एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मधुमेह नसलेल्या लोकांपेक्षा मधुमेह असलेल्या लोकांना हृदयविकार होण्याची शक्यता दोन ते चार पट जास्त असते. तरीही केवळ साखर नियंत्रित केल्याने तुमच्या हृदयाचे रक्षण होऊ शकत नाही. तुमची साखर नियंत्रित असू शकते; पण तुम्ही व्यायाम करीत नसाल, वजन जास्त असेल, धूम्रपान करीत असाल, अनियंत्रित रक्तदाब असेल किंवा कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असेल, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची समस्या सामान्यतः एकत्रितपणे उदभवतात. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेव्हा वर्षातून कमीत कमी एकदा मधुमेह असलेल्या लोकांनी लिपिड प्रोफाइल तपासणे आणि त्यानुसार योग्य ते उपचार सुरू करणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉलकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तुमचा मधुमेहावरील उपचार अपूर्ण ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून, तुम्ही लिपिड प्रोफाइल (लिपिड म्हणजे चरबी किंवा तेल, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण मोजणाऱ्या चाचणीला लिपिड प्रोफाइल चाचणी, असे म्हणतात.) तपासणे का गरजेचे आहे? याबाबतची सविस्तर माहिती डॉ. अंबरीश मिथल, एंडोक्रायनोलॉजी आणि डायबेटिस मॅक्स हेल्थकेअरचे अध्यक्ष यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितली आहे. ती माहिती आपण जाणून घेऊ.

हेही वाचा- लाल मांसामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते का? त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे का? डॉक्टर सांगतात…

लिपिड प्रोफाइल पातळीचे मोजमाप

१) कमी घनता लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्ट्रॉल किंवा ‘खराब’ कोलेस्ट्रॉल; ज्याची उच्च पातळी सतत हृदयविकाराच्या जास्त धोक्याशी संबंधित असते. तर आदर्श LDL पातळी १०० मिलिग्रॅम/डीएलपेक्षा कमी असते.

२) उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) कोलेस्ट्रॉल किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ यांची उच्च पातळी असल्यास हृदयविकाराचा धोका कमी असतो; परंतु याची पातळी कमी झाल्यास हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. भारतीयांमध्ये एचडीएल कमी असल्याचे आढळून येते. एचडीएल वाढवण्यासाठी औषधे फारशी प्रभावी नाहीत आणि औषधांनी एचडीएल वाढवल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो की नाही हेदेखील स्पष्ट झालेले नाही.

3) ट्रायग्लिसराइड्स हा शरीरातील चरबीचा सर्वांत सामान्य प्रकार आहे. हृदय किंवा रक्तवहिन्यासंबंधी रोग उदभवण्यात ट्रायग्लिसराइड्सची भूमिका काय आहे हे अनिश्चित राहते. ट्रायग्लिसराइड्सची उच्च पातळी (> ५०० मिलिग्रॅम/डीएल ) स्वादुपिंडाचा दाह होण्याच्या समस्येशी संबंधित आहे.

हेही वाचा- हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एअर प्युरिफायर फायदेशीर ठरते का? खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ चार गोष्टी ठेवा लक्षात

मधुमेह असलेल्या लोकांनी कोलेस्ट्रॉलमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे व्यवस्थापन कसे करावे?

LDL कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम किरकोळ (१०-१५ टक्के) असला तरीही हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीचे उपाय महत्त्वाचे आहेत. कॅलरी सेवन टाळून वजन कमी करणे हे लिपिड्स आणि इतर हृदयाशी संबंधित जोखीम घटकांच्या सुधारणांशी जोडलेलं आहे. प्रत्येकाने जीवनशैलीच्या उपायांचे पालन केले पाहिजे. परंतु, मधुमेह असलेल्या बहुतांश लोकांना त्यांचे LDL कोलेस्ट्रॉल ठरलेल्या पातळीमध्ये (<१०० किंवा <७० मिलिग्रॅम/डीएल जास्त जोखीम असलेल्या रुग्णांमध्ये) आणण्यासाठी औषधांची आवश्यकता असते.

औषधांची भूमिका

कोलेस्ट्रॉल कमी करणारे स्टॅटिन हे सर्वांत लोकप्रिय औषध एन्झाइमला प्रतिबंधित करते; जे कोलेस्ट्रॉलच्या निर्मितीस जबाबदार असते. मधुमेह असलेल्या १८ हजार ६८६ लोकांवर केलेल्या मेटा अभ्यासात LDL-C मध्ये प्रत्येक १ mmol/L (३८ मिलिग्रॅम/डीएल)च्या कमतरतेमुळे सर्व कारणांनी होणाऱ्या मृत्यूदरापैकी नऊ टक्के घट झाल्याचे दिसून आले. हृदयविकाराचा जास्त धोका असलेल्या व्यक्तींमध्ये स्टॅटिनमुळे हृदयविकाराचा धोका ४० टक्क्यांनी कमी झाला होता. या अभ्यासात असे दिसून आले की, मधुमेह असलेले जवळपास ९० टक्के लोक स्टॅटिनचा वापर करतात.

परंतु, कधी कधी स्टॅटिनमुळे स्नायुदुखीचा त्रास होऊ शकतो. मधुमेह होण्याचाही धोका खूप कमी असतो. तसेच स्टॅटिनचे फायदे जास्त आणि धोके कमी आहेत. मेटा अभ्यासातून असे दिसून आले की, २५५ रुग्णांमध्ये चार वर्षांच्या स्टॅटिन उपचारांमुळे ५.४ रक्तवहिन्यांसंबंधी घटनांना प्रतिबंध करताना टाईप-२ मधुमेहाची अतिरिक्त प्रकरणे समोर येऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी स्टॅटिन घेण्याचा सल्ला दिला असेल, तर तुम्ही स्वत:च्या मर्जीने ते बंद करू नका.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is your blood sugar under control not if your cholesterol level is above this health news jap
Show comments