दैनंदिन कामकाज आणि आरोग्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाण्याशिवाय आपण फक्त काही दिवस जगू शकतो. घाम, लघवी आणि अगदी बाष्पीभवनाद्वारे शरीरातील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत असते. म्हणूनच मानवी शरीरातील पाण्याची पातळी राखण्याचे काम आणि देखभाल करण्याचा एक मार्ग निसर्गाने आधीपासूनच विकसित केला आहे. इतर प्राण्यांप्रमाणेच आपले अस्तित्व एका मजबूत जैविक प्रणालीवर अवलंबून असते, जे आपल्याला द्रव पदार्थाचे प्रमाण कमी झाल्यास ते संतुलित करण्यासाठी पाणी शोधून पिण्याची सूचना देते त्यालाच आपण तहान लागणे, असेही म्हणतो. तहान लागल्यानंतर तोंड कोरडे पडते, जे आपल्याला पाणी पिण्याची गरज आहे हे सुचवते. तहान लागणे ही मूलभूत शारीरिक प्रणाली प्रामुख्याने मेंदूच्या ‘नियंत्रण केंद्रा’च्या भागाद्वारे नियंत्रित केली जाते, ज्याला हायपोथॅलेमस म्हणतात. हायपोथॅलेमस शरीराच्या विविध भागांतून संकेत प्राप्त करतो आणि त्या बदल्यात शरीरात हार्मोन्स सोडतो, जे तहान लागल्याची संवेदना संकेत म्हणून कार्य करतात.

निर्जलीकरण म्हणजे काय? (What is dehydration?)

हायड्रेटेड राहणे म्हणजेच आपल्या शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी असणे अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. पाण्यामुळे साधल्या जाणाऱ्या बाबी खालीलप्रमाणे :

yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
‘Abhi bhi feel kar raha hu’: Shah Rukh Khan opens up about struggle with breathlessness after quitting smoking
शाहरुख खानने स्मोकिंग सोडली; पण आता होतोय ‘हा’ भयंकर त्रास; जाणून घ्या याबाबतची डॉक्टरांची मते
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
  • घाम आणि श्वासोच्छवासाद्वारे शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करते
  • संक्रमण टाळते (preventing infections)
  • पोषक घटकांचे पचन आणि शोषण करते
  • नको असलेले घटक मूत्रपिंडाद्वारे शरीराबाहेर टाकते.
  • बद्धकोष्ठता टाळते
  • मेंदूच्या कार्याला (स्मरणशक्ती आणि एकाग्रतेसह) मदत करते.
  • मूड आणि ऊर्जा पातळी सुधारते.

जेव्हा आपल्या शरीरात पुरेसे पाणी नसते तेव्हा निर्जलीकरण (dehydration) होते. शरीरातील द्रवपदार्थाच्या पातळीत किंचितशी घट झाल्यामुळेही डोके दुखणे, चक्कर येणे, आळस येणे व लक्ष केंद्रित न होणे त्रासदायक लक्षणे दिसून येतात. दीर्घकालीन निर्जलीकरणामुळे मूत्रमार्गात संक्रमण, बद्धकोष्ठता व किडनी स्टोन यांसह आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा – जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…

पुरावे काय सांगतात? (What does the evidence say?)


तहान हे शरीरात पुरेशा प्रमाणात पाण्याची पातळी राखण्यासाठी सर्वांत मूलभूत जैविक प्रणालींपैकी एक असूनही, विज्ञान सुचवते की, “तहान आणि त्यानंतरच्या द्रवपदार्थाच्या सेवनाची भावना नेहमीच शरीरातील पाण्याच्या पातळीशी संबंधित नसते.

उदाहरणार्थ- अलीकडील अभ्यासात द्रवपदार्थांचे सेवन आणि शरीरातील पाण्याची स्थिती यांवर तहान लागण्याच्या प्रभावाचा शोध लागला आहे. शरीरातील पाण्याच्या पातळीची स्थिती अभ्यासण्यासाठी सहभागींनी सकाळी आणि दुपारी प्रयोगशाळेत जाऊन मूत्र, रक्ताचे नमुने दिले आणि शरीराचे वजन केले. सकाळची तहान आणि दुपारची तहान या स्थितींमधील संबंध नगण्य होता.

