Jasmin Bhasin Diagnosed With Corneal Damage : टेलिव्हिजन अभिनेत्री जस्मिन भसीनला नुकताच डोळ्यांचा एक गंभीर आजार झाला होता, कॉन्टॅक्ट लेन्समुळे अभिनेत्रीच्या डोळ्यांना इजा झाली होती. त्यामुळे तिला दिसणे बंद झाले होते. जस्मिच्या डोळ्यांतील कॉर्नियाला लेन्समुळे दुखापत झाली होती. सध्या तिच्या डोळ्यांवर उपचार सुरू असून, तिची तब्येत स्थिर आहे. याबाबत तिने स्वत: इन्स्टावर पोस्ट करीत माहिती दिली.

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी १७ जुलैला एका कार्यक्रमासाठी दिल्लीत गेले होते, ज्यासाठी मी तयारी करीत होते. यावेळी माझ्या लेन्समध्ये नक्की काय चूक झाली हे मलाच समजले नाही. त्या घातल्यानंतर माझे डोळे दुखू लागले आणि वेदना हळूहळू वाढू लागल्या.”

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Outhouse marathi Movies Acting Movies
सहज अभिनयाची पर्वणी
Sharad Pawar
“या प्रकरणाचा सूत्रधार…”, मस्साजोगच्या ग्रामस्थांसमोर शरद पवार गरजले; संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत घेतली मोठी भूमिका
Star Pravah New Serial Tu Hi Re Maza Mitwa
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता साकारणार खलनायक! म्हणाला, “विक्षिप्त स्वभावाचं पात्र…”
Kalyan Scuffle Abhijeet Deshmukh
Kalyan Scuffle : कल्याणमधील सोसायटीत नेमकं काय घडलं? जखमी अभिजीत देशमुख म्हणाले, “त्याच्याकडे पिस्तुल…”
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”

“मला डॉक्टरांना भेटायचे होते; परंतु कामाच्या बांधिलकीमुळे मी प्रथम कार्यक्रमात सहभागी होऊन, नंतर डॉक्टरांना भेटायचे ठरवले. कार्यक्रमादरम्यान मी सनग्लासेस घातल्या होत्या आणि टीमने मला गोष्टी हाताळण्यात मदत केली. पण, काही वेळाने मला नीट दिसेनासे झाले. आम्ही रात्री उशिरा डोळ्यांच्या तज्ज्ञाकडे गेलो. त्यांनी मला डोळ्यांतील कॉर्नियाला इजा झाल्याचे सांगितले आणि माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली“, असा खुलासा तिने केला.

जस्मिन भसीनच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यात अनेकांनी कॉन्टॅक्ट लेन्समुळे डोळ्यांतील कॉर्नियाला इजा कशी होते, अशी माहिती ‘सर्च’द्वारे मिळविण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपण आज कॉर्निया आजार म्हणजे काय? आणि या आजारात कशी काळजी घ्यायची? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना डॉक्टर काय म्हणाले ते जाणून घेऊ..

अथ्रेया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सल्लागार व नेत्रतज्ज्ञ डॉ. नवीन सी. याबाबत म्हणाले, “तुम्ही जितक्या लवकर वैद्यकीय मदत घ्याल, तितकी तुमची पूर्ण बरी होण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला डोळ्यांमध्ये काही लक्षणे आढळल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटण्यास अजिबात संकोच करू नका.“

कॉन्टॅक्ट लेन्समुळे कॉर्नियाचे नुकसान बऱ्याचदा काही प्रमुख समस्यांमुळे होते. या समस्या नेमक्या कोणत्या जाणून घेऊ…

१) अयोग्य स्वच्छता : अस्वच्छ लेन्स या जीवाणू, विषाणूंचे प्रजननस्थळ असतात. त्यामुळे डोळ्यातील कॉर्निया संक्रमित होऊ शकतो. डोळ्यांत वेदनादायक अल्सर किंवा अगदी डाग पडू शकतात. लेन्स वापरताना किंवा काढताना डोळ्यांची स्वच्छता ठेवा किंवा लेन्स सोल्युशनचा वापर करा.

२) ओव्हरवेअरिंग लेन्स : डोळ्यांत लावलेल्या कॉन्टॅक्ट लेन्स तुमच्या कॉर्नियापर्यंत ऑक्सिजन नीट पोहोचवत नाही. त्यामुळे लेन्स जास्त वेळ घातल्यास, घालून झोपल्यास तुमच्या डोळ्यांना आवश्यक त्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. परिणामत: कॉर्नियाचे नुकसान होते आणि डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.

