Grape Diet: “तीन दिवसांचा द्राक्षांचा मोनो डाएट तुमच्या शरीरात खरोखरच परिवर्तन घडवून आणू शकतो!” असे सोशल मीडिया क्रिएटर चिंथिया ब्रोमली म्हणाल्या.
त्यांच्या मते, “द्राक्षे ही सर्वोत्तम लसिका शुद्ध करतात आणि द्राक्षांचा मोनो डाएट लसिका प्रवाहाला चालना देऊ शकतो. हा डाएट तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे, वजन कमी करण्यास मदत करणे, संज्ञानात्मक कार्य सुधारणे, जळजळ कमी करणे, ऊर्जा वाढवणे व तुमचा मूड चांगला करणे यांसाठी फायदेशीर आहे.”
पण, मोनो डाएट म्हणजे नक्की काय?
पोषणतज्ज्ञ पायल कोठारी यांनी स्पष्ट केले की, मोनो डाएटमध्ये २४ ते ७२ तासांसाठी फक्त एकच अन्न खाणे समाविष्ट आहे. हे किमान जीवनशैली आणि खाण्याच्या पद्धतीवर आधारित आहे.
“हा डाएट या संकल्पनेवर आधारित आहे की, अन्न संयोजन सोपे केल्याने पचन प्रक्रिया व्यवस्थित होते, ज्यामुळे शरीराला पोषक घटकांचे विघटन आणि कार्यक्षमतेने शोषण करता येते. फक्त एकाच प्रकारचे अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर जड अन्नपदार्थांचा भार पडत नाही, ज्यामुळे कधी कधी पोटफुगी, अपचन किंवा इतर पचनविषयक समस्या उद्भवू शकतात.”, असे कोठारी यांनी इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमला सांगितले.
द्राक्षांच्या मोनो डाएटचे फायदे
बेंगळुरू येथील एस्टर व्हाइटफील्ड हॉस्पिटलमधील चीफ क्लिनिकल डाएटिशियन वीणा व्ही. यांनी स्पष्ट केले, “लिम्फॅटिक सिस्टीम लिम्फॅटिक ड्रेनेज नावाच्या प्रक्रियेत ऊतीं व रक्तामधून टाकाऊ पदार्थ काढून टाकते. ते आपल्या आतड्यांमधून चरबी आणि चरबी विरघळवणारे पोषक घटकदेखील गोळा करते, शारीरिक ऊतींमधून द्रव हृदयात परत वाहून नेते आणि विषारी पदार्थ आणि संसर्गजन्य घटकांसारखे काढून टाकण्यासाठी पाठवते,” असे त्या म्हणाल्या.
“तीन दिवसांचा द्राक्षाचा मोनो डाएट म्हणजे प्रत्येक वेळी फक्त द्राक्षे खाणे. हा एक प्रतिबंधात्मक आहार आहे, ज्यामध्ये हायड्रेशन, सौम्य डिटॉक्सिंग जे लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये मदत करू शकते आणि यामुळे प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून ब्रेकही मिळतो,” असे वीणा म्हणाल्या.
द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व नैसर्गिक साखर असते, जी ऊर्जा प्रदान करतात आणि पचनास मदत करतात. परंतु त्यांनी स्पष्ट केले की, अशा आहारात प्रथिने, निरोगी चरबी व काही खनिजे यांसारख्या अनेक आवश्यक पोषक घटकांची कमतरता असते, ज्यामुळे थकवा येतो व रक्तातील साखरेचे असंतुलन होते.