How Much Sleep Human Body Need : कल्पना करा की, तुम्ही १० वर्षांपासून फक्त ३० मिनिटे झोपत आहात आणि तरीही सर्व कामे व्यवस्थितपणे करीत आहात. ही कल्पनाच किती आश्चर्यकारक आहे, हो ना. पण जपानमधील ह्योगो येथील ४० वर्षीय जपानी व्यावसायिक डायसुके होरी (Daisuke Hori) यांनी असा दावा केला आहे, “गेल्या १० वर्षांपासून रोज फक्त ३० मिनिटे झोपत आहे.”

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ला दिलेल्या माहितीनुसार होरी यांनी सांगितले, “कमी वेळ झोपण्याची ही दिनचर्या ही दीर्घायुष्य मिळविण्याची एक पद्धत आहे.”

चांगल्या आरोग्यासाठी प्रौढ व्यक्तीला ६-८ तासांची झोप मिळणे आवश्यक आहे, याबाबत बहुतांश लोकांची सहमती आहे; पण होरी यांचे मत मात्र वेगळे आहे. होरी ठामपणे सांगतात, “कमी झोपण्यामुळे काम करण्याची कार्यक्षमता आणि एकंदर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.”

जागे राहण्यासाठी होरी आपल्या दिनचर्येत नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टींचा समावेश करतात. त्यांनी सांगितले, “जोपर्यंत जेवणाच्या एक तास आधी तुम्ही खेळ खेळता किंवा कॉफी पिता तोपर्यंत तुम्हाला झोप येणार नाही.”

अनेक लोक होरी यांचा दावा ऐकून थक्क झाले. होरी यांची दिनचर्या जाणून घेण्यासाठी एका जपानी टीव्ही शोने तीन दिवस त्यांच्याबरोबर घालवले. या शोदरम्यान होरी फक्त २६ मिनिटांसाठी झोपल्याचे आढळले; पण उठल्यानंतर त्यांना खूप ऊर्जा मिळाली असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी नाश्ता केला आणि ते काम करण्यासाठी गेले. तसेच ते जिममध्येही गेले.

जपान शॉर्ट स्लीपर ट्रेनिंग असोसिएशनमार्फत कमी वेळ झोपण्याबाबत मार्गदर्शन देण्यात येते. त्यांच्याकडून पारंपरिक झोपण्याच्या पद्धतींना आव्हान देण्यात आहे. पण, याबाबत अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. त्यामुळे याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊ या…

याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, जनरल फिजिशियन, एमडी, एमबीबीएस डॉ. पलेती शिव कार्तिक रेड्डी यांनी सांगितले, “दररोज फक्त ३० मिनिटे झोपल्यामुळे दीर्घकाळापर्यंत आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मेंदूचे कार्य, स्मृती एकत्रीकरण (memory consolidation), रोगप्रतिकार शक्तीचे कार्य व चयापचय व्यवस्थापन यांसह विविध शारीरिक प्रक्रियांसाठी झोप आवश्यक आहे. रोज फक्त ३० मिनिटे झोपल्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

हेही वाचा – “तुम्हाला जिमची गरज नाही, फक्त कॉमन सेन्स वापरा’, मिलिंद सोमण यांनी सांगितला फिटनेस मंत्र

रोज फक्त ३० मिनिटे झोपल्याने कोणत्या आरोग्य समस्या निर्माण होतात? (But, what are these health issues?)

डॉ. रेड्डी सांगतात, “दीर्घकाळापर्यंत कमी वेळ झोपण्यामुळे दृष्टिदोषासंबंधित संज्ञानात्मक कार्यावर (cognitive function) लगेच परिणाम होतो. कमी वेळ झोपल्याने लक्ष केंद्रित होत नाही, सतर्कता कमी होते आणि समस्या सोडविण्याची व निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. कमी वेळ झोपल्यामुळे कालांतराने स्मृतिभ्रंश (अल्झमायर) यांसारखे आजार होण्याचा धोका असतो.”

झोपेत असताना शरीरात सायटोकिन्स (cytokines) या प्रथिनाचे उत्पादन होते; त्यामुळे संसर्ग, दाहकता किंवा तणाव यांचा सामना करण्यास मदत मिळते. कमी वेळ झोपल्याने सायटोकिन्सचे उत्पादन कमी होते आणि शरीर आजारांबाबत अधिक संवेदनशील होते.

