भारतीयांमध्ये थायरॉइडचे विकार सामान्य आहेत. १०-२० टक्के शहरी भारतीयांना त्याचा त्रास होतो, असे अभ्यासात दिसून आले आहे. थायरॉइड ही एक फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे; जी गळ्यामध्ये असते, जी आपल्या श्वासनलिकेशी जोडलेली असते. ते ‘टी४’ म्हणजेच थायरॉक्सिन (tetraiodothyronine) आणि ‘टी३’ हार्मोन्स म्हणजेच ट्रायओडोथायरोनिन (triiodothyronine) तयार करते; जे आपल्या शरीराच्या जवळपास प्रत्येक भागावर क्रिया करतात जसे की, मेंदू, हृदय, स्नायू, हाडे, प्रजनन प्रणाली, त्वचा आणि केस. थायरॉइड हार्मोन्सच्या (हायपोथायरॉइडिझम) कमतरतेमुळे मंदपणा, स्मरणशक्ती कमी होणे, आळस येणे, त्वचा आणि केस कोरडे पडणे, नाडीचा दर कमी असणे, बद्धकोष्ठता, मासिक पाळीत अनियमितता, वजन वाढणे अशा समस्या होऊ शकतात. लक्षणे बहुतेक वेळा विशिष्ट नसतात आणि ओळखता येत नाहीत. हे हायपरथायरॉइडिझम (hyperthyroidism ) किंवा अतिक्रियाशील ग्रंथीपेक्षा (overactive gland) अधिक सामान्य आहे.

थायरॉइडच्या बिघडलेल्या कार्यांबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण- ते तुमच्या इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम करू शकते. हायपरथायरॉइडिझममुळे (Hyperthyroidism) चयापचय वाढते, इन्सुलिन वेगाने काढून टाकते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. तर, हायपोथायरॉइडिझममुळे (hypothyroidism) रक्तातील साखर कमी होऊ शकते. चाचण्यांमध्ये ‘टी४’ आणि ‘टीएसएच’ या थायरॉइड हार्मोन्सची रक्त पातळी मोजतात. ‘टीएसएच’ म्हणजेच ‘थायरॉइड उत्तेजक हार्मोन्स’ हे पिट्युटरी ग्रंथीद्वारे (मेंदूच्या मागच्या पृष्ठभागाच्या मध्यात असलेली नलिकाविरहित ग्रंथी) स्राव केले जाते आणि त्याच्या पातळीत वाढ हे थायरॉइड कार्याचे सर्वात संवेदनशील चिन्ह आहे. तरीही, लोकांचे त्यांच्या स्थितीकडे बघण्याचे काही वेगळे दृष्टिकोन आणि विश्वास आहेत.

Neil Nitin Mukesh
Neil Nitin Mukesh : अभिनेता नील नितीन मुकेश दर दोन तासांनी का खातो? वाचा, तज्ज्ञांनी सांगितले फायदे
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Ram Kapoor Body Transformation
राम कपूर यांनी वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली का? व्हिडीओ शेअर करीत स्वत: केला खुलासा
Eating Papaya With Seeds know benefits risks from experts
पपईच्या बिया फेकताय? तज्ज्ञांनी सांगितले पपई बियांसह खाण्याचे फायदे; पण खायचे कसे हे पाहा आधी
Following PM Modi’s speech Akshay Kumar shares 4 key tips to help tackle rising obesity in India
“गेल्या अनेक वर्षांपासून मी हेच सांगतोय…”, मोदींनंतर आता खिलाडी अक्षयने सांगितल्या लठ्ठपणा कमी करण्यासाठी खास टिप्स
Does Drinking Coffee On An Empty Stomach Trigger Acidity? Expert Reveals Facts Coffee benefits
२४ तासांत किती कप कॉफी पिणे आहे योग्य? सकाळच्या कॉफीने ऍसिडिटी होते का? तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
Ram Kapoor followed this eating pattern to lose 55 kg
Weight Loss: ५५ किलो वजन कमी करायला अभिनेत्याने वापरला ‘हा’ फंडा; फक्त टाळा ‘या’ चुका; वाचा डॉक्टर काय सांगतात

‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या माहितीमध्ये मॅक्स हेल्थकेअरच्या एंडोक्राइनोलॉजी अँड डायबिटीजचे अध्यक्ष डॉ. अंबरीश मिथल यांनी थायरॉइडच्या विकारावर वारंवार विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे:

माझ्या थायरॉईड स्थितीमुळे माझे वजन वाढत आहे का?

डॉ. अंबरीश मिथल सांगतात की, ”माझ्या एका महिला रुग्णाला खात्री होती की, तिच्या थायरॉइड स्थितीमुळे ती वजन कमी करू शकत नाही. “माझा रिपोर्ट फार खराब आहे. कृपया माझे उपचार सुरू करा; जेणेकरून मी माझ्या मूळ वजनावर लवकर परत येऊ शकेन,” असे ती म्हणाली. तिच्या अहवालानुसार, ०.३ ते ४.० च्या सामान्य श्रेणीसह ६.५ uIU/ml चे ‘टीएसएच’ मूल्य दिसत होते तर ‘टी३’ आणि टी ४ पातळी सामान्य श्रेणीत होती. येथे तीन संभाव्य परिस्थिती आहेत.
(अ) तुम्हाला हायपोथायरॉइडिझम (hypothyroidism) आहे, तुम्ही औषध घेत आहात आणि तुमचे रिपोर्ट सामान्य आहेत. तुमच्या स्थितीमुळे तुमचे वजन वाढणार नाही.
(ब) तुम्हाला आमच्या रुग्णाप्रमाणे सौम्य हायपोथायरॉइडिझम (hypothyroidism) (१० पेक्षा कमी ”टीएसएच”, सामान्य ‘टी३’ , ‘टी४’ ) असल्याचे आढळून आले आहे. या स्थितीत वजन वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. उपचार करावे की नाही हे तुमचे डॉक्टर ठरवतील; परंतु उपचार सुरू केल्यास तुमचे वजन कमी होण्याची शक्यता नाही.
क) तुमचे वजन वाढत आहे आणि तुम्हाला मध्यम ते गंभीर हायपोथायरॉइडिझम (hypothyroidism) (‘टीएसएच’ > १०, कमी टी ४) असल्याचे आढळले आहे.
होय, हायपोथायरॉइडिझममुळे (hypothyroidism) तुमचे वजन वाढण्याची शक्यता आहे, परंतु केवळ ३ किलोपर्यंत. जर तुमचे वजन १० किलो वाढले असेल तर ते हायपोथायरॉईडीझममुळे असू शकत नाही.

मी थायरॉइडसाठी औषधोपचार सुरू करणार नाही. कारण- ते आयुष्यभर घ्यावे लागते?

डॉ. अंबरीश मिथल सांगतात की, तुम्हाला आयुष्यभर थायरॉइड औषधाची गरज आहे. कारण- थायरॉइड ग्रंथी स्वयंप्रतिकार प्रक्रियेमुळे प्रभावीत होऊ शकते आणि ती बरी होऊ शकत नाही. हे औषध व्यसनाधीन आहे म्हणून होत नाही. हे स्थितीचे स्वरूप आहे आणि औषधांचा गुणधर्म नाही; ज्यासाठी सतत उपचार आवश्यक असतात. थायरॉक्सिनचे (thyroxin) दुष्परिणाम शून्याच्या जवळ आहेत आणि सामान्यत: केवळ वृद्धांमध्ये किंवा अतिउपचार केलेल्यांमध्येच दुष्परिणाम दिसून येतात. सर्वांत वाईट म्हणजे, तुम्हाला आयुष्यभर थायरॉक्सिनची गोळी सकाळी प्रथम खावी लागेल. त्यानंतर३०-६० मिनिटे काहीही खाऊ नये आणि चार तासांच्या आत जीवनसत्त्वे, खनिजे आणि पूरक पदार्थांचे सेवन करू नये, विशेषत: कॅल्शियम आणि लोह; कारण ते थायरॉक्सिनचे शोषण कमी करू शकतात.

माझे थॉयराईड चाचणीचे परिणाम आता सामान्य आहेत; मी औषधोपचार का सुरू ठेवू?

डॉ. अंबरीश मिथल सांगतात, आधी सांगितल्याप्रमाणे, थायरॉईड हार्मोन्स (थायरॉक्सिन) थेरपी ही थायरॉईड संप्रेरकांची कमतरता भरून काढण्यासाठी केली जाते. ज्या क्षणी तुम्ही ते थांबवता त्या क्षणी ‘टीएसएच’ पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – काजूमध्ये असतात शुन्य कोलेस्ट्रॉल! ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकही टाळू शकतो, डॉक्टरांकडून जाणून घ्या

आधुनिक औषधांमध्ये थायरॉइडवर कोणताही इलाज नाही. मी इतर पद्धती वापरेन?

डॉ. अंबरीश मिथल सांगतात की, सध्या असा कोणताही पुरावा नाही की हायपोथायरॉइडिझम कोणत्याही प्रकारच्या उपचारांनी बरा होऊ शकतो. काही लोकांच्या थायरॉइड हार्मोन्सच्या पातळीमध्ये भरपूर चढ-उतार असू शकतात; ज्याचे कारण ते त्यांच्या आहार, व्यायाम किंवा काही पर्यायी औषधे असू शकतात. आहारातील बदल करताना ब्रोकोली, कोबी, ग्लुटेन किंवा सोया यांसारख्या अन्नपदार्थांचा त्याग करण्याने काही मदत मिळणार नाही हे लक्षात घ्या. सर्वसाधारणपणे, हायपोथायरॉइडिझम हा जीवनशैलीचा आजार नाही. मधुमेहाच्या विपरीत, तुम्ही परिपूर्ण जीवनशैलीचे पालन करून हायपोथायरॉइडिझमचे निराकरण करू शकत नाही. माझ्याकडे रुग्णांनी त्यांचे औषधोपचारिच्या इतर पद्धती बदलल्या आहेत आणि नंतर उच्च पातळीच्या ‘टीएसएच’ मूल्यांसह माझ्याकडे परत आले आहेत.

माझी थायरॉइड अँटीबॉडीची पातळी खूप जास्त आहे, जरी मी माझी औषधे घेत आहे आणि माझा ‘टीएसएच’ सामान्य आहे. मी खूप चिंतेत आहे. मी काय करू?

सकारात्मक थायरॉइड अँटीबॉडीज (TPO) ला कोणत्याही औषधाची आवश्यकता नसते. तुमचे ‘टीएसएच’ आणि ‘टी४’ सामान्य असल्यास, अँटीबॉडीज अहवालाकडे दुर्लक्ष करा. ते फक्त तुमच्या स्थितीचे स्वयंप्रतिकार स्वरूप सूचित करतात; परंतु कोणत्याही विशिष्ट औषधाची आवश्यकता नसते, जरी अधिक वारंवार निरीक्षण आवश्यक असू शकते.

हेही वाचा – National Nutrition Week 2023: प्रजननासाठी उपचार घेताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, डॉक्टरांकडून जाणून घ्या…

मी गर्भधारणेची योजना आखत आहे. नियमित गर्भधारणापूर्व चाचणीत, माझा ‘टीएसएच’ ६.५ असल्याचे आढळून आले. मी काहीतरी केले पाहिजे का?

जर तुम्ही गर्भधारणेची योजना आखत असाल किंवा गर्भवती असाल, तर सौम्य ‘टीएसएच’ पातळी (५ किंवा ६ uIU/ml) खूप महत्त्वाची मानली जाते. गर्भधारणेदरम्यान (गर्भधारणेच्या निकषांवर आधारित) थायरॉईड पातळीचे कठोर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. थायरॉक्सिन सुरक्षित आहे का? जर तुम्ही आधीच थायरॉक्सिन घेत असाल, तर बहुधा तुमचे डॉक्टर तुमचा डोस वाढवतील.

मला हायपोथायरॉइडिझम आहे. माझ्या नवजात मुलाचीदेखील थायरॉईड पातळी तपासली पाहिजे का?

जन्माच्या वेळी किंवा त्यानंतर लगेचच सर्व नवजात मुलांची थायरॉईडची चाचणी करावी. आईला थायरॉईडची स्थिती आहे की नाही याची पर्वा न करता हे केले पाहिजे. वेळीच उपचार न केल्यास, यामुळे लक्षणीय मानसिक आणि शारीरिक विकृती होऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर निदान आणि उपचार सुरू केल्याने ही स्थिती टाळता येते. बहुतेक विकसित देशांमध्ये नवजात हायपोथायरॉईडीझमसाठी राष्ट्रीय तपासणी कार्यक्रम असतो.

थायरॉईड ग्रंथी ‘टी३’ आणि ‘टी४’ दोन्ही निर्माण करते. माझ्या औषधात फक्त ‘टी४’ आहे. मी देखील ‘टी३’ घ्यावे का?

हायपोथायरॉईडीझम असलेले बहुसंख्य लोक केवळ ‘टी४’ (थायरॉक्सिन) वर चांगले करतात. ‘टी३’ उपचार क्वचितच वापरले जातात आणि संकेत अस्पष्ट राहतात. ते तुमच्या डॉक्टरांवर सोडा.

Story img Loader