Evening Exercises Losing More Weight : व्यायाम करणं शरीरासाठी खूप फायद्याचं आहे यात कोणतीही शंका नाही. पण, व्यायाम सकाळी वा संध्याकाळी कोणत्या वेळेत करावा याबाबत मतभेद दिसून येतात. काहींच्या मते- व्यायाम सकाळी करणं चांगलं; तर काहींच्या मते- संध्याकाळी व्यायाम करणं चांगलं. निरोगी राहण्यासाठी रोज व्यायाम करणं आवश्यक आहे; पण काहींना वेळ मिळत नाही. मग ते कधी सकाळी, तर कधी संध्याकाळी व्यायाम करतात. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी व्यायाम केल्याने तुम्हाला निश्चितपणे फायदे मिळतात. पण, तरीही तुम्ही कोणत्या वेळी व्यायाम करावा हे जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संध्याकाळी वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाणाऱ्या लोकांचं वजन सकाळी व्यायाम करणाऱ्यांपेक्षा लवकर कमी होतं, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. डॉक्टर के. पी. सिंग यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याबाबत सविस्तर बातमी दिली आहे. डॉक्टर के. पी. सिंग सांगतात, “सकाळच्या व्यायामामुळे तुम्हाला दिवसभर कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. मात्र, ज्यांना सकाळी व्यायाम करणं शक्य नाही, त्यांना संध्याकाळी व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. संध्याकाळ ही व्यायामासाठी सर्वोत्तम वेळ आहे.”

आपल्या शरीराचं तापमान दिवसभर बदलत असतं. त्यामुळे संध्याकाळी व्यायाम करणं फायदेशीर आहे.

कोणी कधी व्यायाम करावा?

मधुमेह असलेल्या लोकांसाठी :

डॉ. गुरप्रीत सिंग सांगतात, “रात्रीच्या हालचालींमुळे सकाळी ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते; ज्याचे फायदे आहेत. त्यामुळे जर टाईप-२ चा मधुमेह किंवा लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी संध्याकाळी व्यायाम करावा.” या काळात केलेल्या व्यायामाद्वारे लोक त्यांच्या वजनावर नियंत्रण ठेवून वजन कमी करू शकतात; ज्यामुळे टाईप-२ मधुमेहापासून ते वाचू शकतात.

हृदयाशी संबंधित रुग्णांसाठी :

हृदयाशी संबंधित रुग्णांसाठी व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी ८ ते ११ दरम्यान असेल. जर तुम्ही तुमचा रक्तदाब कमी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ संध्याकाळी आहे. मध्यरात्री ते सकाळी ६ यादरम्यान व्यायाम करणं टाळायला हवं. कारण- त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

हेही वाचा >> Face Serum Benefits: आला उन्हाळा, त्वचा सांभाळा…उन्हाळ्यात ‘हे’ फेस सीरम घरीच बनवा; जाणून घ्या चमत्कारीक फायदे

डॉक्टर सांगतात, “व्यायामामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. व्यायामानंतर व्यक्तीला तणावमुक्त, उत्साही, लवचिक आणि त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. त्यामुळे व्यायामाची वेळ हे तुमचं वजन कमी करण्यासाठी आणि टाईप-२ मधुमेह कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is weight loss easier with evening workouts experts decode a new study weight loss tips srk