“डॉक्टर, समीर इतका चांगला मुलगा, अभ्यासात हुशार, आज्ञाधारक, शांत. इतका मोठा मानसिक आजार त्याला कसा काय झाला? तो ही इतक्या लहानपणी, फक्त १६ वर्षांचा होता हो तो जेव्हा आजार सुरू झाला तेव्हा? आमचे काही चुकले का?” समीरची आई व्याकुळ होऊन विचारात होती.
असे का झाले हे समजून घ्यायचे असले तर स्कीझोफ्रेनियाची कारणे जाणून घेतली पाहिजेत. अनुवांशिकता हे एक महत्त्वाचे कारण स्किझोफ्रेनियामध्ये दिसून येते. कुठल्या एका विशिष्ट जनुकामध्ये किंवा गुणसूत्रामध्ये दोष असल्यामुळे स्किझोफ्रेनिया होत नाही, तर अनेक जनुकांमध्ये आढळणाऱ्या बदलांमुळे किंवा दोषांमुळे हा मानसिक विकार होतो. पेशंटच्या भावामध्ये किंवा बहिणीमध्ये स्किझोफ्रेनिया होण्याची १०% शक्यता असते. आई किंवा वडील यांच्यापैकी एकाला हा आजार असेल, तर मुलांमध्ये हा आजार होण्याची १३% शक्यता राहते, परंतु आई वडील दोघांना जर स्किझोफ्रेनिया असेल तर मुलांमध्ये होण्याची शक्यता वाढून ती ४६% इतकी होते. तंतोतंत सारखे असणारे जे जुळे असतात, त्यांच्यामध्ये ५०% शक्यता स्किझोफ्रेनिया होण्याची असते. समीरच्या बाबतीतही त्याच्या घरात कोणाला असा आजार आहे अशी चौकशी केल्यावर कळले, की त्याच्या काकांना असा त्रास अनेक वर्षांपासून सुरू आहे.


मात्र महत्त्वाची गोष्ट अशी की फक्त अनुवांशिकतेमुळे नाही तर, त्या बरोबरच वातावरणातील विविध घटकही स्किझोफ्रेनिया होण्याला तितकेच जबाबदार असतात. किंबहुना या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावरच हा आजार होतो. घरातील वातावरण, एकमेकांशी असलेले नातेसंबंध, एकमेकांशी असलेला विसंवाद याचा घरामध्ये स्किझोफ्रेनियाचा इतिहास असलेल्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होतो. अशा व्यक्तीची समस्यांना तोंड देण्याची क्षमता कमी पडू शकते. काही वेळा स्वभावही थोडा विक्षिप्त, एकलकोंडा अस असतो. शिवाय त्या त्या वेळेला मानसिक ताण वाढवणारी परिस्थिती असेल तर स्किझोफ्रेनिया होऊ शकतो.

life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

आणखी वाचा: दुभंगलेल्या मनाचा विकार


समीरची अधिक खोलात जाऊन माहिती घेतल्यावर लक्षात आले, की त्याचा स्वभाव शांत आणि तो आज्ञाधारक होता, पण त्याला मित्र जवळजवळ नव्हते. कधी बाहेर खेळायला जायचा नाही. इतर मुलांमध्ये मिसळून जाणे त्याला जमायचे नाही. एकूण अलिप्त होता. भावाशी भावनिक जवळीक फारशी नव्हती. म्हणजे त्याच्या बाबतीत स्किझोफ्रेनियाची शक्यता वाढवणारा आणखी एक मुद्दा होता, त्याचा स्वभाव. दहावीचा, परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा त्याला ताण आला, तो वाढत गेला, पण त्याला तो तोंड देऊ शकला नाही. घरातही वडील फार शिस्तीचे, घरातले सगळे त्यांना घाबरून राहणारे, त्यांचे मत पटो ना पटो आई त्यांचे ऐकणारी. समीर कधीही मनातले काही सांगत नसे आणि घरातल्या वातावरणात अलिप्त राहत असे.