डॉ. रेड्डी असेही नमूद करतात, “दीर्घकाळ झोपेच्या कमतरतेमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित समस्या, हार्मोनल असंतुलन आणि चिंता व नैराश्य यांसारख्या मूड विकारांशी संबंधित त्रासांना सामोरे जावे लागते. “दिवसातून फक्त ३० मिनिटे झोपल्याने माझे उत्पादन क्षमता वाढविणारे आयुष्य (productive life) ‘दुप्पट’ झाले आहे, असा दावा होरी यांनी केला असला तरी आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम हे कोणत्याही फायद्यांपेक्षा जास्त आहेत.”

“अत्यंत कमी झोप वेळ झोपल्याने उत्पादकता वाढू शकते ही कल्पना भ्रामक आहे. कारण- उत्पादकतादेखील संज्ञानात्मक तीक्ष्णता, भावनिक स्थिरता आणि एकूण आरोग्यावर अवलंबून असते,” असे ते पुढे म्हणतात.

हेही वाचा – भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?

मानवी शरीर आणि मेंदूला इतक्या कमी झोपेशी जुळवून घेणे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य आहे का? (Is it scientifically possible for the human body and brain to adapt to such minimal sleep?)

डॉ. रेड्डी सांगतात, “वैज्ञानिकदृष्ट्या मानवी शरीर आणि मेंदू यांची रचना दिवसातील ३० मिनिटे इतक्या कमी झोपेशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने तयार झालेली नाही.”

शरीराला पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संज्ञानात्मक प्रक्रिया आणि भावनिक नियमन यांसह विविध शारीरिक कार्यांसाठी झोप आवश्यक आहे. आपल्याला पुरेशी झोप मिळाली, तर आपण पुन्हा नव्याने ताजेतवाने होऊ शकतो. परंतु, कमीत कमी झोप घेणे आणि डोळ्यांची जलद हालचाल (Rapid Eye Movement) यांसारख्या त्रासदायक ठरू शकणाऱ्या झोपेच्या टप्प्यांमुळे ही प्रक्रिया रोखली जाते; जी आपल्याला आरोग्यदायी जीवनासाठी खूप आवश्यक असते.

कमी झोपेच्या सवयीचे रूपांतर पुढे ‘मायक्रो स्लीप’ (काही सेकंदांची झोप) घेण्यामध्ये होऊ शकते. पण, त्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता, लक्ष केंद्रित करणे, निर्णय घेण्याची क्षमता किंवा प्रतिक्रिया देणे यांसारख्या दैनंदिन आवश्यक बाबी करणे अवघड होऊ शकते; एकंदरीत रात्री घेतल्या जाणाऱ्या झोपेला ‘मायक्रो स्लीप’ हा काही योग्य पर्याय नाही.

रोज फक्त ३० मिनिटे झोपण्यामुळे शरीराचे झोपेचे वेळापत्रक बिघडते आणि त्यामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. एकंदरीत ही बाब हे स्पष्ट करते की, दीर्घकाळपर्यंत कमी वेळ झोपण्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही कितीही कमी झोप घेऊन काम करण्याचा प्रयत्न करा; पण तुम्ही पुरेशी झोप न घेतल्यास, त्याचा तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा – तुम्ही तुमच्या पाण्याची बाटली रोज धुता का? नाही….मग ही बातमी वाचा, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..

होरींसारखे अत्यंत कमी वेळ झोपल्यास शरीराच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो? (How do practices like Hori’s affect the body’s ability to cope with extreme sleep deprivation?)

“होरी यांनी सांगितल्याप्रमाणे जेवणापूर्वी व्यायाम करणे किंवा कॉफी पिणे यांसारख्या सरावांमुळे सतर्कता किंवा ऊर्जा तात्पुरती वाढू शकते; परंतु अत्यंत कमी झोपेमुळे जाणवणाऱ्या कमतरतांचा सामना करण्यासाठी ही धोरणे उपयोगी नाहीत,” असे डॉ. रेड्डी सांगतात.

“व्यायामामुळे झोपेच्या कमतरतेचे काही नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होते; जसे की, थकवा दूर करणे. झोपल्यानंतर शरीरामध्ये ज्या पद्धतीने शरीरात ऊर्जा साठवली जाते, तेवढी ऊर्जा व्यायाम करण्यामुळे साठवली जात नाही.
” जेवणाआधी कॉफी प्यायल्याने झोपेला प्रोत्साहन देणारे मेंदूतील एडेनोसिन रिसेप्टर्स (adenosine receptors ) ब्लॉक होतात आणि तात्पुरती सतर्कता आणि एकाग्रता वाढू शकते. पण, विशेषत: जेव्हा झोपेच्या कमतरतेचा प्रतिकार करण्यासाठी जेव्हा अत्याधिक प्रमाणात कॅफिनचे सेवन करणे हे हृदयाची धडधड, चिंता, पचन समस्या व अवलंबित्व वाढवू शकते,” असेही डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले.