“काय मस्त पाऊस पडतोय!’ खिडकीबाहेर पाहताना मनात विचार आला आणि एकदम उल्हसित वाटले, मन आनंदून गेले. पटकन उठले, आले घालून फक्कड चहा केला आणि एके एक घोट घेत, पावसाकडे बघत बसले. अहाहा! सुखाची हीच तर कल्पना आहे!

महिन्याभरानंतर अशीच एक पावसाळी संध्याकाळ होती. मनात उदास वाटत होते आणि एकीकडे मनात विचारांची गर्दी होती, ‘आभाळ काळेकुट्ट आहे आणि मनातही अंधार आहे. हा पाऊस कोसळणे म्हणजे जणू माझे मनच रडते आहे. इतक्या अडचणी समोर आहेत सध्या. पुढचा मार्गच दिसत नाहीये.’ मी उठले आणि दिवा बंद करून, डोक्यावरून पांघरून घेऊन झोपून गेले.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Marathwada Socio economic backwardness,
मराठवाड्याच्या अस्वस्थतेची पाळंमुळं
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…

बाहेरच्या वातावरणात घडलेली घटना एकच आहे.- पाऊस. त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र दोन्ही वेळेला वेगळा आहे. त्यावेळच्या मनःस्थितीचा त्या दृष्टिकोनावर परिणाम झालेला दिसून येतो.

मस्त आहे’ असा विचार आधी मनात आला? एखादी घटना आपल्यासमोर घडताना आपल्या इंद्रियांना जाणीव होते. आपल्या स्मरणात साठवलेली माहिती, आधीचे अनुभव यांच्या आधारे समोरच्या घटनेतून अर्थ काढला जातो आणि मेंदूच्या अगदी पुढच्या भागाकडून (प्रमस्तिष्क prefrontal area) भावनांचे नियंत्रण करणाऱ्या सर्किटकडे (limbic system) संदेश जातात आणि मनात भावना निर्माण होतात. जैविक क्रिया आपल्या मनोव्यापाराला अशा प्रकारे कारणीभूत असतात. मनातल्या भावनांनुसार आपली कृती होते. असे हे विचार भावना आणि वर्तणूक यांच्यातील नाते.

हेही वाचा… Kidney Infection: किडनी निकामी होण्याचा धोका टाळण्यासाठी पावसाळ्यात ‘या’ १० सवयी स्वतःला लावा

जेव्हा डिप्रेशन किंवा अतिचिन्तेच्या मनोविकारात मनातले विचार आणि भावना दोन्हीमध्ये बदल होतात त्यावर विचारनिष्ठ उपचारपद्धतीचा उपयोग होतो. विचारनिष्ठ उपचारांमध्ये उदासी, चिंता या भावनांमागच्या विचारांमधला विपर्यास पेशंटला लक्षात आणून दिला जातो. मनातल्या भावनांमागे काय विचार आहेत ते ओळखायला शिकवले जाते आणि विचारांची योग्य दिशा काय, हे ही पेशंटच्या हळूहळू लक्षात येते.

डिप्रेशनमध्ये पेशंटच्या मनात स्वयंचलित नकारात्मक विचार (automatic negative thoughts) येत असतात. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल विचार करताना मुख्यत्वेकरून स्वतःविषयी, इतरांविषयी आणि भविष्याविषयी नकारात्मकता निर्माण होते. ‘मला कोणाशी तरी बोलावेसे वाटत होते. म्हणून अक्षताला फोन केला, पण तिने उचललाच नाही. असं वाटतंय कोणीही नाही आपल्यासाठी. एकटी पडलेय मी. कशाला तोंड देण्याची ताकदच राहिली नाही.’ स्वतःविषयी असहाय्यतेची (helplessness) भावना अशी व्यक्त केली जाते.

‘परीक्षेत इतके कमी मार्क! काय करणार मी भविष्यात? काही बरे घडेल आयुष्यात असेच वाटत नाही. आता अपयश माझ्या पाचवीलाच पूजले आहे!’ असे निराशेचे विचार मनात सहजपणे येतात. ‘असेच जर माझे परीक्षेत होत राहिले, तर काय किंमत राहील माझी? शेवटी यशस्वी माणसाच्या मागे सगळे जण असतात. मला कोण विचारणार? मग जगण्यात तरी काय अर्थ आहे?’ आपल्या आयुष्यातल्या ‘निरर्थकपणाचे’ (worthlessness) विचार पेशंटच्या मनात येत राहतात. अशा या विचारांच्या त्रयीचा पेशंटच्या आयुष्यावर खूप परिणाम होतो. या विचार त्रयीला पूरक असे अनेक विपर्यस्त विचार डिप्रेशनच्या पेशंटच्या मनात येत राहतात. जणू डिप्रेशनच्या चष्म्यातून सगळे जग वेगळेच दिसते, गडद रंगात रंगवलेले!

हेही वाचा… Health Special: पावसाळ्यात अग्निमांद्य व वातप्रकोप का होतो?

मानासोपचाराने हा चष्मा बदलण्याची गरज असते. विचारनिष्ठ उपचार करताना मानसोपचार तज्ज्ञ आणि रुग्ण महत्त्वाच्या समस्या किंवा लक्षणे कोणती ते शोधून काढतात. दोघे मिळून सुधारणेची काही लक्ष्य ठरवतात. जणू उपचारकर्ता आणि उपचार प्राप्तकर्ता यांच्यात एक करार असतो. उपचार करताना ठरवलेल्या गोष्टी उपचार प्राप्तकर्त्याने कृतीत आणायच्या, दिलेला गृहपाठ करायचा, आणि आपल्याकडून मनोविकारातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करायचे. मानसोपचारामध्ये उपचार करणारा आणि उपचार घेणारा दोघांच्या सहभागाची गरज असते.

मानसोपचार तज्ज्ञामध्येही काही गुणधर्म आवर्जून असावे लागतात, उदा. समानुभूती, कळकळ किंवा प्रेमळपणा. तसेच दोघांमध्ये परस्पर आदराची भावना असणेही उपयोगी ठरते. धीराने, संयमाने एक एक टप्पा गाठत मानसोपचार यशस्वी होण्याच्या दिशेने वाटचाल करतो. उपचार सुरू असतानाच केवळ विचारांची दिशा बदलली आणि थेरपी संपल्यावर ‘ये रे माझ्या मागल्या’ असे न होणे, पेशंटच्या विचाराच्या पद्धतीमध्ये दीर्घकाळ टिकेल असे परिवर्तन होणे हा प्रयत्न असतो. विचारनिष्ठ उपचार मर्यादित काळपर्यंत चालतो. काही महिन्यांतच उपचार संपतो, इतर काही मानासोपचारांप्रमाणे वर्षानुवर्षे चालत नाही. आत्ता असलेली लक्षणे आणि समस्या यांच्यावर लक्ष केंद्रित करून विचारांमध्ये बदल घडवून आणून पेशंटला जाणवणारी निराशा, निरर्थकता, असहाय्यत्ता हळूहळू कमी होणे आणि भविष्यातही आलेल्या समस्येला तोंड देण्याची क्षमता निर्माण करणे हेच विचारनिष्ठ उपचाराचे उद्दिष्ट! विचारांचे अनेक विपर्यास आणि त्यांच्यात कसे बदल घडवायचे हे पुढील लेखात पाहू.

Story img Loader