समीरच्या बाबतीत अनेक घटक स्किझोफ्रेनिया व्हयला जबाबदार ठरले असे लक्षात येते. कोणा एका व्यक्तीचा हा दोष नसतो, किंवा दोन अधिक दोन चार असे साधे बेरजेचे गणित नसते. तर विविध घटकांच्या परस्पर प्रक्रियांमुळे स्किझोफ्रेनिया हा मानसिक विकार होतो. जशी अनुवांशिकता महत्त्वाची आहे, तसेच व्यक्तीच्या अगदी लवकरच्या वाढीमध्ये निर्माण होणाऱ्या दोषांमुळे, विशेषतः मज्जासंस्थेच्या विकासाच्या प्रारंभिक टप्प्यातल्या निर्माण झालेल्या विकृती(neurodevelopmental disorder) स्कीझोफ्रेनियाला जबाबदार असतात असे संशोधनाने सिद्ध झाले आहे. तसेच मेंदूमध्ये अनेक रचनात्मक आणि कार्यात्मक बदल होतात, जसे की मेंदूचा आकार लहान होतो, मेंदूतील पोकळ॒यांचा आकार वाढतो. मेंदूचा सगळ्यात पुढचा भाग, आपल्या भावभावना आणि स्मरणशक्ती नियंत्रण करणारे भाग यांचे आकारमानही लहान झालेले दिसते.

आणखी वाचा: Health Special: सतत वेदना आणि थकवा देणारा ‘हा’ आजार कोणता?


अशा अनेक बदलांबरोबर मेंदूतील रसायनांचे प्रमाण बदलते. डोपामिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे विविध चुकीचे विश्वास, भास तयार होतात, तर काही ठिकाणचे डोपामिनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे, काही कार्ण्यात्ल्कार्ण्यात्ला पुढाकार, उत्साह नाहीसा होतो, लोकांशी बोने कमी होते, स्वतःची काळजी घेण्याची इच्छाच निर्माण होत नाही, त्यामुळे दात घासणे, अंघोळ करणे, जेवणे अशा प्रत्येक क्रियेसाठी मागे लागावे लागते. सिरोटोनिन, ग्लुटामेट अशा रासायनिक द्रव्यांचेही संतुलन ढळलेले दिसून येते.


याचा अर्थ स्किझोफ्रेनिया हा विकार होतो त्याला अनेक कारणे असतात, तसेच लक्षणे विविध प्रकारची असतात. टीबी सारखा आजार होत्तो, त्यातही टीबीचे जीवाणू जसे जबाबदार असतात, तसेच घरात कोणाला टीबीचा आजार कधी झाला होता का ही माहिती आवश्यक असते. तसेच रूग्णामध्ये पोषक आहाराची कमतरता आहे का, शारीरिक प्रतिकारशक्ती कमी होण्याची आणखी काही करणे आहेत का असे सगळे घटक विचारात घ्यावे लागतात. उपचार करताना औषधे तर दिली जातातच, पण त्या बरोबर रुग्णाचे पोषण, प्रतिकारशक्ती या साठीही उपाय योजना केली जाते. रुग्णाने उपचार मध्येच सोडून देऊ नयेत यासाठी नातेवाईकांना समजावणे आवश्यक असते. आता तर रोज दवाखान्यात जाऊन औषधे घेण्याची सोय उपलब्ध असते.


अशाच प्रकारे स्किझोफ्रेनियाचे उपाय हेही बहुआयामी आणि खूप काळ पर्यंत चालणारे असतात. केवळ मनोविकारतज्ज्ञ नाही, तर मानसोपचारतज्ज्ञ, आणि घरातील नातेवाईक यांचाही उपचारांमध्ये मोठा सहभाग असतो. उपचारांची चर्चा पुढच्या लेखात.

Story img Loader