Fertility, IVF And Female Health: मागील काही काळात जीवनशैलीच्या बदलांमुळे फर्टिलिटी क्लिनिकमध्ये डॉक्टरांना भेटण्यासाठी येणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढली आहे. IVF (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन) हे वयाच्या पुढच्या टप्प्यात मातृत्व निवडणाऱ्या महिलांसाठी वरदान सिद्ध झाले आहे. वंध्यत्वाला कारण ठरणाऱ्या काही घटकांविषयी आपण आज केस स्टडीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बिहारमधील ४० वर्षीय रजनी शर्मा या पतीसह IVF साठी प्राथमिक उपचार घेत आहेत. त्या एक मधुमेही आहे आणि सध्या त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी डॉक्टर उपचार करत आहेत.
रजनी सांगतात की, “मी उशीरा लग्न केले. मग मी आणि माझे पती दोघांनीही मुलाला या जगात आणण्यापूर्वी एक स्थिर नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला. आयुष्यातील सर्व तणावातून मला मधुमेह झाला. मी आता इन्सुलिनचे शॉट्स घेत आहे,” प्रसूतीशास्त्र, स्त्रीरोग आणि IVF विभागातील वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. नीता सिंग यांच्या मते, “स्त्रियांना उशीरा गर्भधारणेदरम्यान मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो, मुख्यतः मधुमेह आणि टीबीमुळे इतर आरोग्य परिस्थिती देखील प्रतिबंधक म्हणून काम करतात. मधुमेहामुळे स्त्री शरीरातील अंडी नष्ट होण्याचा धोका वाढू शकतो. गर्भाच्या रोपणावर परिणाम होतो. जर स्त्री गरोदर राहिली आणि तिची रक्तातील साखर नियंत्रणात राहिली नाही तर बाळामध्ये जन्मजात डायबिटीजचा धोका होऊ शकतो. अशा महिलांना गर्भपाताचाही धोका असतो.”
टीबी हा आजार महिला जननेंद्रियाच्या अवयवांवर, विशेषत: फॅलोपियन ट्यूब, गर्भाशय आणि एंडोमेट्रियल अस्तरांवर परिणाम करतो. त्यातही गर्भाशयाच्या क्षयरोगात (ज्याला पेल्विक टीबी देखील म्हणतात), गर्भाशयाचे अस्तर इतके पातळ होते की ते रोपण सहन करू शकत नाही किंवा गर्भ धारण करू शकत नाही, परिणामी गर्भपात होतो. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या २०१८ च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की IVF प्रक्रियेसाठी साइन अप करणाऱ्या भारतातील ५० टक्क्यांहून अधिक महिला रुग्णांना जननेंद्रियाचा क्षयरोग आहे.
डॉ. सिंग यांच्या माहितीनुसार, AIIMS मध्ये IVF उपचारांचा खर्च प्रति सत्र ६०,००० रुपये इतका आहे आणि बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामधील बरेच रुग्ण असून साधारण एक वर्षाची प्रतीक्षा यादी आहे. वंध्यत्वावर उपचारासाठी येणाऱ्या अनेक जोडप्यांमध्ये काही बाबी सामान आढळून आल्या होत्या, बहुतेकांनी ३२ वर्षांचे असताना लग्न केले आणि ३४-३५ व्या वर्षी मुलासाठी प्लॅन सुरू केला. ४० ते ५० वयोगटातील पुनर्विवाह केल्यानंतरही अनेक जोडप्यांना मूल हवे होते. “माझ्या क्लिनिकमधील किमान ८० टक्के रुग्ण वंध्यत्वाचे आहेत. पूर्वी, एक स्त्री ३५-३६ पर्यंत गर्भधारणा करण्यास सक्षम होती परंतु आता प्रजनन क्षमता झपाट्याने कमी होत आहे,”
“विलंबित गर्भधारणेसाठी आणखी एक मोठे आव्हान म्हणजे महिलांमध्ये एंडोमेट्रिओसिस आणि फायब्रॉइड्स सारख्या प्रकरणांमध्ये वाढ. “एंडोमेट्रिओसिस हा एक प्रगतीशील आजार आहे आणि फायब्रॉइड्स म्हणजे बाळासाठी प्लॅन करण्यापूर्वी तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागू शकते. प्रजननक्षमतेसाठी वय हे सर्वात मोठे बाधक आहे आणि वाढत्या वयात, जरी तुम्ही IVF घेतला तरी गर्भधारणेची शक्यता कमी असते.”
हे ही वाचा<< १६,००० हार्ट सर्जरी केलेल्या डॉक्टरांचेच हार्ट अटॅकने निधन! सायलंट अटॅकचा धोका कसा ओळखावा, जाणून घ्या
गर्भधारणेची वयानुसार शक्यता किती असते?
गर्भधारणा ही जरी गर्भाशयाचे आरोग्य, शुक्राणू आणि अंड्याची गुणवत्ता आणि अंड्यांची संख्या यासारख्या अनेक बदलांवर अवलंबून असली तरी, वयानुसार, “३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या जोडप्यांना ५० टक्के 35 आणि त्याहून अधिक वय असलेल्या जोडीदारांना ३० टक्के नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता असते. म्हणून ७० किंवा ८० टक्के यश मिळवणाऱ्या खाजगी दवाखान्याच्या जाहिरातींना बळी पडू नका. हे दिशाभूल करणारे असू शकतात.”