Sleep tips: अनेकजण रात्री उशीरापर्यंत जागे राहतात आणि सकाळी उशीरा उठतात. आपल्याला लहानपणापासून घरात लवकर झोपा लवकर उठा असे शिकवले जाते, मात्र एका नवीन संशोधनात असं समोर आलंय की, लवकर उठण्यापेक्षा उशिरा उठणे चांगले आहे. चांगली झोप तुम्हाला आतून बरे करू शकते आणि पुढील दिवसासाठी तुमच्या शरीराला ऊर्जा देऊ शकते.
न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार असे आढळून आले की, “जे उशिरापर्यंत झोपतात ते बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि स्मरणशक्तीच्या चाचण्यांमध्ये चांगले गुण मिळवतात.” याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटल्सचे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डॉ कुमार सांगतात दोन प्रकारचे लोक असतात, एक जे व्यक्ती लवकर झोपणे आणि लवकर उठणे पसंत करतात तसेच त्यांच्या क्रियाकलापांचे नियोजन करतात. दुसरे म्हणजे, उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे पसंत करतात तसेच त्यांचे नियोजन करतात. रात्री १२ च्या आधी झोपणे गरजेचे आहे, मात्र हल्ली बरेच जण बारा वाजल्यानंतर झोपतात. याचा अर्थ, जेव्हा लोक झोपेचं चुकीचं वेळापत्र फॉलो करतात तेव्हा ते चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतात. संशोधनानुसार उशिरा उठल्यानं काही गोष्टींमध्ये आपल्याला फायदा होत असला तरीही नुकसान हे मोठ्या प्रमाणात होतं.
किती वेळ झोपलं पाहिजे?
डॉ. कुमार म्हणाले, सात ते नऊ तास झोपण्याची शिफारस केली जाते. सात तासांपेक्षा कमी किंवा नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेतल्यास एखाद्या व्यक्तीला लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि काही प्रकरणांमध्ये कर्करोग यांसारखे आजार होण्याचा धोका असतो; तर एखाद्या व्यक्तीला चांगल्या झोपेपेक्षा कमी झोप मिळत असेल तर अशा प्रकरणांमध्ये धोका जास्त असतो,” असे डॉ. कुमार म्हणाले.
हेही वाचा >> केस गळतात? चिडचिड होते? ‘या’ व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता; कोणते व्हिटॅमिन्स शरीरात काय काम करतात? घ्या जाणून…
फोनच्या व्यसनामुळे आणि सोशल मीडिया आणि टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अंथरुणावर पडलं तरी बराच वेळ या कुशीवरून त्या कुशीवर होण्यातच त्यांची मध्यरात्र उलटून जाते. त्यानंतर कधीतरी डोळा लागतो, पण मध्येच वारंवार जाग येते. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर अशा परिस्थितीत झोपण्यापूर्वी काही सोपे व्यायाम केल्याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते, यामुळे स्नायूंना आराम देण्यासोबतच शरीर लवचिक होण्यासही मदत होते.