Jaggery Benefits: पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा गुळाचा जास्त वापर केला जात होता. खरंतर साखर आणि गुळ दोन्ही उसापासून तयार केले जातात. मात्र, गूळ साखरेच्या तुलनेने आरोग्यास फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळ आपण खातोच मात्र उन्हाळ्यात गुळामुळे आरोग्याचे नुकसान होते अशी समज आहे. मात्र तज्ज्ञांच्य मते उन्हाळ्यात गुळाचे योग्य सेवन केल्यास आरोग्याला खूप फायदेशीर ठरते. यामध्ये लोह, खनिजे, जीवनसत्त्वे आढळतात तसेच त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. भारतीय संस्कृतीत घरी येणाऱ्याला विशेषतः उन्हातून आल्यास गूळ आणि पाणी देण्याची प्रथा आहे. गुळाचे आरोग्याला असणारे अनेक फायदे सिद्ध झाले आहेत. जाणून घेऊया गुळ खाण्याचे विविध फायदे

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी मदत

दुपारच्या जेवणानंतर गुळाचा तुकडा खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून बराच आराम मिळतो. गूळ उन्हाळ्यात पचनसंस्था सुधारण्यास मदत करतो. गुळात अनेक पाचक तत्व आढळतात, ते पोटाला आराम देण्याचे काम करतात.

Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?

आरोग्यास फायदेशीर

गुळाचा चहा तयार करून सकाळसंध्याकाळ प्यायल्यास सर्दी, खोकला, ताप यासाठी आराम मिळतो. अशा प्रकारे गूळ खाल्ल्यास आरोग्यास फायदा होतो.

शरीर थंड राहते

गूळ शरीराला थंड ठेवण्याचेही काम करतो. ते खाण्यासाठी भांड्यात गूळ घ्या, वितळण्यासाठी 2 तास ठेवा नंतर त्यात तुळस, लिंबाचा रस घाला आणि ते एकत्र करून प्यावे. यामुळे उष्माघात टाळण्यास मदत होते आणि शरीर थंड राहते.

शरीराला ऊर्जा मिळते

गूळ शरीराला ऊर्जा देण्याचेही काम करतो. जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल तर गुळाचा तुकडा खावा यामुळे आराम मिळतो.

सर्दीवरही गुणकारी

सर्दी-पडसं दूर करण्यासाठीही गूळ लाभदायी ठरतो. काळीमिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसं कमी होतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभकारक ठरतं. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते.

आवाज चांगला राहतो –

गूळ आणि आलं गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते. त्यामुळे आवाज बसत नाही.

हेही वाचा – उन्हाळ्यात तुम्हीही गरमा गरम जेवण जेवताय? थांबा! आधी तोटे जाणून घ्या

कोणताही पदार्थ प्रमाणात खावा. त्यामुळे गूळदेखील प्रमाणात खावा. गूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्त दुषित होऊन अंगावर फोडं येण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना त्वचारोग आहे त्यांनी गूळ खाणे टाळावे.