Exercises for PCOS: अनेक महिला आणि मुलींना पीसीओएसचा त्रास असतो. या समस्येत शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. शरीरात ॲस्ट्रोजनऐवजी टेस्टोस्टेरोन हे पुरुषी हार्मोन्स वाढते. पीसीओएसमध्ये चेहऱ्यावरचे व अंगावरचे केस वाढणे, पाळी अनियमित येणे, चेहऱ्यावर मुरमे वा पुटकुळ्या येणे, ओटीपोट वाढणे, तसेच गर्भधारणेत अडचणी जाणवणे या समस्या जाणवतात. पीसीओएस ही गंभीर समस्या असली तरी योग्य व संतुलित आहार आणि व्यायाम याद्वारे ती नियंत्रित करता येते. पीसीओएस हाय इंटेन्सिटी व्यायामाने कमी होतो हे कोणत्याही संशोधनाने सिद्ध केले नाही. परंतु, योग्य प्रकारचे स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतल्याने पीसीओएसची लक्षणे कमी होण्यास मदत होते, अशी माहिती होलिस्टिका वर्ल्डचे संस्थापक व संचालक डॉ. धर्मेश शाह यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे.

हाय इंटेन्सिटी व्यायाम महिलांना कशी मदत करतो?

Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
EPF Pension Scheme Eligibility
EPF Pension Schemeसाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या काय आहे पात्रता, आर्थिक सुरक्षा आणि करबचत फायदे
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : खंक तिजोरी ओरबाडण्याचा कार्यक्रम
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

हाय इंटेन्सिटी व्यायामामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते. चेहऱ्यावर मुरमे आणि त्वचेवरील केसांची जास्त वाढ यांसारखी लक्षणे कमी होऊ शकतात. शाह यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी हाय इंटेन्सिटी व्यायामाची मदत होते. त्यांच्या मते, पॉलीसिस्टिक डिंब ग्रंथी रोग हा चयापचय आणि जीवनशैलीच्या बदलांमुळे उदभवणारा हार्मोनल विकार आहे. त्यामुळे मासिक पाळीत अडथळा येतो.

कोणत्या प्रकारचे व्यायाम करावेत?

स्ट्रेंथ ट्रेनिंग

पीसीओएसचा त्रास कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंगचा चांगला उपयोग होतो. पुल अप्स, पुश अप्स, स्क्वाॅट्स, प्लँक हे स्ट्रेंथ ट्रेनिंगचे प्रकार आहेत. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू मजबूत होतात. महिलांमधील प्रजननाच्या समस्या कमी होतात. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे मनावरचा ताणही कमी होतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग हे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून शिकून तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास त्याचा फायदा होतो. १५ ते २० मिनिटांच्या श्वासोच्छ्वासाच्या व्यायामामुळेही खूप फायदा होऊ शकतो.

अॅरोबिक व्यायाम

PCOS असलेल्या स्त्रियांनी अॅरोबिक व्यायाम करावेत. म्हणजेच चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे इत्यादी क्रियांमुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. व्यायामामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, झोप सुधारते, वजन कमी होते व संप्रेरकांची पातळी नियमित होण्यास साह्य मिळते. तसेच वंध्यत्व कमी होऊन स्त्रियांची प्रजननक्षमताही वाढते.

अॅरोबिक व्यायामांमध्ये ५ ते १० मिनिटांचा वॉर्मअप, ३० ते ३५ मिनिटे चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे इत्यादी व्यायामप्रकारांचाही उपयोग होतो.

प्राणायाम

प्राणायाम केल्यानेही श्वासोच्छवास क्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे थकवा येण्याचे प्रमाण कमी होऊन, लठ्ठपणा व पाळीच्या समस्या कमी होण्यास हातभार लागतो. निरोगी आणि आनंदी राहाण्यासाठी आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश अवश्य करावा. नियमित योगसाधना केल्याने पीसीओएसमुळे असंतुलित झालेले हार्मोन्स नियंत्रणात येण्यास मदत होते. पेल्विक भागातील अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. पाळीच्या समस्या कमी होतात. योगाभ्यासामुळे शरीराच्या ताणासोबतच मनावरचा ताणतणावही दूर होतो. योगक्रियांमुळे दिवसभर उत्साही वाटते. प्रजननक्षमता वाढण्यासाठी भ्रामरी प्राणायाम, विपरीता करणी, पश्चिमोत्तानासन व भुजंगासन ही आसने केल्यास फायदा होतो.

हेही वाचा >> कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या? फक्त ‘हे’ दोन योगा करा; नेहमीच दिसाल तरुण

होलिस्टिका वर्ल्डचे संस्थापक व संचालक डॉ. धर्मेश शाह यांनी सांगितले की, या व्यायामांचा नित्यक्रमात समावेश केल्याने पीसीओएस व्यवस्थापित करण्यात आणि एकूण आरोग्य सुधारण्यात लक्षणीय मदत होऊ शकते. नियमित व्यायाम, योग्य आहार व उत्तम मानसिक आरोग्य यांमुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.