Jeera ajwain water benefits : आवश्यकतेक्षा अधिक जेवण आणि अयोग्य आहार जसे फास्ट फूडच्या अधिक सेवनाने लोकांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. अतिरिक्त वजन हदयविकार आणि मधुमेहसह अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे, वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. व्यायाम हा त्यावर उत्तम उपचार आहे. व्यायामुळे आरोग्य चांगले राहते. जिरा आणि ओव्याचे पाणी लठ्ठपणाची समस्या दूर करू शकते. जिरा आणि ओव्याचे पाणी कसे तयार करायचे? याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे बनवा पाणी

हे पाणी बनवण्यासाठी तुमच्याकडे जिरा, ओवा आणि लिंबूचे रस असणे आवश्यक आहे. एका ग्लासमध्ये ओवा भिजवून ठेवा आणि दुसऱ्या ग्लासमध्ये जिरे भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर पाणी गाळून घ्या. ५ ते १० मिनिट पाणी चांगल्याने उकळा आणि नंतर ग्लासमध्ये लिंबूचे रस पिळून त्याचे सेवन करा.

(रक्त वाढवण्यासाठी मदत करू शकते बेसन, अजून कोणते फायदे होतात? जाणून घ्या)

फायदे

जिऱ्यात अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीराला उर्जावान ठेवण्यास मदत करतात, त्याचबरोबर शरीरातील चरबीची उच्च पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील मदत करतात. तर ओव्यात फायबर, अटिऑक्सिडेंट आणि जीवनसत्व असतात जे उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासह चयापचय वाढवण्यात मदत करतात.

उपाय करताना बाळगा ही सावधगिरी

ओवा रक्त पातळ करू शकते, तसेच ते रक्त गोठण्याची प्रक्रिया मंद करू शकते. जर तुम्ही रक्त गोठणे कमी करण्यासाठी औषधे घेत असाल तर या दोन गोष्टींचा आहारात समावेश करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला घ्या.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हा उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeera ajwain water could help lower weight ssb
Show comments