2-2-2 Diet : हल्ली अनेक लोक वजन कमी करण्यासाठी डाएट, पोषक आहार, व्यायाम तसेच विविध टिप्स फॉलो करतात. या सर्व गोष्टींमुळे वजन कमी होईल असे आश्वासनदेखील दिले जाते. २-२-२ आहार पद्धत त्यापैकीच एक आहे. या आहार पद्धतीमध्ये दोन भागांमध्ये आहार घेणे आणि व्यायाम करणे या गोष्टींचा समावेश असतो. बेरिएट्रिक आणि जीआय सर्जन केअर हॉस्पिटल्स बंजारा हिल्सचे डॉ. कृष्णमोहन वाई म्हणाले की, “ही पद्धत संतुलित आहारासह शरीराला हायड्रेशन प्रदान करण्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. यामध्ये दोन भागांमध्ये फळे, भाज्या आणि पाणी (२ फळे, २ भाज्या आणि २ लिटर पाणी, दिवसातून २ वेळा चालणे) घेण्यास प्रोत्साहित केले जाते.”
वीणा व्ही, आहारतज्ज्ञ, ॲस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटल, बंगळुरू यांनी सांगितले की, स्वतःला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याने, या आहार पद्धतीनुसार लोकांनी दररोज दोन बाटल्या पाणी पिणे आवश्यक आहे. “याचे दोन फायदे आहेत. एकतर यामुळे ऊर्जा वाढते आणि भूक वाढते, त्याचप्रमाणे दररोज फळे आणि भाज्या दुप्पट प्रमाणात खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात, जे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि वजन वाढण्यास मदत करतात. दोन वेळा चालल्याने शारीरिक ऊर्जा प्राप्त होते आणि यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आणि मूडदेखील चांगला होतो, तसेच कॅलरीज बर्न होतात,” असं आहारतज्ज्ञ वीणा म्हणाल्या.
आपल्या आहारात हे कसे सहभागी करू शकता?
या आहार पद्धतीला तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनहेल्दी स्नॅक्सच्या जागी पर्याय म्हणून सहभागी करू शकता. शिवाय यासह तुम्ही पाण्याच्या बाटल्यादेखील बरोबर ठेवा. “दररोज दोन फळं आणि दोन भाज्या खाण्याचे नियोजन करा, जसे की स्मूदी पिणे आणि सॅलेड खाणे, व्यक्तीच्या वजन कमी करण्याच्या काळात व्यक्तीमध्ये स्वातंत्र्य आणि नियंत्रणाची भावना निर्माण करते. म्हणून २-२-२ आहार पद्धत ही वजन कमी करण्याचा एक मार्ग आहे, जो पोषण आणि हायड्रेशनलादेखील प्रोत्साहन देतो”, असे डॉ. कृष्णमोहन यांनी सांगितले.
दरम्यान, २-२-२ आहार पद्धतीशी संबंधित काही तोटेदेखील आहेत. आहारतज्ज्ञ वीणा यांच्या मते, ही पद्धत यशस्वीपणे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेले सर्वसमावेशक आहार मार्गदर्शन प्रदान करत नाही. “हे एकूण आहाराच्या गुणवत्तेचा विचार करत नाही; जसे की एकूण कॅलरी सेवन निरीक्षण, मॅक्रोन्यूट्रिएंट वितरण किंवा दोन भागातील आहार. शिवाय, या आहार पद्धतीत आहारातील निर्बंध आणि वैयक्तिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. आहाराची गरज, वय, लिंग, शारीरिक हालचाली आणि चयापचय दर यावर आधारित असते, त्यामुळे अनुकूल आहार व्यक्तीच्या आरोग्यासाठी दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतो”, असे वीणा यांनी सांगितले.
हेही वाचा: तुम्ही सलग तीन दिवस उपाशी राहिल्यास काय होईल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
या आहार पद्धतीचा अवलंब करावा का?
या आहार पद्धतीचा साधेपणा अनेकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो, कारण ही पद्धत खाण्या-पिण्याच्या सवयी आणि जीवनशैली सुधारण्यासाठी एक चांगली सुरुवात म्हणून फायदेशीर ठरू शकते. परंतु, ही पद्धत वजन कमी करण्यासाठी आणि इतर आरोग्य समस्या दूर करण्यासाठी पुरेशी नाही. “व्यवस्थित वजन कमी करण्यासाठी, २-२-२ पद्धतीला संतुलित आहार, वैयक्तिक पोषण आहाराचे नियोजन आणि शारीरिक हालचालींवरदेखील लक्ष केंद्रित करायला हवे”, असे वीणा यांनी सांगितले.