“तुम्हीही त्या लोकांपैकी आहात का ज्यांना विषाणुजन्य तापाचा संसर्गातून पूर्ण बरे होऊनही कोरड्या किंवा ओल्या खोकल्याचा त्रास कमी होत नाही? तर याला पोस्ट-व्हायरल ब्राँकायटिस म्हणतात आणि वर्षाच्या कोणत्या वेळी तुम्हाला फ्लूचा संसर्ग झाला हे महत्त्वाचे नाही. (दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाळ्यात आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये हिवाळ्यात विषाणुजन्य तापाचा संसर्ग वारंवार होत असते.) “आजकाल मी पाहत असलेल्या प्रत्येक दहा फ्लूच्या रुग्णांपैकी पाच जण हट्टी खोकल्याची तक्रार घेऊन परत येतात”, असे नवी दिल्लीतील साकेत येथील इंटरनल मेडिसिन, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डायरेक्टर, डॉ. रोमेल टिकू यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

“विशेषत: काही वृद्ध रुग्ण जे ब्रॉन्को-डायलेटर्सला ( broncho-dilators)देखील प्रतिसाद देत नाहीत आणि त्यांना स्टिरॉइड्सची आवश्यकता असते. तसेच जे लोक कधीही नेब्युलायझरवर (nebuliser) नव्हते ते वापरत आहेत”, असेही डॉ. टिकू यांनी सांगितले. तुमच्या माहितीसाठी, ब्रोन्कोडायलेटर्स हे एक प्रकारचे औषध आहे, जे फुफ्फुसातील स्नायूंना आराम देऊन आणि श्वासनलिका रुंद करून श्वास घेणे सोपे करते आणि नेब्युलायझर हे असे उपकरण आहे, जे औषधाचे उच्च डोस जलद आणि सहज पोहचवू शकते. हे द्रव औषधाला बारीक वाफेत बदलून कार्य करते.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Pimpri , Chikhli, scrap dealers in Chikhli,
पिंपरी : चिखलीतील अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पोस्ट-व्हायरल ब्राँकायटिस म्हणजे काय?(WHAT IS POST-VIRAL BRONCHITIS?)

डॉ. टिकू सांगतात की,” पोस्ट-व्हायरल ब्राँकायटिस म्हणजे हा खोकला आहे, जो नाकापासून घशापर्यंत श्वसननलिकेमध्ये झालेल्या संर्सगानंतरही (viral upper respiratory infection) कायम राहतो. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही पूर्णपणे बरे झाले नाही. तर याचा अर्थ असा आहे की, तुमच्या फुफ्फुसातील वायुमार्गामध्ये अजूनही संर्सग आहे आणि दाह किंवा सूज आहे, ज्यामुळे होणारा खोकला इतर लक्षणांपेक्षा जास्त काळ टिकतो किंवा प्रदूषणासारख्या अतिरिक्त ताणतणावांना सामना करण्यासाठी तुमची श्वसनसंस्था अजूनही पुरेशी मजबूत झालेली नाही. कधीकधी विषाणुजन्य तापाचा संसर्गामुळे न्यूमोनियाच्या स्वरूपात बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.”

हेही वाचा – दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर…

दीर्घकाळ टिकणाऱ्या खोकल्याचा त्रास आणखी कशाप्रकारे होतो? (WHAT ELSE CAUSES LONG COUGHING BOUTS?)

१) सायनुसायटिस (Sinusitis) समस्या होऊ शकते, ज्यामध्येअनेकदा नाकात पाणी भरते आणि नाकातून पाणी पडते किंवा घशातून द्रव सरकल्याचा अनुभव येऊ शकतो. आपला घसा साफ करण्याचा वारंवार प्रयत्न केल्याने काही कर्कशपणा, खाज सुटणे आणि अडथळे येऊ शकतात, ज्याला सामान्यतः घशात होणारी खवखव म्हणून ओळखले जाते.

२) काही वेळा हा फक्त दमा असू शकतो आणि श्वास लागणे यासारखी नेहमीची लक्षणे कमी होत असली तरी संकुचित वायुमार्गामुळे अजूनही खोकला येऊ शकतो.

३) डांग्या खोकला हा विषाणुजन्य तापाच्या संसर्गानंतर पुन्हा दुय्यम संसर्ग म्हणून बोर्डेटेला पेर्ट्युसिस (Bordetella pertussis) या बॅक्टेरियामुळे होऊ शकतो. यामध्ये स्पास्मोडिक (spasmodic) आणि जलद खोकल्याचा समावेश आहे, जो कसलाही आराम न मिळू देता रुग्णाला मोठा आवाज करत श्वास घेण्यास भाग पाडतो.

४) तुम्हाला छातीत जळजळ जाणवत नाही, पण जेव्हा तुम्ही झोपायला जात असता तेव्हा ते तुमच्या अन्ननलिकेतील पित्त वरच्या दिशेने जाते आणि तुमच्या नाकापासून घशापर्यंतच्या श्वसनमार्गाला त्रास देते. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये आणि रात्री खूप चहा, कॉफी पिणाऱ्या किंवा रात्रीचे जेवण उशिरा करणाऱ्यांना वारंवार जळजळ होते.

५) क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) देखील होऊ शकतो, ज्यामध्ये क्षयरोग, जळजळ आणि घातक फुफ्फुसाची स्थिती निर्माण होते.

६) धुळीच्या कणांची ॲलर्जी होऊ शकते.

७) इंटरस्टिशियल फुफ्फुसाचा रोग (nterstitial lung disease) होऊ शकतो, ज्यामध्ये प्रगतिशील फायब्रोसिस (progressive fibrosis) किंवा फुफ्फुस जाड होते.

८) एसीई इनहिबिटर (ACE inhibitors ) नावाच्या काही रक्तदाबाच्या औषधांमुळे कोरडा खोकला होतो.

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? (WHEN SHOULD YOU CONSULT A DOCTOR?)

सामान्यतः पोस्ट-व्हायरल खोकला आपोआप कमी होतो किंवा डॉक्टर खोकला शांत करणारी, अँटीहिस्टामाइन्स ( antihistamines) आणि डिकंजेस्टंट्सच्या ( decongestants) स्वरूपात औषधे देतात, ज्यामुळे थोडा आराम मिळू शकतो. कोमट पाणी किंवा द्रव प्या आणि आपल्या सभोवती डिह्युमिडिफायर (dehumidifier) ठेवा.

जर खोकला चार आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल आणि तुमची झोप आणि नियमित कामांमध्ये व्यत्यय आणत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची वेळ आली आहे. दीर्घकाळ टिकणारा खोकला प्रौढांमध्ये आठ आठवडे किंवा त्याहून अधिक काळ किंवा मुलांमध्ये चार आठवडे टिकू शकतो.

जर तुम्हाला खोकताना रक्त येत असेल, खोकला अधिक तीव्र होत असेल, तुम्हाला गिळण्यास त्रास होत असेल किंवा ताप, अंगदुखी आणि थंडी परत येत असेल तर आपत्कालीन स्थितीमध्ये डॉक्टरांकडे जा. म्हणूनच ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी प्रत्येकाने, तर ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्यांना फुफ्फुसांना दीर्घकाळापासून संसर्ग आहे, त्यांनी न्यूमोनियाची लस घ्यावी.

Story img Loader