तसेच तहान पर्यावरणीय घटकांद्वारे ठरवली जाऊ शकते; जसे की, किती पाणी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ- प्रयोगशाळेत पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्याने लोक किती पाणी प्यायले आणि शरीरातील पाण्याची पातळी किती होते यावर परिणाम होतो का, हे एका अभ्यासाने समजून घेतले गेले. सहभागींना किती तहान लागली होती आणि ते किती पाणी प्यायले यांच्यातील संबंध अगदी नगण्य होता. हे सूचित करते की “तहान लागणे यापेक्षा किती पाणी उपलपब्ध आहे याचा व्यक्तीच्या द्रवपदार्थाच्या सेवनावर जास्त प्रभाव पडला.

या टप्प्यावर अभ्यास मर्यादित असला तरी व्यायामामुळे आपली तहान लागण्याची यंत्रणादेखील बदलू शकते. विशेष म्हणजे शरीरातील पाण्याच्या पातळीच्या स्थितीकडे दुर्लक्ष करणे. संशोधनात असे दिसून आले आहे की, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त तहान लागते. तहान लागण्याबाबत स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी, संशोधकांनी स्त्री-पुरुषांना द्रवपदार्थ दिले गेले. नंतर त्यांना किती तहान लागली आहे आणि ते किती पाणी पीत आहेत हे मोजण्यात आले. त्यांना आढळले की, स्त्रिया सामान्यत: शरीरातील द्रव कमी होण्याच्या कमी पातळीवर तहान लागल्याची तक्रार करतात. स्त्रियादेखील अधिक पाणी पिऊन तहान लागल्यास प्रतिसाद देतात.

हेही वाचा –जेवल्यानंतर चालल्यास खरोखर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा….

तुम्हाला थोडे पाणी पिण्याची गरज आहे का हे सांगण्याचे इतर मार्ग

काही लोकांना कमी-जास्त प्रमाणात पाणी पिण्याची गरज आहे हे मान्य करताना, अनेक लोकांसाठी दिवसातून दोन लिटर) पाणी हे उद्दिष्ट ठेवणे चांगले आहे.

पण, तहान लागण्याशिवाय तुम्हाला अधिक पाणी पिण्याची गरज आहे की नाही हे सांगण्याचे इतर अनेक मार्ग आहेत.

  • १) लघवीचा रंग : फिकट पिवळ्या रंगाचे मूत्र सामान्यत: शरीरातील पाण्याची चांगली पातळी दर्शवते; तर गडद रंगाचे मूत्र निर्जलीकरण म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे हे सूचित करते.
  • २) शौचालयात जाण्याची वारंवारता : नियमितपणे लघवी करणे (दिवसातून सुमारे चार ते सहा वेळा) शरीरातील चांगली पाण्याची पातळी दर्शवते. क्वचित लघवी होणे निर्जलीकरणाचे संकेत देऊ शकते.
  • ३) स्किन टर्गर टेस्ट (skin turgor test) : त्वचेला हळुवारपणे चिमटा काढणे (उदाहरणार्थ- हाताच्या मागील बाजूस) आणि त्वचा किती लवकर त्याच्या सामान्य स्थितीत परत येते हे पाहणे हे शरीरातील पाण्याची पातळीचे मूल्यांकन करण्यास मदत करू शकते. त्वचा हळूहळू सामन्य स्थितीत येत असेल, तर हे निर्जलीकरण म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी आहे हे दर्शवू शकते.
  • ४) तोंड आणि ओठ : कोरडे तोंड किंवा फाटलेले ओठ ही निर्जलीकरणाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
  • ५) डोकेदुखी आणि थकवा : वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे किंवा अस्पष्ट थकवा ही शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याची चिन्हे असू शकतात.
  • ६) घाम येणे : शारीरिकदृष्ट्या सक्रिय लोकांमध्ये, व्यायाम करताना त्यांना किती घाम येतो याचे निरीक्षण केल्याने शरीरातील द्रव कमी होणे आणि शरीराला किती पाणी आवश्यक आहे याचा अंदाज लावण्यास मदत होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला पाण्याचे सेवन करूनही त्याच्या शरीरातील पाण्याची पातळीची स्थिती बदलता येत नसेल, तर खूप घाम आल्याने निर्जलीकरण होण्याची शक्यता असते.

हे संकेत लक्षात घेऊन केवळ तहान लागण्याच्या संवेदनांवर अवलंबून न राहता, शरीरातील पाण्याची पातळीची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे दर्शवू शकतात. अर्थात, जर तुम्हाला तहान लागली असेल, तरीही थोडे पाणी पिणे चांगली कल्पना आहे.