Can tattoos cause allergies : आजकालच्या पिढीला टॅटू काढण्याचे फार वेड आहे. प्रत्येकाला काहीतरी वेगळा टॅटू हवा असतो. काही लोकांना टॅटू काढण्याचे इतके वेड असते की, संपूर्ण शरीरावर टॅटू काढून घेतात. तरुणाईचा टॅटूकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. अनेकदा रिलेशनशिपमध्ये असलेले लोक त्यांच्या जोडीदारासाठी टॅटू काढतात, तर काही लोक आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी टॅटू काढतात; मग आई-वडील किंवा इतर कोणीही असो. आजच्या पिढीने टॅटूसह एक भावनिक बंध निर्माण केले आहे. सध्या व्हॅलेंटाईन डे जवळ येत आहे. या काळात अनेक जण खास व्यक्तींसाठी टॅटू काढतात. अशा वेळी तुमच्याही मनात फार काळापासून टॅटू काढण्याची इच्छा आहे का? असेल तर टॅटू काढण्यापूर्वी हा लेख एकदा नक्की वाचा. कारण अनेकांना टॅटू काढण्याची इच्छा असते, पण मनात मात्र खूप भीती असते. टॅटू काढणे खरंच सुरक्षित आहे का? टॅटू काढण्यामुळे कोणता आजार होतो का? असे प्रश्न मनात असतात. तुमच्या मनातील याच प्रश्नांची उत्तर या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

टॅटू काढणे सुरक्षित आहे का याबाबत ‘स्कुची सुपर क्लिनिक’च्या संस्थापक, सौंदर्यविषयक त्वचाशास्त्रज्ञ, कॉस्मेटोलॉजिस्ट, लेझर विशेषज्ञ, ट्रायकोलॉजिस्ट (trichologist), डॉ. मेघना मौर यांनी लोकसत्ताला सविस्तर माहिती दिली.

young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
Health tips diet advice from social media influencers can be harmful
तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा; शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
nashik hotel gun on servant
नाशिक : हॉटेलमधील नोकरावर बंदूक रोखणाऱ्या पोलिसाचे निलंबन ?
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…

टॅटू काढणे सुरक्षित आहे का? (Is tattooing safe?)

जर टॅटू कलाकार टायटॅनियम आणि ॲल्यूमिनियम शाई आणि कोबाल्ट, क्रोमियम आणि आर्सेनिक वापरत असतील, तर टॅटू काढणे सहसा सुरक्षित असते.

हेही वाचा -तुम्ही वारंवार फोन बघता का किंवा वारंवार हात धुता का? तुम्हाला OCD असू शकतो; OCD म्हणजे नेमकं काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

टॅटूमुळे ॲलर्जी होऊ शकते का? (Can tattoos cause allergies)

जर एखाद्या व्यक्तीला टॅटूच्या शाईमध्ये असलेल्या धातूंची ॲलर्जी असेल तर त्याला टॅटूमुळे ॲलर्जी होऊ शकते. टॅटूवरील अॅलर्जिक प्रतिक्रिया लगेच किंवा नंतर ग्रॅन्यूलोमाच्या रूपात प्रकट होऊ शकतात, तर संसर्ग सामान्य जिवाणू संसर्गापासून ते तीव्र स्थितीपर्यंत असू शकतो, ज्यामध्ये एचआयव्ही आणि हिपॅटायटीस बीसारख्या रक्त-जनित रोगांचा समावेश आहे.

टॅटू काढण्याने आरोग्याला धोका आहे का? (Is there any health risk for tattoo?)

टॅटू काढण्यामुळे आरोग्याला होणाऱ्या धोक्यांमध्ये त्वचेची ॲलर्जी, संसर्ग आणि रक्तजन्य रोगांचा समावेश होतो. तसेच एचआयव्ही आणि हिपॅटायटीस बीसारख्या लैंगिक संक्रमित रोगांचा, टॅटुमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांच्या यादीत समावेश होतो.

टॅटू काढताना वापरली जाणारी सुई सुरक्षित आहे का? (Are tattoo needles safe?)

टॅटू काढताना नवीन सुया वापरल्या जातील याची खात्री करा. सर्व आवश्यक सावधगिरींचे पालन करून प्रशिक्षित कलाकाराच्या मदतीने सर्व प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळला जात आहे का, याची खात्री करणे महत्वाचे आहे.

