अभिनेता मनोज बाजपेयी आपल्या दर्जेदार अभिनयामुळे चर्चेत तर आहेतच; पण यावेळी ते त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहेत. त्यांनी एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी १४ वर्षांपासून रात्रीचे जेवण केले नसल्याचा खुलासा केला आहे. ते रात्री अजिबात जेवण करत नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोज बाजपेयी असे करतात. सहसा लोक तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम आणि योगासने करतात, व्यायामशाळेत जातात आणि दिवसातून तीन वेळ जेवतात. पण, मनोज बाजपेयी यांनी आपल्या दिनक्रमातून रात्रीचे जेवण पूर्णपणे वगळले आहे.

कुणालाही हे ऐकून आश्चर्य वाटेल की, मनोज बाजपेयी असे का करतात? ते दिवसाचे शेवटचे जेवण दुपारी ३ वाजता करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ते तंदुरुस्त राहतात आणि असे केल्याने त्यांचे वजन नियंत्रणात राहते, असे त्यांचे म्हणणे आहे. सहसा लोक फिट राहण्यासाठी व्यायाम आणि योगासने करतात, जिमला जातात आणि दिवसातून तीन वेळ जेवतात. पण, मनोज वायपेयी यांनी त्यांच्या दिनक्रमातून रात्रीचे जेवण पूर्णपणे काढून टाकले आहे. पण असे केल्याने खरोखर वजन कमी होऊ शकते काय, प्रत्येक जण रात्रीचे जेवण वगळू शकतो का? याच विषयावर म्हैसूरमधील मणिपाल हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त

(हे ही वाचा : सकाळच्या नाश्त्यात अंड्यांऐवजी दररोज मूठभर काजू खाल्ल्याने हृदय राहील निरोगी, ठणठणीत? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या… )

“वजन कमी करण्यासाठी अनेक लोक नवनवीन मार्ग वापरत असतात. कुणी हेवी डाएटिंग करतात, तर कुणी तासन् तास जिममध्ये घाम गळतात. त्याच वेळी असेही बरेच लोक आहेत की, जे रात्री न जेवताच झोपी जातात. त्याचे आपल्या शरीरावर उलट परिणाम होऊ शकतात. आपल्या शरीरासाठी पोषण आहाराची गरज असते. खरे तर सकाळी १० वाजता हलका नाश्ता करा, दुपारी १२ पर्यंत दुपारचे जेवण करा आणि ५.३० पर्यंत लवकर डिनर करा. मग रात्रभर उपवास करा,” असे ते सांगतात.

वजन कमी करण्यासाठी मुख्य आहार सोडू नका. जेवण सर्वांत महत्त्वाचे आहे. कारण- ते तुमच्या शरीराला शरीराची सर्व कार्ये योग्यरीत्या पार पाडण्यासाठी पुरेसे पोषण आणि ऊर्जा देते, जेवण वगळल्याने तुम्हाला अशक्तपणा जाणवतो. अन्नाचे पचन हे मुख्य कॅलरी बर्नर आहे. नियमितपणे न खाल्ल्याने शरीराचा चयापचय दर कमी होतो. न खाल्ल्याने शरीरावर ताण वाढतो. रात्रीचे जेवण किंवा इतर कोणतेही जेवण वगळणे हा वजन कमी करण्याचा सुरक्षित पर्याय नाही. कायम लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी योग्य अन्न खा; कमी नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

यूकेतील एका अभ्यासात असे आढळून आले की, सहा आठवड्यांसाठी दररोज आठ तासांत मर्यादित प्रमाणात अन्न सेवन केल्याने पुरुषांचे सरासरी वजन चार पौंड आणि महिलांसाठी २.९ पौंड कमी होते. पण, जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण वगळले, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरातील चयापचय दरावर होतो. रात्रीचे जेवण वगळल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो आणि सुरुवातीच्या टप्प्यात एखाद्या व्यक्तीची ऊर्जा कमी होऊ शकते. म्हणूनच मधुमेह असलेल्या लोकांनी आधीच खबरदारी घेतली पाहिजे.

Story img Loader