“डॉक्टर, समीर इतका चांगला मुलगा, अभ्यासात हुशार, आज्ञाधारक, शांत. इतका मोठा मानसिक आजार त्याला कसा काय झाला? तो ही इतक्या लहानपणी, फक्त १६ वर्षांचा होता हो तो जेव्हा आजार सुरू झाला तेव्हा? आमचे काही चुकले का?” समीरची आई व्याकुळ होऊन विचारात होती.
असे का झाले हे समजून घ्यायचे असले तर स्कीझोफ्रेनियाची कारणे जाणून घेतली पाहिजेत. अनुवांशिकता हे एक महत्त्वाचे कारण स्किझोफ्रेनियामध्ये दिसून येते. कुठल्या एका विशिष्ट जनुकामध्ये किंवा गुणसूत्रामध्ये दोष असल्यामुळे स्किझोफ्रेनिया होत नाही, तर अनेक जनुकांमध्ये आढळणाऱ्या बदलांमुळे किंवा दोषांमुळे हा मानसिक विकार होतो. पेशंटच्या भावामध्ये किंवा बहिणीमध्ये स्किझोफ्रेनिया होण्याची १०% शक्यता असते. आई किंवा वडील यांच्यापैकी एकाला हा आजार असेल, तर मुलांमध्ये हा आजार होण्याची १३% शक्यता राहते, परंतु आई वडील दोघांना जर स्किझोफ्रेनिया असेल तर मुलांमध्ये होण्याची शक्यता वाढून ती ४६% इतकी होते. तंतोतंत सारखे असणारे जे जुळे असतात, त्यांच्यामध्ये ५०% शक्यता स्किझोफ्रेनिया होण्याची असते. समीरच्या बाबतीतही त्याच्या घरात कोणाला असा आजार आहे अशी चौकशी केल्यावर कळले, की त्याच्या काकांना असा त्रास अनेक वर्षांपासून सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा