Menopause म्हणजेच रजोनिवृत्ती, स्त्रियांसाठी एक नैसर्गिक जीवन अवस्था आहे. गेल्या काही वर्षांमध्ये Menopauseकडे अपेक्षित लक्ष दिले जात आहे आणि मोकळेपणाने चर्चा केली जात आहे. नुकत्याच झालेल्या अभ्यासात, पेरीमेनोपॉज (perimenopause ) आणि मेनोपॉज यावर अधिक परवडणारे उपचार याबाबत जनजागृती करण्याबद्दल चर्चा झाली. परंतु, जीवनातील अनेक गोष्टींप्रमाणेच मेनोपॉजचेही विविध अनुभव सतत येत असतात. काही स्त्रियांना ते आव्हानात्मक वाटते आणि त्यांना आधाराची आवश्यकता असते, तर काही महिलांना शारीरिक आणि भावनिक लाभ झाल्याचा अनुभव येतो. हे क्वचितच नोंदवले जातात, परंतु हे आपण उपलब्ध संशोधनातून आणि महत्त्वाचे म्हणजे, लोकांच्या जगण्याच्या अनुभवांमधून शिकू शकतो, असे मत युवॉन मिडलविक (Yvonne Middlewick) यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

मेनोपॉजमध्ये जाणवणारे चार बदल

१) मासिक पाळीच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते (No more periods or related issues)

डॉ. मिडलविक यांनी सांगितले की, “पूर्वी स्त्रीच्या शेवटच्या मासिक पाळीनंतर १२ महिन्यांनी मेनोपॉजची अधिकृतपणे पुष्टी होते. मेनोपॉजचा सर्वात मोठा फायदा हाच की आता यापुढे मासिक पाळी येणार नाही. हे अनियमित मासिक पाळी, अनियंत्रित रक्तस्त्राव, मासिक पाळी होणाऱ्या त्रासामधून महिलांची कायमची सुटका होते. मेनोपॉज हे मासिक पाळीच्या समाप्तीचा संकेत आहे, ज्यामुळे अनेक स्त्रियांना स्वातंत्र्य मिळते आणि चिंता कमी होते. मेनोपॉजमुळे महिलांना मासिक पाळीमध्ये जाणावणारी डाग पडण्याच्या भीती नाहीशी होते. आता प्रत्येक बॅगमध्ये सॅनटरी नॅपकिन ठेवण्याची गरज नाही किंवा बाथरूम कुठे आहे किंवा जास्तीचे कपडे बरोबर ठेवावे का? असे चिंता वाढवणारे नियोजन करण्याची आवश्यकता नाही. आता तुम्हाला सॅनिटरी उत्पादने खरेदी करण्याची गरज नाही, त्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात. गर्भाशयातील फायब्रॉइड्समुळे जास्त रक्तस्त्राव होणाऱ्या स्त्रियांसाठीदेखील चांगली बातमी आहे. फायब्रॉइड्स हे सामान्य सौम्य gynaecological ट्यूमर ज्याचा त्रास ८०% स्त्रियांना होतो. पुरावे सूचित करतात की, “हार्मोन थेरपी न घेणाऱ्या महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल फायब्रॉइड्सचा आकार कमी करू शकतात आणि ही लक्षणे दूर करू शकतात.”

Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
menstrual leave mva provision
मासिक पाळीच्या रजेचा विषय पुन्हा चर्चेत; भारतात काय आहेत नियम? कोणकोणत्या राज्यांत रजेची तरतूद?
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

१. “मासिक पाळीतील मायग्रेनग्रस्त महिलांना मेनोपॉजनंतर यात सुधारणा जाणवू शकते. कारण त्यांच्या हार्मोनल चढउतार स्थिर होऊ लागतात. हे किती काळासाठी होईल होती हे अद्याप स्पष्टपणे सांगता येत नाही. काही स्त्रियांसाठी मासिक पाळी न येण्याचा अर्थ असादेखील आहे की, मासिक पाळीमुळे वगळण्यात येणार्‍या सामाजिक कार्यक्रमात त्या अधिक सहभाग घेऊ शकतात. उदाहरणार्थ, मासिक पाळीदरम्यान काही संस्कृतींमध्ये धार्मिक गोष्टी किंवा अन्न तयार करता येत नाही, पण मेनोपॉजनंतर याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही.. “असे मत डॉ. मिडलविक यांनी मांडले.

हेही वाचा – तुम्ही कांदा कसा चिरता यानुसार बदलू शकते पदार्थाची चव; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

२. मेनोपॉजमुळे मिळते गर्भधारणेतून सुटका

डॉ. मिडलविक सांगतात की, “नातेसंबंधात असलेल्या महिला त्यांचे संपूर्ण आयुष्य गर्भधारणा रोखण्याचा प्रयत्न करतात. गर्भधारणा टाळण्याची अपेक्षा त्यांच्या पुरुष जोडीदारावर लादली जात नाही, ती फक्त स्त्रियांवर टाकली जाते. पूर्वी गर्भनियंत्रक गोळ्या वापरूनही कधीही अनुभवले नव्हते अशा लैंगिक स्वातंत्र्याचा आनंद महिला मेनोपॉजनंतर घेऊ शकतात, कारण यापुढे गर्भधारणेचा धोका नसतो.

डॉ. मिडलविक यांनी सांगितले की, स्त्रियांच्या मेनोपॉजच्या अनुभवासंबंधित माझ्या संशोधनात सहभागी झालेल्या काही महिलांनी आपले मत मांडले आहे.

अभ्यासात सहभागी महिलेने मेनोपॉजनंतर भविष्यात मूल न होण्याच्या आनंदाचे वर्णन केले. ती म्हणाली की, “आता मला माझ्यासाठी एक शरीर परत मिळाले आहे, कारण मी आता गर्भवती होऊ शकत नाही. माझे शरीर शेवटी माझे एकटीचे आहे, यापुढे गर्भधारणेची चिंता नाही. हे स्वातंत्र्य मला आनंद देते. विशेषत: ज्यांना मुले झाली आहेत आणि आता ते स्वतःवर लक्ष केंद्रित करू इच्छितात, त्यांना आनंद देते. मेनोपॉजनंतर बाळाला जन्म देण्याच्या सामाजिक दबावातून महिलांची सुटका होते. आता तुम्हाला मूल कधी होणार असे प्रश्न कोणीही विचारणार नाही. मेनोपॉजमुळे महिलांच्या शरीरावर मालकी आणि स्वायत्ततेची भावना जाणवते.”

३) आयुष्याचा नवीन टप्पा सुरू होतो आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळतो ( A new chapter and a time to focus on yourself)

दुसऱ्या सहभागीने मेनोपॉजचे वर्णन करताना आयुष्यात होणाऱ्या बदलाचा अनपेक्षित टप्पा म्हणून वर्णन केले. ती म्हणाली की, “आता त्या इतर लोकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःला आणि त्यांच्या गरजांसाठी लक्ष देऊ शकतात.”

अभ्यासात काही स्त्रियांना यावेळी भावनांचे सामर्थ्य (strength of emotions ) हे एक आव्हान वाटत होते, तर काहींना त्यांच्या भावनांच्या सामर्थ्यामुळे स्वातंत्र्य मिळते आणि त्यांना त्यांचे विचार मांडण्यास किंवा त्यांच्या आयुष्यातील इतर कोणत्याही वेळेपेक्षा अधिक ठाम राहण्यास सक्षम करते असे वाटत होते.

हेही वाचा – श्वेता बच्चनने सांगितले अमिताभ आणि जया बच्चन यांच्या सौंदर्याचे रहस्य! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

४) आत्मविश्वास वाढला (Increased self-confidence)

स्वातंत्र्याच्या या भावनेमुळे मेनोपॉजच्या वेळी महिलांमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो. महिलांच्या सखोल मुलाखतींवर आधारित अभ्यासात हे नोंदवले गेले आहे. आत्मविश्वास वाढवणे, करिअरमधील बदल आणि काहीवेळा नातेसंबंधांमध्ये प्राधान्यक्रम स्वत:मध्ये अनेक बदल घडवून आणू शकतात.

मेनोपॉजबद्दल काय चांगले आहे याचा विचार करणे कठीण असू शकते, विशेषत: जर तुम्हाला पेरीमेनोपॉजदरम्यान आव्हानांचा सामना करत असाल तर परंतु हे कालांतराने चांगला अनुभव देऊ शकते.