टॅटूसाठी वापरण्यात येणारी शाई सुरक्षित आहे का? (Is the ink used for tattooing safe?)

टॅटू काढण्यापूर्वी शाईची गुणवत्ता तपासणे आणि एखाद्याला त्याची ॲलर्जी आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. कोणतीही विशिष्ट खबरदारी नसतानाही, कोणतीही प्रतिकूल अॅलर्जी झाल्यास त्वरित त्वचारोगतज्ज्ञांची मदत घेणे योग्य आहे.

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना बंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलचे त्वचाशास्त्रज्ञ, सल्लागार, डॉ. दीपा कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, टॅटूच्या शाईमध्ये शिसे, कॅडमियम आणि पारा यांसारखे जड धातू असू शकतात, जे शरीरासाठी विषारी असू शकतात. याव्यतिरिक्त काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, “टॅटू शाईमध्ये पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आणि phthalates सारखे इतर हानिकारक पदार्थदेखील असू शकतात.”

टॅटू शाईमध्ये धातू असते का?(Does tattoo ink contain metal?)

“होय, टॅटू शाईमध्ये शिसे, कॅडमियम, आर्सेनिक आणि पारा यांसारखे जड धातू असू शकतात. या जड धातूंचा वापर टॅटू शाईमध्ये विविध रंग तयार करण्यासाठी रंगद्रव्य म्हणून केला जातो”, असे डॉ. कृष्णमूर्ती यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -नवरा सतत टोमणे मारतो, प्रेयसी सतत पैशावरून बोलते…तुमचा भावनिक छळ होतोय हे कसे ओळखाल? सुटकेसाठी काय करावे?

टॅटू काढण्याचे संभाव्य आरोग्य धोके (Potential health risks of tattoo)

डॉ. कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार टॅटू काढण्याचे आरोग्य धोके दिले आहेत.

  • ॲलर्जिक प्रतिक्रिया : काही लोकांना टॅटू शाईची ॲलर्जी होऊ शकते, ज्यामुळे खाज सुटणे, सूज येणे आणि लालसरपणा येऊ शकतो.
  • संसर्ग : टॅटूमध्ये त्वचेला सुईने छिद्र करणे समाविष्ट आहे, ज्यामुळे शरीरात बॅक्टेरिया आणि इतर रोगजनकांचा प्रवेश होऊ शकतो. योग्य सुरक्षा खबरदारी न पाळल्यास, यामुळे संसर्ग होऊ शकतो.
  • रक्तजन्य रोग : टॅटू उपकरणे योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण नसल्यास, ते रक्तजन्य रोग जसे की हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी आणि एचआयव्ही प्रसारित करू शकतात.
  • डाग पडणे : टॅटूमुळे त्वचेवर डाग पडू शकतात किंवा केलोइड तयार होऊ शकतात.
  • ग्रॅन्यूलोमा : ग्रॅन्यूलोमा एक लहान गाठ आहे, जी टॅटू शाईभोवती तयार होऊ शकते.
  • MRI गुंतागूंत : काही टॅटू शाईमध्ये धातूचे कण असतात, ज्यामुळे मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (MRI) स्कॅनदरम्यान गुंतागूंत वाढू शकते.

जर तुम्ही सोरायसिस, एक्जिमा यांसारख्या त्वचेच्या आजारांनी ग्रस्त असाल तर टॅटू काढण्यापूर्वी त्वचाविज्ञानाचा सल्ला घ्या.

या लेखात आपण टॅटू काढण्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेतले. टॅटू काढताना वापरली जाणारी शाई आणि सुई आपल्यासाठी सुरक्षित आहे का हे देखील जाणून घेतली आहे. पण अजूनही टॅटू काढण्यापूर्वी माहित असाव्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण पुढील लेखामध्ये जाणून घेऊ या. टॅटू काढताना कोण कोणत्या गोष्टी तपासाव्यात आणि टॅटू काढण्यानंतर कशी काळजी घ्यावी याबाबत सविस्त माहिती आपण पुढील लेखात जाणून घेऊ या..

क्रमश:

Story img Loader