हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. सर्दी, खोकला, ताप या वायरल इन्फेक्शनबरोबर इतर आजारही बळावतात. त्यातीलच एक म्हणजे सांधेदुखी. हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो, किंवा ज्यांना आधीपासून सांधेदुखीचा त्रास आहे त्यांचा त्रास हिवाळ्यात वाढतो असे तुम्ही ऐकले असेल. या असह्य त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय करूनही काही फरक जाणवत नाही. यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात, कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.
सांधेदुखीवर करा हे घरगुती उपाय
आणखी वाचा : रिकाम्या पोटी ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने उद्भवू शकते गंभीर समस्या; लगेच जाणून घ्या
जास्त व्यायाम करणे टाळा
जर तुम्हाला दररोज व्यायाम करण्याची सवय असेल, पण सांधेदुखीचा त्रास होत असेल. तर हा त्रास कमी करण्यासाठी जास्त आणि कठीण व्यायाम करणे टाळा. अर्थरायटीस असल्याला रुग्णांना व्यायाम करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डाएटमध्ये बदल करा
जर हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढत असेल तर त्यासाठी डाएटमध्ये बदल करा. विटामिन डी असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. सूर्यप्रकाश देखील ‘विटामिन डी’ चे उत्तम स्रोत मानले जाते. अर्थरायटीसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मासे, वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या, फळं, दुध यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
आणखी वाचा : मधुमेह असणाऱ्यांना हिवाळ्यात लागू शकते जास्त भूक; नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतील ‘हे’ पदार्थ
उबदार कपड्यांचा वापर
हिवाळ्यात थंडीमुळे बऱ्याचदा सांधेदुखीचा त्रास वाढतो, त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्वेटर, मोजे अशा उबदार कपड्यांचा वापर करा.
धुम्रपान, मद्यपान टाळा
ज्यांना हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होतो, त्यांनी धूम्रपान व मद्यपान टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण यांमुळे शरीरातील टिशूंवर तणाव निर्माण होऊन सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)