदेशीर ठरतो.”

राजमुडी तांदूळ पांढऱ्या आणि लाल तांदळाला पौष्टिक आणि चवदार पर्याय ठरू शकतो. उच्च फायबर व प्रथिन सामग्री, कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि वेगळ्या चवीसह अनेकांसाठी एक निरोगी पर्याय आहे.