३) कोरडे डोळे : जेव्हा तुमचे डोळे कोरडे असतात, तेव्हा लेन्स डोळ्यांतील कॉर्नियाला चिकटून राहू शकतात. त्यामुळे चिडचिड होऊ शकते आणि स्क्रॅच होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांना संसर्गाचा धोका वाढतो.

४) खराब फिटिंग लेन्स : खराब फिटिंगच्या लेन्स तुमच्या कॉर्नियाला सॅण्डपेपरसारखे घासतात आणि त्यामुळे ओरखडे येतात. त्यामुळे केवळ दुखापतच होत नाही, तर संसर्गालाही आमंत्रण मिळू शकते.

५) स्वच्छता पाळा : हात धुतल्यानंतरच लेन्स हाताळा आणि त्या वापरण्यापूर्वी स्वच्छ झाल्याची आपल्या परीने खात्री करून घ्या. लेन्स सोल्युशन्स पुन्हा वापरू नका. तुमची लेन्स केसदेखील नियमितपणे बदला.

६) लेन्स वापरण्याच्या मर्यादित वेळेचे पालन करा : तुमच्या लेन्स शिफारशीपेक्षा जास्त वेळ वापरू नका आणि तुम्ही स्पेशल एक्स्टेंड वेअर लेन्स घातलेल्या नसल्यास त्या झोपण्यापूर्वी काढून ठेवा.

७) डोळे कोरडे नाहीत ना हे तपासा : जर तुमचे डोळे कोरडे वाटत असतील, तर कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांसाठी विशेषत्वाने डिझाइन केलेल्या डोळ्यांच्या ड्रॉपचा वापर करा. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

८) नियमित तपासणी करा : डोळ्यांचे डॉक्टर हे सुनिश्चित करू शकतात की, तुमच्या लेन्स योग्य रीत्या फिट आहेत आणि तुमचे डोळे निरोगी आहेत. गंभीर नुकसान होण्याआधी ते त्रासाची प्रारंभिक चिन्हेदेखील पकडू शकतात.

कॉर्नियाची समस्या टाळण्यासाठी काय कराल?

१) लेन्स लावल्यानंतर वेदना जाणवल्या तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जर तुम्हाला कॉर्नियाचे नुकसान झाल्याचा संशय असेल (लक्षणेमध्ये वेदना, लालसरपणा, अंधुक दृष्टी), तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

२) कॉन्टॅक्ट लेन्समुळे कोणताही त्रास होत असल्यास, त्या ताबडतोब काढून टाका. तुमचे दुखापतग्रस्त डोळे लवकर बरे होण्यास मदत होते.

३) कॉर्नियामुळे डोळे दुखत असतील तरी ते चोळू नका. कारण- त्यामुळे नुकसान होऊ शकते.

४) डोळ्यांवर कूल कॉम्प्रेसचा वापर करा. अशा वेळी स्वच्छ, ओलसर कापडा डोळ्यांवर ठेवा.

३) डोळ्यांमध्ये आय ड्रॉप वापरणे किंवा मलम लावणे टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत काहीही टाकू नका.

४) अशा वेळी ताबडतोब डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटा. जरी वेदना कमी होत असली तरी तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. लवकर निदान आणि उपचार दीर्घकालीन दृष्टी समस्या टाळू शकतात.

कॉर्नियाच्या नुकसानीमुळे डोळ्यांवर कसा परिणाम होतो?

कॉर्नियाच्या नुकसानाचा परिणाम त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतो, असे डॉ. नव्या म्हणतात. अनेकदा या आजारात डोळ्यांनी धूसर दिसणे, डोळे लाल होणे, वेदना होणे आणि डोळ्यांतून पाणी येणे अशा समस्या जाणवतात. पण या समस्या सहसा उपचाराने कमी होतात.

दीर्घकालीन खोल अल्सर किंवा डाग यांसारख्या गंभीर नुकसानीमुळे दृष्टी कमी होऊ शकते, अगदी काही प्रकरणांमध्ये अंधत्वदेखील येऊ शकते.

कॉर्निया आजारावर इतर उपचार

१) मेडिकेटेड आय ड्रॉप्स :
संसर्गावर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक, अँटीव्हायरल किंवा अँटीफंगल्स औषधे लिहून दिली जाऊ शकतात.

२) वेदनांपासून आराम
ओव्हर-द-काउंटर वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे खाणे फायदेशीर ठरू शकते.

३) आय पॅच
यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते आणि बरे होण्यास प्रोत्साहन मिळते.

४) कॉर्नियल प्रत्यारोपण
गंभीर प्रकरणांमध्ये जेव्हा डोळ्यांमध्ये डाग किंवा नुकसान मोठ्या प्रमाणावर असते. त्यावेळी नीट दिसावे याासाठी कॉर्नियल प्रत्यारोपणाची आवश्यकता असू शकते.

Story img Loader